संजीवनी बुटी पण याच्या तुलनेत अपयशी ठरेल- पृथ्वीवरचे अमृत आहे, कोठे आढळली तर जरूर उपयोग करा, दुर्लक्ष करू नका…

नमस्कार मित्रांनो.

तुम्ही सगळे कसे आहात. मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही जिथे कुठे आहात तिथे स्वस्थ राहा व मस्त राहा., आम्ही प्रत्येक दिवशी नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आजच्या या विडियोमध्ये मी तुम्हाला ज्या वनस्पतिचा परिचय करून देणार आहे ती वनस्पति खूपच खास आहे.

खास यासाठी आहे कारण ही वनस्पति नेपाळ, भारत इथे खूप जास्त प्रमाणात आढळते. जर तुम्ही भारतात राहात असाल, तर तुम्हाला ही तुमच्या आसपासच्या बाजारात म्हणजेच मार्केटमध्ये मिळू शकेल, जिथे भाज्या विकल्या जातात, तिथे तुम्हाला ही दिसू शकते. याचे नाव आहे “कुंदरू” म्हणजेच आपण याला “तोंडली” असे म्हणतो.

हे जे झाड असते ते अगदी क्षुल्लक असते. जिथे जंगल असते, जर तुमच्या घराच्या जवळपास जंगल असेल, तर तिथे तुम्हाला हे झाड आढळून येईल. ही एक मौसमी भाजी आहे जी दिसायला परवलासारखी दिसते. लोक याची भाजी, चटणी बनवितात व आवडीने खातात.

याचे जे नाव आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे. याला हिंदीत “कुंदरू, कुनली, तर गुजरातीत खोला म्हणतात, तर बंगालीत “निंबू” व पंजाबी मध्ये घोळ म्हणतात. ही जी वनस्पति आहे, जी भाजी आहे ही नेपाळ मध्ये पण होते. नेपाळमध्ये याला “कुंदी” असे म्हणतात. जर तुम्ही याला ओळखले असेल व याला दुसर्‍या कोणत्याही नावाने ओळखत असाल, तर कमेन्ट मध्ये जरूर सांगा.

सामान्यपणे लोक याच्या फळांचा उपयोग करतात. त्यांना वाटते की तोंडल्याची भाजी तब्येतीसाठी चांगली आहे. पण तुम्हाला सांगू इछितो, की तोंडल्याचे केवळ फळ नाही तर त्याची पाने, फुले सगळेच आपल्या स्वास्थ्यासाठी खूप फायदेमंद आहे. तुम्ही या वनस्पतीच्या मदतीने कानामधील वेदना ठीक करू शकता. डोकेदुखीची समस्या असेल तर त्यातून आराम मिळवू शकता. तसेच तुमच्या गुडघ्यामध्ये वेदना असेल, तर ठीक करू शकता.

त्याचबरोबर खाज, खरूज, नायटा तर त्याला ठीक करू शकता. तोंडात छाले पडले असतील, तर ते ठीक करू शकता. तर मी एकामागोमाग एक सगळ्याची माहिती देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघा. माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका. सगळ्यात प्रथम बोलूया तोंडात जर छाले झाले असतील तर कसा ठीकहोऊ शकतो. जर तुमच्या जीभेवर छाला झाला आहे, किंवा गालाच्या आतमध्ये कुठे छाला झाला असेल, तर तोंडल्याची फळे घेऊन ती चोखा.

तुम्हाला इथे जे दिसते आहे ती फळे म्हणजेच तोंडली तुम्हाला चोखायची आहेत. छाले बरे होतात. जर तुमच्या कानात वेदना असतील, तर आयुर्वेदानुसार तोंडल्यात असलेले औषधी गुण कानाच्या वेदनेत आराम देण्यात मदत करतात. तोंडल्याच्या झाडाच्या पानांच्या रसात मोहरीचे तेल 2 थेंब मिसळून ते कानात घाला तर कानाला आराम पडतो. जर तुमचे वारंवार डोके दुखत असेल, तर तोंडल्याची मुळ वाटून त्याचा लेप कपाळावर लावा. डोकेदुखी थांबते.

खूप कालावधीपासून जर तुम्हाला खरूज, नायटा हा त्रास असेल, तर त्वचारोगासाठी हा रामबाण उपाय आहे. तोंडल्याची पाने नारळ तेलाबरोबर शिजवा व गाळून घ्या. ज्या जागी खरूज, नायटा असेल त्या जागी लावा म्हणजे ठीक होईल. गुडघेदुखी असेल, तुम्ही सांधेदुखीचे रुग्ण असाल, तर तोंडल्याचे मुळ धुवून घ्या व ते वाटून प्रभावित भागावर लावा. असे केल्यामुळे वेदना व सूज कमी होते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *