संजीवनी बुटी पण यापुढे अपयशी आहे, धरतीवरील अमृत आहे, कुठे मिळाली तर सोडू नका, लाख किंमतीची औषध यापुढे फेल आहेत…

नमस्कार मित्रांनो, एका अशा वनस्पतीबद्दल, अशा एका फुलाबद्दल माहिती देणार आहे ज्याचे धार्मिक दृष्टीकोनातून खूप जास्त महत्व आहे, खूपच पवित्र असे हे फूल मानले जाते. खूपच पवित्र असे हे झाड आहे. ह्याची सुंदर लाल रंगाची फुले पाहून तुम्ही समजला असाल आज मी तुम्हाला जास्वंदीच्या फुलांचे खूप फायदे सांगणार आहे. आपल्या इथे पूजेसाठी जास्वंदीची फुले वाहिली जातात. देवी पूजेला जर हे फूल वाहिले, तर मनोकामना पूर्ण होते. धार्मिक दृष्टीने महत्व आहे पण औषधी महत्व मी सांगणार आहे.

ही फुले मंदिराच्या अंगणात, आपल्या घरातील अंगणात, शेजारी दिसतात कारण सगळेच लोक ही फुले लावणे पसंत करतात. ,कारण जितके सुंदर हे दिसायला असते, त्यापेक्षा जास्त त्याचे औषधी गुणधर्म आहेत. तुम्हाला मी याचे एक एक करून फायदे सांगणार आहे. जास्वंद ज्याला चायना रोझ असेही म्हणतात. जास्त करून पांढर्‍या व लाल रंगाची जी फुले असतात, त्याचे आयुर्वेदात सगळ्यात जास्त महत्व आहे. ह्याची हायब्रिड फुले पण असतात, म्हणजेच गुलाबी व पांढर्‍या अशा मिक्स रंगाची, पण त्याचे इतके महत्व नाही.

तर सगळ्यात प्रथम जास्वंदीच्या फुलांना आपण लक्ष्मी मातेला वाहातो किंवा अर्पण करतो, असे म्हणतात की त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. घर सुख, धन, धान्य याने भरलेले राहाते. लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय फूल जास्वंदीचे आहे. मी इथे दुर्गा मातेला पण फूल वाहिले आहे. नवरात्रीच्या वेळी जरूर हे फूल वाहिले पाहिजे. घरात कशाची कमतरता पडत नाही. माझ्या घरी पण हे लावले आहे. आता मी तुम्हाला याचे औषधी फायदे सांगणार आहे.

मित्रांनो, काही लोक या फुलाचे सेवन करतात. जे लोक शारीरिक रूपाने अशक्त व दुर्बल आहेत, त्यांनी जास्वंदीच्या एक पाकळी चावून खाल्ली तर शारीरिक दुर्बलता कमी होते सशक्तपणा येतो. तसेच, आजकाल लोक केसांच्या गळतीमुळे हैराण आहेत. केस गळतात, वयाच्या आधी पांढरे होतात, केस लांब होत नाहीत तर
तुम्ही कोणत्याही तेलात म्हणजेच नारळ तेल, ऑलिव्ह तेल, त्या तेलात यातील २ फुले त्यात टाका, याच्या पानांचे पण औषधी गुणधर्म असतात.

२ फुले व पाने टाकून २ ते ३ दिवस उन्हात ही बाटली ठेवा. खूप जास्त तेल बनवून ठेवू नका, खराब होऊ शकते. नंतर त्या तेलाने केसांना मालीश केल्यामुळे केसांचे गळणे थांबेल, जास्वंदी तेल आपल्या केसांसाठी खूपच उपयोगी आहे. आजकाल मार्केटमध्ये जास्वंदीची फुले सुकवून त्याची पाऊडर बनविली जाते. लोक जो मेहेदीचा पॅक लावतात, त्यामध्ये जास्वंदी पाऊडर टाकली जाते. याची पाने व फुले त्वचारोगाला ठीक करतात. तेल बनविण्यासाठी मी ३ ते ४ पाने व २ फुले घेतली आहेत. फुले थोडा वेळ पंख्याखाली ठेवा, म्हणजे फुले व पाने सुकतील. ३ ते ४ दिवस उन्हात ठेवा.

आयुर्वेदिक औषधांमध्ये जास्वंदीच्या फुलांचा, पानाचा उपयोग केला जातो. जास्त करून लाल रंगाच्या व पांढर्‍या रंगाच्या फुलांचा उपयोग केला जातो. हे बघा ३ ते ४ दिवस उन्हात ठेवल्यावर फुले व पाने बाहेर काढून टाका व गाळून ते तेल डोक्याला मालीश करा. कोंड्याची समस्या असेल तर ती दूर होईल. पानांची पाऊडर पण मार्केटमध्ये मिळते. बाजारात शॅम्पू पण मिळतात. ज्या लोकांना मूतखडयाची समस्या आहे त्यांनी फुलांच्या २ ते ३ पाकळ्या चावून खा. याचा गुलकंद पण बनविला जातो. डोळ्याची दृष्टी उत्तम करतो हा गुलकंद. आमची ही माहिती आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *