सलग ४ दिवस रिकाम्या पोटी आवळा ज्यूस पिण्याचे फायदे, जाणून घेतल्यावर थक्क व्हाल ह्याचे गुणधर्म बघून..

नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर आवळ्याचा ज्यूस म्हणजेच रस तुम्ही जर रिकाम्या पोटी घेतला तर त्याचे तुम्हाला काय काय फायदे मिळतात. आवळा एक औषधी आहे व आयुर्वेदात आवळ्याचे खूपच जास्त महत्व आहे. आपल्या स्वास्थ्यासाठी व आपल्या उत्तम तब्येतीसाठी, आपल्या सुंदरतेसाठी आवळा खूपच जास्त फायदेशीर आहे. आता आवळ्याचा ऋतु आलेला आहे. जशी थंडीची सुरुवात होते खूप चांगल्या प्रतीचे आवळे मार्केटमध्ये दिसू लागतात.

कमीत कमी ४ ते ५ महीने आवळ्याचा मौसम म्हणजेच ऋतु असतो. त्या कालावधीमध्ये आवळ्याचे सेवन जरूर केले पाहिजे. प्रतिदिनं एक आवळा जरूर खाल्ला पाहिजे, कोणत्याही रूपात मग तुम्ही आवळ्याची चटणी बनवा, आवळ्याचा मुरांबा बनवा किंवा आवळ्याची कैन्डी, सुपारी किंवा आवळ्याचा रस. कसे बनवायचे आहे ते सर्व मी या विडियोमध्ये दाखवणार आहे व कोणत्या आजारांवर फायदेशीर आहे ते पण सांगणार आहे. माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

सगळ्यात प्रथम आवळा कशा प्रकारे खरेदी करायचा आहे. नेहमी मोठ्या आकाराचा आवळा घ्या. पिकलेला आवळा घ्या. मी हे धुवून घेतले आहेत. नंतर एक एक आवळा कपड्याने पुसून कोरडा करून घ्या. जेवढा आवळा मोठा असेल, पिकलेला असेल तर तो गोड असतो व आंबटपणा त्यात कमी असतो. छोटा आवळा थोडा तुरट असतो. आवळा म्हणजे विटामीन सी चा खजाना आहे. आर्यनचा मोठा स्त्रोत आहे आवळा. नेहमी असा प्रयत्न करा की आवळ्याचा ताजा ज्यूस तुम्ही घेऊ शकाल. आता मार्केटमध्ये आवळा ज्यूस च्या मोठ्या मोठ्या बाटल्या तयार मिळतात.

चांगल्या कंपनीच्या या आवळा रसाच्या बाटल्या असतात. ज्या १ वर्षापर्यंत खराब होत नाहीत. त्याच्यात टिकाऊपणासाठी घातलेली रसायने असतात म्हणून, मी असेच म्हणेन की नेहमी ताजे बनवून घ्या. त्यामुळे तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळू शकेल. आता सगळ्यात आधी आवळा छोट्या तुकड्यात कापून घ्या. आवळा खाल्यामुळे आपल्या त्वचेवर एक चमक येते. केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. केसांना मजबूती देतो व केस आपले काळे, घनदाट होतात. आम्ही आवळे त्या ऋतुत किसून सुकवून ठेवतो. त्याची सुपारी बनवितो.

बद्धकोष्टता ही समस्या असेल, मूळव्याध असेल तर आवळा खाणे खूप फायदेमंद आहे. आवळ्याच्या सेवनाने आपली पाचनक्रिया चांगली होते. जास्त करून आपले सगळे आजार हे आपल्या पचनाशी निगडीत असतात. आवळा आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवतो, कारण आवळा विटामीन सी चा खजाना आहे. याच्या बिया पण उपयोगी असतात. लोक याची बी फोडून त्यातून जे काळ्या रंगाचे बी निघते ते खातात खूप लोकांचे असे म्हणणे आहे की त्यामुळे डोळ्याची दृष्टी वाढते, सुधारते. डोळ्याचे आजार दूर होतात. तुम्ही आवळा बारीक तुकडे करून ग्राइंडिंग जार मधून वाटून रस काढू शकता. नाहीतर आवळा किसून त्याचा रस काढू शकता.

२ चमचे रसपाण्याबरोबर सेवन करायचा आहे. आवळा गुणांचे भांडार आहे. चश्मा पण उतरू शकतो. रक्त शुद्ध करण्यात पण आवळा खूप उपयोगी आहे. तुम्ही आवडत असेल, तर आवळ्याच्या रसात थोडा मध घालू शकता. आवळ्यामुळे शारीरिक शक्ति वाढते. लघवीची आग होत असेल, तर आवळ्याचा रस जरूर घ्या. मी इथे आवळा किसून घेतला आहे. नंतर दाबून त्याचा गाळून रस काढा. पाण्यात रस मिसळून त्यात किंचित सैधव मीठ घालून थोडा वेळ (साधारण १ तास) ठेवून सेवन केले तर आवळ्याची पोषक तत्वे पाण्यात उतरतात व पिण्यासाठी तो चवदार लागतो.

मुरूमे, मासिक पाळी यासारख्या समस्यांमध्ये उपयोगी आहे आवळ्याचा रस. मधुमेह, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतो आवळा ज्यूस. चेहर्याववर सुरकुत्या, काळी वर्तुळे असतील तर दूर होतील कारण अॅंटी-ओकसिडेंट तत्वे आवळ्यात असतात. आवळ्यामध्ये अमिनो अॅसिड असतात ज्यामुळे वयाचा असर चेहर्या्वर पडत नाही.

६५ वर्षाच्या वयात तुम्ही ३५ वर्षाचे दिसता. आवळ्याचा रस जरूर घ्या. खाज, खरूज असेल तर नारळ तेलात आवळा ज्यूस मिसळून लावल्यामुळे फायदा होतो. खाण्यासाठी जितका फायदेशीर आहे तितकाच आपल्या सौंदर्या साठी वरदान आहे आवळा. आजची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *