सोन्यापेक्षा किंमती आहे नागरमोथा, कुठे मिळाला तर जरूर सांभाळून ठेवा, एक नाही अनेक आजारांवरचे औषध आहे ही वनस्पती…

नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत नागरमोथा या गवताबद्दल व त्याच्या फायद्यांबद्दल. याला खूप ठिकाणी नागरमोथा असे म्हणतात. हे गवत शेत, मोकळे मैदान, गव्हाची शेत, बाजरीची शेत, धान्याची शेत, रस्त्याच्या कडेला, अगदी सहजपणे मिळू शकते. ही जास्त पाणी असलेल्या जागी उगवणारी वनस्पति आहे. शेतीच्या दृष्टीने हे एक कुठेही उगवणारे निरोपयोगी गवत आहे. पण या गवताचे खूप जास्त फायदे आयुर्वेदात सांगितले गेले आहेत.

ह्या गवताची लांबी १ ते २ फुट असते. याची फुले मंजिर्यांेप्रमाणे असतात व ती पिवळ्या रंगाची असतात. याचे मूळ खूप गहिर्या२ रंगाचे असते. याच्या मुलांच्या खाली कंद असतो, जो जमिनीत खोलवर असतो व अंडाकार असून त्याचा रंग गडद भुरा असतो. याच्या मुळाच्या ग्रंथिंमध्ये एक प्रकारचे तेल असते. त्याशिवाय यामध्ये एल्बुमिन, वसा, शर्करा तसेच अॅंटी-सेप्टिक तत्वे आढळतात. नागरमोथा हे चवीला तुरट व कडू असते. हे कफशामक आहे. नागरमोथाच्या मुळातील ग्रंथी ह्या औषधांमध्ये उपयोगी पडतात. १ ते ३ ग्राम मात्रेचे सेवन केले तरी चालते.

हे सूज दूर करते, लघवीच्या संदर्भात कोणताही आजार असेल तर त्याला मूळापासून नाहीसा करते, त्वचारोग म्हणजेच, खाज, खरूज, नायटा, अशा आजाराला पण समाप्त करते. त्याचबरोबर जर तुमची स्मरणशक्ति खूपच कमकुवत असेल, तुम्हाला गोष्टी लक्षात राहात नसतील, तर याचा उपयोग करून तुम्ही आपल्या स्मरणशक्तिला वाढवू शकता. त्याचबरोबर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर ती दूर करू शकता. मित्रांनो, आजकाल लोकांना संधीरोगाची समस्या असते. तुम्हाला जर गठिया म्हणजे संधिरोग रोगाची समस्या असेल, तुमच्यावर उपचार चालू असतील, तर या गवताच्या मदतीने तुम्ही तुमच्या वेदना दूर करू शकता. आजची ही माहिती खूपच महत्वपूर्ण आहे.

सगळ्यात प्रथम सूज कशा प्रकारे कमी करता येईल ते बघूया. ज्या जागी सूज आली आहे, हात, पाय, पाठ, टाच कोठेही तर तुम्ही नागरमोथा वाटून घेऊन तिथे त्याचा लेप लावा. तुम्ही बघू शकाल, २ ते ३ दिवसात तुमची सूज उतरून जाईल. त्यानंतर, लघवीसंबंधी कोणताही आजार असेल, म्हणजे थांबून थांबून थोडी लघवी होत असेल, लघवीच्या जागी आग होत असेल, किंवा वारंवार लघवी होत असेल, तर नागरमोथाच्या मुळांचा काढा बनवून प्यायल्यामुळे तुम्हाला आराम वाटेल, मूत्रविकार दूर होईल. त्यानंतर, त्वचारोग असेल, म्हणजेच खाज, खरूज, नायटा तर याची पाने वाटून जिथे तुम्हाला खरूज किंवा नायटा झाला आहे, त्या जागेवर हा लेप लावा.

लेप लावल्यामुळे त्वचारोग दूर होतो. तसेच, तुमची स्मरणशक्ति कमी झाली असेल व ती तुम्हाला वाढवायची असेल, तर नागरमोथाच्या मुळांचा रस व आवळ्याचा रस एकत्र करून तो सेवन केल्यामुळे तुमची स्मरणशक्ति वाढायला मदत होते. त्यामुळे बुद्धि प्रखर होते. रक्ताची कमतरता दूर होते.

तुमच्या लक्षात ठेवण्याची शक्ति वाढत जाते. गठिया म्हणजे संधीरोग ज्यामुळे चालायला तुम्हाला त्रास होत असेल, तर नागरमोथा गवताच्या मुळांच्या बियांची पाऊडर बनवून घ्या व अर्धा चमचा १ ग्लास पाण्याबरोबर सकाळी व संध्याकाळी प्या. त्यामुळे तुम्हाला आराम पडेल. हा अगदी साधा उपाय आहे. आजची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *