संजीवनी बुटी याच्यापुढे अपयशी ठरली आहे, पृथ्वीवरचे अमृत आहे, कोठे दिसून आली तर सोडू नका…

नमस्कार, मित्रांनो. आपल्या भारत देशाची माती इतकी गुणकारी आहे, इतकी संपन्न आहे, की दगडांवर पण येथे औषधी वनस्पति उगवतात. मातीचा सुगंध आज पण कायम आहे. तुम्ही कुठेही राहत असाल, आपल्या भारत देशाची माती इतकी शक्तीशाली आहे की ती तुमच्यासाठी प्रकृती किंवा वातावरणानुसार औषधी वनस्पति म्हणजेच जडीबुटी निर्माण करते.

तर अशीच एक वनस्पति आहे, जी भारतातील सगळ्या भागांमध्ये उगवते, पण खास करून ती तुम्हाला जंगल, झाडी, किंवा रस्त्याच्या कडेला उगवलेली दिसून येईल. तुम्ही आपल्या घराच्या जवळपास ही वनस्पति नक्कीच बघितली असेल. आज आपण ज्या वनस्पतिबद्दल बोलत आहोत, त्या झाडाला मोठी मोठी फळे लागलेली असतात. या फळांना पण तुम्ही जरूर बघितले असेल. जिथे पाण्याचा भाग असतो, तिथे याचे उत्पादन सर्वाधिक होते.

तुम्ही तुमच्या घराच्या जवळ जर तलाव असेल, तर तिथे ही वनस्पति जरूर बघितली असेल. याला म्हणतात “इंद्रायण”. इंद्रायण ही आयुर्वेदातील नावाजलेली प्रसिद्ध औषधी वनस्पति आहे. त्याचे अनेक जाती आढळतात जसे की छोटी इंद्रायण, मोठी इंद्रायण किंवा जंगली इंद्रायण. जंगली इंद्रायण किंवा छोटी इंद्रायण असो, मोठी इंद्रायण असुदे ही जमिनीवर पसरणारी एक वेल आहे, जी १२ महीने मिळते म्हणजेच पूर्ण वर्ष बघायला मिळते.

त्याला अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे की पंजाबीमध्ये “ गुर्मनाक” म्हणतात, तर मराठीत इंद्रावडा म्हणतात, गुजरातीत “इंद्रवळा किंवा इंद्रक” म्हणतात, तर तेलगू मध्ये “चितीपापडा” म्हणतात, नेपाळीमध्ये याला इंद्रायनी म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर सांगा, त्यामुळे अन्य दर्शकांना पण याबद्दल माहिती मिळेल.

मित्रांनो, या वनस्पतिमध्ये फळ लागलेली असतात, जी स्वादाला तिखट व कडू असतात. गरम प्रकृती असलेले हे फळ आहे. पचायला हलके आहे. मित्रांनो, आयुर्वेदानुसार इंद्रायणच्या गुणांबद्दल बोलायचे झाले, तर इंद्रायण हे तीव्र रेचक आहे. ते कफ, पित्त याला समाप्त करते. हे फळ विषनाशक आहे. तसेच ते त्वचारोगाचा नाश करते. जर कोणाला वारंवार डोकेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी इंद्रायणच्या फळांचा रस किंवा साल, मूळ याला तिळाच्या तेलात उकळून त्या तेलाला जर डोक्यावर लावले व मालीश केले, तर या प्रयोगाने वारंवार होणारी डोकेदुखी ठीक होते.

मित्रांनो, याशिवाय पांढरे केस काळे करणारा हा एक प्राचीन आयुर्वेदिक उपाय आहे. याचा प्रयोग पूर्वीच्या काळी लोक खूप जास्त प्रमाणात करीत असत. नारळाच्या तेलात याच्या बिया शिजवून जर तुम्ही तुमच्या केसांना ते तेल लावले तर तुमचे केस काळे होऊ लागतात. याचे तेल तुम्हाला बाजारात पण मिळू शकते. जर तुम्ही हे तेल केसांना लावले तर केस पिकायचे थांबतील., केस पांढरे होणार नाहीत. इंद्रायण गठिया या आजारासाठी सगळ्यात रामबाण औषध आहे.

ज्यांच्या गुडघ्यात वेदना आहे, सांधेदुखी आहे त्यांच्यासाठी हे अमृतापेक्षा कमी नाही. मित्रांनो, सांधेदुखीमध्ये या फळांची मात्र १०० ग्राम घ्या. त्याबरोबर १० ग्राम हळद, व सैंधव मीठ त्यामध्ये मिसळून बारीक वाटून घ्या. त्यातील पाणी पूर्ण सुकवुन घ्या व २५० मिलिग्रामची एक याप्रमाणे गोळ्या तयार करा व त्यातील एक एक गोळी रोज सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे दुधाबरोबर रोज आजारी माणसाला सेवन करायला द्या तर सांधेदुखी म्हणजेच गठिया पासून ज्यांना सूज आहे, वेदना आहे ते थोड्याच दिवसात चांगला होऊन तो चालू लागेल.

पण याचा प्रयोग कोणी अनुभवी व जाणकार अशा वैद्याच्या देखरेखीखाली करा. तसेच हे दातांसाठी खूपच फायदेशीर आहे. जर दातात वेदना असतील, कीड असेल तर इंद्रायणच्या पिकलेल्या फळांची धुनी (जाळून धूर) दातांमध्ये घेतल्यामुळे दातातील कीड मरते व वेदनेपासून सुटका होते, आराम मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *