संजीवनी बुटीचे दुसरे नाव आहे हे झाड – महिला आणि पुरुष दोघांनी जरूर जाणून घ्या…

आयुर्वेदात अशा बर्‍याच औषधी वनस्पतींचे वर्णन केले आहे, ज्या आपल्या तब्येतीसाठी खूप गुणकारी आहेत आणि यांच्या सेवनाने आपल्या शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाहीत. आज आम्ही अशाच एका औषधी वनस्पतीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे नाव आहे औदुंबर किंवा उंबर.

उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर व काकोदुम्बर. त्याला तळापासूनच उंबराची फळे लागतात. उंबर हा तसा लहान वृक्ष असून विविध लहान-मोठय़ा नद्यांच्या किनाऱ्यावर याची झाडे येतात. उंबराची साल व फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी वापर आहे.

जमिनीत खोलवर असलेल्या उंबराच्या मुळांचे पाणी युक्तीने काढावे. त्याला विविध हट्टी विकारांवर तात्काळ आराम देण्याचा विशेष गुण आहे. उंबर फळांचा उपयोग ज्या रोगात रक्त वाहते, सूज येते किंवा लघवीतून रक्त येणे, रक्ती आव, अत्यार्तव, गोवर, कांजिण्या अशा लहान-मोठय़ा रोगांत होतो.

उंबराचा चीक रक्ती आव तसेच अतिकृश लहान मुले वाढीस लागावी म्हणून देण्याचा प्रघात एककाळ असे. त्याकरिता चीकाचे दहा थेंब दुधाबरोबर द्यावे. उंबराच्या पानावर लहान फोड येत असतात. ते फोड दुधात वाटून दिल्यास गोवर कांजिण्या विकारात सत्वर आराम मिळतो. उंबराचे झाड अनेक प्रकारच्या आजारांवर लाभदायी आहे आणि आजार दूर करण्याचे गुणधर्म यात अधिक प्रमाणात आहेत. चला तर मग जाणून घेऊया, उंबरापासून होणारे फायदे:

उंबरचे कच्चे फळ तुरट पण आग शांत करणारे आहे. पिक्के उंबर हे रुचि वाढवणारे, गोड, थंड, पित्तशामक, तृषाशामक, श्रमपरिहार, बद्धकोष्टता मिटवणारे तसेच पौष्टिक आहे. याच्या मुळात रक्तस्त्राव थांबवणे आणि जळजळ कमी करणे असे गुण आहेत. उंबरांच्या कच्च्या फळांची भाजी बनवतात तसेच पक्के फळ खाल्ले जातात. त्याच्या सालीचे चूर्ण बनवतात तसेच अनेक प्रकारचे उपयोग होतात.

उंबराच्या नियमित सेवनाने शरीरात पित्त किंवा कफ संतुलित राहातात. त्यामुळे पित्त तसेच कफ हे विकार होत नाहीत. तसेच उदरात म्हणजेच पोटातील आग शांत होते. पित्त रोगामध्ये यांच्या पांनांचे चूर्ण बनवून त्यात मध मिसळून ते सेवन करणे फायदेशीर असते. उंबराची साल ग्राही आहे म्हणजेच ती कोणताही रक्तस्त्राव त्वरित बंद करते. त्याचबरोबर, मधुमेहात याचा फायदा होतो. उंबराच्या पानांचा रस मधाबरोबर घेतला तर मधुमेहापासून आराम मिळतो. लघवीतील साखरेचे प्रमाण यामुळे कमी होते.

उंबराच्या फांद्या किंवा काड्या दुधाबरोबर घेतल्या तर मूळव्याधीसाठी ते उत्तम औषध आहे. ज्यांना मूळव्याधीत रक्त पडत असेल, त्यांनी उंबराच्या ताज्या पानांचा रस सेवन केला पाहिजे. यांचे नियमित सेवन केल्यास त्वचेचा रंग उजळतो. हातापायांची त्वचा भेगा पडणे तसेच टाचांना भेगा पडणे, यावर उंबराच्या काड्या दुधात उगाळून त्याचा लेप लावला, तर खूपच आराम पडतो व त्या त्रासापासून सुटका होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *