श्रीकृष्ण म्हणतात घरातील या ५ वस्तु दुसर्‍याला दिल्यामुळे घरात येते दारिद्रय | वास्तुशास्त्र

नमस्कार, तुमचे स्वागत आहे. आपल्याला लहानपणापासून असे शिकवले जाते, की कोणाची मदत करणे, गरजवंताना दान देणे, किंवा कोणत्याही व्यक्तीने काही मागितले तर त्याला कधी नकार देऊ नये, परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काही अशा वस्तु आहेत, ज्या तुम्ही तुमच्या घरातून कधीही कोणाला देऊ नयेत., कारण या वस्तु दिल्यामुळे तुम्ही स्वत: तुमच्या घरातील सुख आणि समृद्धि दुसर्‍या कोणाला देत आहात.

विष्णुपुराणात काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपण चुकूनही दुसर्‍याला देऊ नयेत. कारण या वस्तूंबरोबरच माता लक्ष्मी घरातून निघून जाते. तुम्ही सगळे जाणताच की आपल्या जीवनात माता लक्ष्मीची उपस्थिती किती आवश्यक आहे. माता लक्ष्मीच्या कृपेनेच प्रत्येक घरात धन, वैभव, सुखशांतीचे आगमन होते. जर माता लक्ष्मी काही कारणाने नाराज झाली किंवा रागावली तर आपल्या जीवनावर त्याचे वाईट परिणाम बघायला मिळतात.

जर तुम्हाला पण असे वाटत असेल, की माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात उपस्थित राहावी व तुम्हाला तुमच्या घरात धन आणि वैभव याची कमतरता जाणवू नये, तर तुमच्या घरातून कधीही या वस्तु दान करू नका. या पोस्टला लाइक जरूर करा व कमेन्ट बॉक्स मध्ये “जय माता लक्ष्मी” जरूर लिहा. तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तु आहेत ज्या चुकूनही कोणाला दान करू नयेत.

सगळ्यात पहिली वस्तु म्हणजे पत्नीचे दागिने- आभूषणाची देवी माता लक्ष्मीला मानले जाते. म्हणून जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता, तेव्हा माता लक्ष्मीची उपासना करून ते परिधान करता. तुमच्या पत्नीचे दागिने तुमची समृद्धि दर्शवतात. म्हणून ते कधीही दान करू नका. त्यांचे मंगळसूत्र, तोरड्या कधीही दान करू नका किंवा उधार देऊ नका. समृद्धि घरातून निघून जाते.

दुसरी वस्तु म्हणजे झाडू. झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू स्वछता आणि समृद्धीची निशाणी आहे. ही घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकते. म्हणून झाडू कधीही कोणाला देऊ नये. माता लक्ष्मी स्वछ जागेवर टिकून राहते. तिसरी वस्तु म्हणजे संध्याकाळच्या वेळी दूध किंवा दही, तांदूळ, नारळ पीठ यासारख्या पांढर्‍या वस्तु कधीही कोणाला देऊ नयेत. शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे, की पांढर्‍या वस्तूंना वाईट नजर लवकर लागते. म्हणून, सूर्यास्थानांतर आपल्या घरातील या वस्तु कोणाला दान करू नयेत. खूप जरूरी असेल तर बाजारातून खरेदी करून द्या.

चौथी वस्तु म्हणजे पैसे. तसे तर माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. ज्या घरात धनाची वृद्धी होते, त्या घरात माता लक्ष्मीची कृपा सदैव असते. म्हणून आपल्या घरातील धन सणाच्या दिवशी किंवा एकादशीला तर चुकूनही कोणाला देऊ नये.

पाचवी वस्तु- माता लक्ष्मी धनाची देवी आहे. संपन्नता वैभव देणारी आहे. ममतेची मूर्ति आहे तसेच अन्नपूर्णा आहे. म्हणूनच आपण अन्न ग्रहण करण्यापूर्वि देवीचे आभार मानतो. स्वयंपाकघराची शुद्धता आणि संपन्नता तितकीच जरूरी आहे जितके धन आवश्यक आहे. त्यामुळे पोळपाट आणि लाटणे ही आहे पाचवी वस्तु. या वस्तु कधीही उधार किंवा उपयोगासाठी देऊ नये. नवीन वस्तु खरेदी करून देऊ शकता.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *