श्री कृष्ण म्हणतात रोज सकाळी ही 3 कामे केल्यामुळे दारिद्र्य होते दूर, वास्तुशास्त्रानुसार सकाळी करा ही कामे…

नमस्कार, मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा परिवारात कोणतेही संकट येणार असेल, किंवा परिवारातील कोणत्याही सदस्यावर कोणतेही संकट येणार असेल, तर त्याआधी आपल्या घरात आपल्याला असे काही संकेत मिळतात, ज्याच्याकडे आपण कधीच दुर्लक्ष करू नये. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, रोज सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने कोणती कामे केली पाहिजेत, ज्यामुळे त्याच्या घरात सुख आणि समृद्धि टिकून राहील. असे कोणते संकेत आहेत, जे आपल्या घरावर येणार्‍या संकटाची आपल्याला आधीच सूचना देतात.

हिंदूशास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाच्यानुसार व्यक्तिला त्याच्या कर्मानुसार फळ प्राप्त होते. चांगले कर्म करण्यासाठी, जीवनात सफलता मिळवण्यासाठी, आपल्या सगळ्यांनाच नियम, कायदा यांचे पालन करून मार्गक्रमण केले पाहिजे. सर्वप्रथम, व्यक्तिला सूर्य उगवण्यापूर्वी उठले पाहिजे, कारण हिंदूशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे, की ज्या व्यक्तिला सूर्यदेवता स्वत: येऊन जागे करतात, त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही चांगले काही घडत नाही. त्यामुळे व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवाची पुजा, जप, ध्यान हे रोज केले पाहिजे. सकाळी उठल्यावर आपल्या घरातील सगळ्या खिडक्या, दरवाजे उघडले पाहिजेत, जेणेकरून, सूर्याची किरणे तुमच्या घरात प्रवेश करू शकतील.

घराच्या अंगणाची सफाई उत्तम रीतीने केली पाहिजे, ज्यामुळे माता लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होईल. सकाळी उठल्यावर, प्रथम देवाचे नाव आपल्या मुखात आले पाहिजे. त्याचे आभार मानले पाहिजेत व म्हटले पाहिजे, “हे देवा तुमच्यामुळे मला हे जीवन प्राप्त झाले आहे. तुमच्यामुळे मला ही सुंदर सकाळ बघण्याची संधि मिळाली आहे. तुमच्यामुळे मला माझ्या जीवनात योग्य मार्ग निवडता आला आहे. हे प्रभू, तुमची कृपा माझ्यावर सदैव ठेवा. जर माझ्याकडून काही चूक झाली, तर कृपया क्षमा करा.

मी नेहमी सत्याच्या मार्गाने चालेन अशी कृपा करा. जमिनीवर पाय ठेवायच्या आधी, धरतीमातेची प्रार्थना करा, की हे माते मला योग्य मार्ग दाखव. सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, करमुले तो गोविंदम, प्रभाते करदर्शनम असा जप करा. स्वत:चे हात सकाळी बघा. त्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी, सरस्वती यांची कृपादृष्टी होईल. सकाळी सूर्यादेवाला जल अर्पण करा. जाणून घेवूया त्या गोष्टी ज्या तुमचे जीवन बदलून टाकतील.

रात्री झोपताना आपले डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवून झोपा. त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल. शास्त्रानुसार, संध्येनंतर कधीही भोजन करू नये. सकाळी ब्रम्हमुहूर्तावर उठले पाहिजे. म्हणजेच सूर्योदयापूर्वी. ब्रम्हमुहूर्तापासून सकाळी ७ वाजेपर्यंत, स्वत:चे मन भक्ति मध्ये गुंतवा. तांब्याच्या भांड्यातून सूर्यादेवाला अर्घ्य द्या. लहान मूल असेल, तर त्याला अवश्य सांगा, की तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी दे, म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास होईल.

सकाळी जसे तुम्ही स्नान करून पवित्र होता, तसेच आपले घर, दरवाजा, खिडकी स्वछ ठेवा. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.. तुमच्या घरात निवास करेल. जर रोज शक्य नसेल, तर आठवड्यातून एकदा तरी गोमुत्राने आपले घर स्वछ करा. मिठाच्या पाण्याने घराची स्वछता करा. त्यामुळे तुमचे शत्रू तुमचे काही वाईट करू शकणार नाहीत. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या ज्यामुळे तुमचे स्वास्थ्य चांगले राहील.

तुळशीला पाणी द्या त्यामुळे तुमच्या घराचे रक्षण होईल व सुख समृद्धि कायम राहील. घरावर जर संकट येणार असेल, तर तुळशीचे रोप तुम्हाला संकेत देते, ते सुकते. घरात कधीही काटे असलेली झाडे ठेवू नका. हिरवीगार झाडे लावा. माता पित्याचे स्थान देवाच्यानंतर आहे. देव सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने माता पिता आपल्याला दिले. त्यामुळे रोज पाय स्पर्शून त्यांचा आशिर्वाद घ्या. त्याचा आदर सन्मान करा. गाईला चपाती द्या ज्यामुळे तुमच्या घरात अन्नाची कमतरता कधीच पडणार नाही. समृद्धि घरात राहील.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *