श्रीकृष्ण म्हणतात चांगली वेळ येणार असेल तर हे ७ शुभ संकेत मिळतात…

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. जीवन मृत्यू, नुकसान फायदा, सुख आणि दू:ख हे सर्व जीवनाची महत्वपूर्ण अंग आहेत. कधी जीवनात आनंदाचे ऊन असते, तर कधी दू:खाचे ढग असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उतार-चढाव येत असतात. हे सर्व समयचक्रामुळे होते. वेळेपेक्षा महत्वाचे काही नाही. वेळ आली की सर्व झुकतात. तुम्ही तुमच्या जिवनात बर्‍याच लोकांना आकाशातून जमिनीवर म्हणजेच यशाकडून अपयशाकडे येताना पाहिले असेल, तसेच रंकाला राजा बनताना बघितले असेल.

वेळ हे असे एक हत्यार आहे, ज्याचा घाव धारधार असतो, तो कोणीही भरून काढू शकत नाही. पण आपण हे कसे जाणून घेऊ शकतो, की आपली वेळ कशी येणार आहे. वेळ म्हणजेच समय आपल्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडेल, की संकटांची मालिका घेऊन येईल. असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उत्पन्न होत असतील. म्हणून, आजच्या या विडियो मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, काही असे संकेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या येणार्‍या शुभ काळाविषयी माहिती मिळू शकेल.

जेव्हा नारदमुनि वैकुंठाला पोहोचले, तेव्हा त्यांनी भगवान श्रीहरीविष्णुंना या संकेताविषयी विचारले होते, तेव्हा श्रीहरीविष्णुंनी त्यांना सांगितले की ते स्वत: मनुष्याजवळ असे काही संकेत पोहोचवतात की ज्यामुळे त्यांना त्यांच्या येणार्‍या काळाविषयी माहिती मिळते. ते संकेत प्रकृतीद्वारे, पशूद्वारे, शुभसंकेताद्वारे किंवा माझ्या भक्तांकरवी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. फक्त व्यक्तीने ते जाणून घेतले पाहिजेत.

चला तर मग तुम्हाला सांगतो, त्या संकेतांविषयी जे स्वत: भगवान विष्णुंनी सांगितले आहेत. परंतु, त्याआधी जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर जरूर करा. शेअर आणि लाइक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक माहिती मिळू शकेल. पहिला संकेत: जर तुमचे डोळे ब्रम्हमुहूर्तावर उघडले, म्हणजेच तुम्हाला जाग आली व तुम्हाला ईश्वराचे स्मरण झाले, किंवा तुम्हाला असे वाटत असेल, की तुम्हाला कोणीतरी कोणत्यातरी दिशेला घेऊन जात आहे, तर समजून जा तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवनाचा योग्य मार्ग मिळणार आहे.

दूसरा संकेत: तुम्हाला जर अशी जाणीव होत असेल, की काही वेळा तुमचे मन काहीही कारण नसताना प्रसन्न राहात असेल, तुमचा चेहरा हसरा होत असेल, हे संकेत आहेत तुमच्या जीवनात आनंद खुशी येण्याचे. अशा वेळी आपण ज्याचा विचार केला नसेल, अशा चांगल्या गोष्टी कानावर येतात व घडतात. मनाची प्रसन्नता हा सगळ्यात मोठा शुभ संकेत आहे. तिसरा संकेत: जर तुमच्या घरात किंवा घराजवळ गोमाता म्हणजेच गाय परत परत काही खायला येत असेल किंवा माकड तुमच्या घरातून काही वस्तु पळवून नेत असेल, मांजर तुमच्या घरात पिल्लांना जन्म देत असेल, किंवा पक्षी तुमच्या अंगणात आपले घर बांधत असतील, असे शुभ संकेत हे दर्शवितात की तुमचा येणारा कालावधी तुम्हाला बलवान बनवेल.

चौथा संकेत: लहान मुलांच्या हृदयात ईश्वर वास करतात असे आपण मानतो. जर कोणी लहान मूल, कन्या, तुम्हाला बघून वारंवार हसत असेल, किंवा तुमच्या घरात त्यांचे आगमन झाले किंवा ते तुमच्या अंगणात आनंदात खेळत असतील, तर हा शुभ संकेत आहे. तुमचे जीवन नवीन खुशीने भरणार आहे. पाचवा संकेत: बर्‍याच दिवसापासून चाललेले खर्च, अकारण येणारी संकटे जर दूर होत असतील व पैशांचे नवीन स्त्रोत जर समोर येत असतील, तर हे शुभ संकेत आहेत असे समजावे. तुमचा वाईट काळ संपला आहे. पैसा तुमच्या घरात टिकून राहील. लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होईल.

सहावा संकेत: पूजेच्या थाळीत फुले, हार, चन्दन यांचे पडणे, तसेच देवाची मूर्ति तुमच्याकडे बघून हसते आहे असा भास होणे, घरात प्रिय पाहुण्यांचे आगमन , महिलांचे डावा व पुरुषांचा उजवा डोळा लवणे किंवा फडफडणे शुभ समजले जाते. सातवा संकेत: तुम्ही सकाळी घरातून काहीतरी शुभ कार्यासाठी निघालात व तुम्हाला गो-मातेचे दर्शन झाले किंवा साधू पुजारी यांचे दर्शन झाले, आशीर्वाद मिळाला तर तो शुभ संकेत आहे. तुम्ही ज्या कामासाठी निघाला आहात, ते यशस्वी होईल. आठवा संकेत: संध्याकाळी पाण्याने भरलेले किंवा दुधाने भरलेले भांडे किंवा मिठाई तुम्हाला कोणाकडून मिळाली, तर तो शुभ संकेत आहे. तुमच्या जीवनात शुभ घडणार आहे.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *