सर्दी, खोकला तसेच घसा, नाक, छाती यामध्ये जमा झालेला कफ, कफाचा दाट बडका एकाच वेळी शरीरातून बाहेर काढून टाकेल हा घरगुती उपाय…

नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्याबरोबर एक असा घरगुती उपाय घेऊन आले आहे जो तुमच्या खूपच उपयोगी पडेल. घरातील वस्तूंपासूनच आपण हा उपाय करणार आहोत व तो उपाय आहे तुमचा खोकला, सर्दी, कफ, दाट कफाचा बडका तसेच घशातील वेदना, बरगड्यांमधील वेदना, घसा दुखणे, घशाला सूज, घशात खरखर आहे त्यापासून त्वरित तुम्हाला आराम मिळेल. तर घरगुती वस्तूंपासून हा उपाय करायला मी दाखवणार आहे त्याचबरोबर मी २ ते ३ उपाय सांगणार आहे.

तुम्ही असे समजू नका की ते सगळे तुम्हाला रोज करून बघायचे आहेत. तुमच्याकडे ज्या वस्तु तुमच्या स्वयंपाकघरात असतील, त्याच वापरुन तुम्हाला हा उपाय करून बघायचा आहे. परंतु, उपयोग जरूर करून बघा, १०० टक्के तुमचा जुन्यात जुना खोकला, सुखा खोकला असो किंवा कफयुक्त खोकला असुदे, तुम्हाला त्वरित आराम पडेल. तर हा उपाय खोकल्यासाठी रामबाण आहे हे तुम्ही समजून घ्या. वायरस तुमच्या आजूबाजूला पण येणार नाही इतका जास्त याचा फायदा आहे ज्याचा तुम्ही विचारच केला नसेल. सगळ्यात प्रथम मी इथे घेतली आहे लसूण. लसूण आपल्या सगळ्यांच्या घरात कायमच असते. तुमच्या घरी पण असेल.

लसूण प्रकृतीने गरम असते. त्यामुळे तुम्हाला इथे लसूण खायची नाहीये. असा विचार करू नका की मी तुम्हाला लसूण खायला सांगणार आहे. लसणीच्या रसाचे काही थेंब तुम्हाला घ्यायचे आहेत. लसूणचा रस कसा काढायचा आहे. तुम्ही १५ ते २० लसूण पाकळ्या घेऊन मिक्सरवर त्याचा रस काढू शकता व गाळण्याने गाळून घेऊ शकता. नाहीतर मी दाखविते त्याप्रमाणे बारीक भोक असलेली किसणी घेऊन त्यावर लसूण किसून घ्या. त्याचा कीस करा व गाळण्यातून दाबून रस काढून घ्या. लसूण प्रकृतीने गरम असल्यामुळे जुन्यात जुना खोकला, कफ, बडका यापासून तुम्हाला सुटका मिळेल. इतकी जास्त लसूण फायदेमंद आहे.

आजचा कालावधी हा आपल्यासाठी थोडा कठीण आहे. जास्तीत जास्त आजार आता पसरत आहेत. थोडे जरी तुम्हाला जाणवले की आपला घसा दुखतो आहे, कफ दाट झाला आहे, छातीत जड वाटते आहे, तर लसणीचा प्रयोग जरूर केला पाहिजे. मी आता इथे लसूण किसून घेतली आहे व गाळून त्याचा रस काढला आहे. काही थेंब लसूणीचे घ्यायचे आहेत. थोडा जास्त बनवून ठेवू शकता. मी इथे लसणीचा रस घेतला आहे व त्यात आता मध घालायचा आहे. मध घातल्यामुळे ते मिश्रण स्वादिष्ट लागेल व दुसरे म्हणजे मध हा आपली रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यास मदत करतो. त्याचबरोबर लसूणीचा उग्र असा वास व थोडा तिखटपणा आहे त्यामुळे लहान मुले हा घेणार नाहीत म्हणून त्यात मध मिसळा.

१ छोटा चमचा लसूण रस आहे तर २ मोठे चमचे मध घ्यायचा आहे. मध घातल्यामुळे लहान मुले हा पटकन सेवन करतील. मधामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, घशातून कफ बाहेर पडण्यासाठी उपयोगी आहे. तुम्हाला दिवसातून २ वेळा घ्यायचे आहे. पण लक्षात ठेवा हे घेतल्यानंतर थंड पाण्याचे सेवन वर्ज्य आहे. लसूण गरम असल्यामुळे व मध गरम आहे त्यामुळे थंड पाणी पिऊ नये. १ छोटा चमचा मोठ्या माणसांनी घ्यायचा आहे. तुम्ही २ दिवस हे घेऊन बघा, जुन्यात जूना खोकला, घशातील सूज, वेदना खरखर ठीक करेल हा घरगुती उपाय. तुम्ही हे बनवून ठेवा. लहान मुले असतील तर १/२ चमचा द्या. जर परत परत हा त्रास झाला तर आपली रोगप्रतिकारशक्ति कमी होत जाते.

दुसरा उपाय म्हणजे आल्याचा रसाचे सेवन फक्त १/२ चमचा. साले काढून आले किसून घेणे. नंतर त्याचा रस काढा. त्यामध्ये २ चमचे मध घाला. हा उपाय तुमच्या शरीरात कफ तयार होऊ देणार नाही. तिसरा उपाय लवंग जी आपल्या स्वयंपाकघरात असते. यासाठी पाण्यात लवंग घाला. पाणी गरम करा व ते पाणी कोमट असताना घ्या. लवंग अॅंटी-सेप्टिक असते. लवंग रोगप्रतिकारशक्ति वाढवते. मधाबरोबर लवंग पाऊडर टाकून घेऊ शकता. दिवसातून ३ ते ४ वेळा लवंग घातलेले पाणी गरम गरम प्यायचे आहे. आमची ही माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *