सलग सात दिवस गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.

मित्रांनो गुळ आपल्या सर्वांच्या परिचित आहे. आयुर्वेदामध्ये देखील गुळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुळ आणि साखर यांचा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर करत असतो. मात्र गुळ आणि साखर यांच्यामध्ये फरक आहे. गुळाचे महत्त्व हे साखरेपेक्षा अधिक आहे. कारण साखर ही शरीरामध्ये गोडवा निर्माण करते,

गुळही गोडवा निर्माण करते. मग नेमका गुळाचा गोडवा आरोग्यासाठी चांगला आहे की साखरेचा गोडवा? तर मित्रांनो नक्कीच गुळाचा गोडवा हा साखरेपेक्षा अधिक शरीरासाठी आरोग्यदायी आहे. गुळाचा जर सलग सात दिवस आपण झोपण्यापूर्वी प्रयोग केला तर यामुळे बरेचसे आजार नाहीसे होऊ शकतात. नेमका कसा करायचा गुळाचा उपयोग आणि काय आहेत याचे फायदे? हे आपण जाणून घेऊ.

मित्रांनो गुळ हा एक उष्ण पदार्थ आहे थंडीच्या दिवसात आपल्या शरीरामध्ये उबदारपणा असणे किंवा गरमपणा असणे फार अत्यंत गरजेच असते. त्याकरिता गुळ हा अत्यंत उपयोगी असा पदार्थ आहे. थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वांना आवडते, कारण गुळात गरमी असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गरमी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे.

आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. तुम्ही जर रोज गुळ खाल्ला तर तुमचे स्वास्थ उत्तम राहते. आज आपल्याला हा गुळ खाल्ल्याने नेमके काय बदल होतात? काय फायदे होतात? हे पाहणार आहोत.  मित्रांनो तुम्ही सलग सात दिवस या गुळाचे सेवन केले तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे रिजल्ट पाहायला मिळतील. गुळ हे जर तुम्ही रोज खाल्लं तर तुमच्या शरीरातली जी पचन क्रिया आहे ती सुरळीत होते आणि पचनक्रिया सुरळीत झाले की तुम्हाला पोटाचे कुठलेही विकार होत नाहीत. हा गुळाचा सर्वत मोठा फायदा आहे.

म्हणजे अतिशय छोटीशी क्रिया आपण नियमित केली तर आपले पोटाचे सर्व आजार दूर ठेऊ शकतो. त्याचबरोबर ज्या महिला असतात, खासकरून महिलांना मासिक पाळीमध्ये अंगावर जाणे, त्रास होणे अशा घटना घडत असतात. यामध्ये गुळ हे अतिशय गुणकारी आहे. जर महिलांनी गरम दूध व गुळ याचं एकत्र सेवन जर मासिक पाळीच्या दरम्यान केलं तर महिलांना जो त्रास होतो अंगावर जाण्याचा तो त्रास अजिबात होणार नाही.

खुप साधा सोपा हा घरगुती उपाय महिलांनी करायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर तुम्ही रोज गुळाचे व्यवस्थित केलं तर तुमची त्वचा ही तेज बनते. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची पुरळ येणार नाही, पिंपल्स होणार नाही. मात्र यासाठी नियमित गुळाचे सेवन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्दी, खोकला नियमित येत असेल, वारंवार येत असेल तर यासाठी गुळाचा लाडू बनवायचा किंवा गुळाचा चहा बनवायचा आणि याचं सेवन करायचे.

यामुळे तुम्हाला वारंवार होणारी सर्दी, खोकला बंद होईल. खूप साधा, सोपा गुळाचा घरगुती उपाय आहे. त्याचबरोबर तुम्हाला दमा असेल किंवा थकवा लागत असेल, कुठलाही चढ चढला किंवा पायऱ्या चढल्या की दम लागत असेल, थकवा लागत असेल तर आपल्यासाठी गुळ हा रामबाण उपाय आहे.

आपण गुळाचे नियमित सेवन केले पाहिजे. गुळामुळे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण होत असते आणि याच्यामुळे तुमचा थकवा दूर होऊ शकतो. त्याचबरोबर हा जो गुळ आहे हा गुळ आणि आलं एकत्र सोबत गरम केलं आणि तयार होणार मिश्रण आपण खाल्लं तर याच्यामुळे तुमच्या गळ्याचे जे आजार असतील ते आजार दूर होऊ शकतात.

खूप साधे, सोपे गुळाचे उपयोग आहेत. याच्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप आराम मिळेल. गुळ हा थंडीमध्ये आवर्जून खावा. याच्यामुळे तुमच्या सांधेदुखीवर देखील फार चांगला परिणाम होतो. गुळ आणि तिळ आपण एकत्रित करून खाल्लं तर यामुळे सांधे भरभक्कम होतात. गुळाचे असे अनेक फायदे आहेत.

हे नियमित सात दिवस रात्री झोपण्यापूर्वी थंडीच्या दिवसात सेवन केले तर नक्कीच गुळाचे असे असंख्य फायदे शरीरासाठी लाभदायी ठरतील. जर तुमच्या शरीरातील रक्त अशुद्ध असेल किंवा रक्त शुद्ध होत नसेल तर यावरती देखील गुळ अतिशय गुणकारी औषध आहे. गुळामध्ये अनेक अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे तत्व असतात. त्यामुळे आपण गरम दूध आणि गुळ यांचे सेवन केले तर याच्यामुळे तुमच्या शरीरातले अशुद्ध रक्त आहे त्यावर याचा नक्कीच परिणाम दिसून येईल.

त्याचबरोबर लठ्ठपणा असतो, वजन वाढते यामध्येही गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी जर गुळ घातलं आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन केलं तर यामुळे तुमच्या पोटामधली चरबी आहे, लठ्ठपणा आहे तो नियंत्रित होऊ शकतो. असे कितीतरी या गुळाचे अनेक फायदे जाणून घेऊ शकतो. तर मित्रांनो नक्कीच गुळाचे सेवन करा. गुळ, तीळ यांचे सेवन करा किंवा गुळ शेंगदाणे याचे सेवन करा. मात्र गुळ आवर्जून आपल्या आहारामध्ये ठेवा. या गुळामुळे तुमच्या शरीराला नक्कीच फायदे होतील. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *