शेंगदाण्याचे काही दाणे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे, शेंगदाणे खाण्याची ही पद्धत माहिती असली पाहिजे….

आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे काय फायदे आहेत व ते कशा प्रकारे खाल्ले पाहिजेत ते सांगणार आहे. केव्हा खाल्ले पाहिजेत, कशा प्रकारे खाल्ले पाहिजेत व त्याचे काय गुणधर्म असतात हे सांगणार आहे. सर्वात प्रथम आपण बघून घेऊया की ज्याला आपण टाइम पास शेंगदाणे म्हणून खातो, ते किती फायदेशीर आहेत. शेंगदाण्यांना गरिबांचा काजू, गरिबांचा बदाम म्हटले जाते. बदामाप्रमाणेच पोषकतत्व ह्या शेंगदाण्यात असतात.

जर तुम्हाला स्वत:च्या शरीराला स्वस्थ ठेवायचे असेल, तर एक मूठ पाण्यात भिजलेले शेंगदाणे सेवन जरूर करा. खूप महाग नसलेले हे शेंगदाणे आपण सहज खरेदी करू शकतो. हे सगळ्या प्रकारच्या पोषकतत्वांची कमतरता दूर करतात. पाण्यात भिजवलेल्या शेंगदाण्यांचा खूपच फायदा होतो. मी इथे १ मूठ शेंगदाणे घेतले आहेत व ते मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता, सकाळी पाण्यात भिजवलेले शेंगदाणे मोठे होतात. पाणी वेगळे करून तुम्ही हे शेंगदाणे खाऊ शकता. तुम्ही हे शेंगदाणे २ किंवा ३ प्रकारे खाऊ शकता. मी तुम्हाला इथे ती पद्धत सांगणार आहे कशा प्रकारे तुम्हाला ते खायचे आहेत.

शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, विटामीन ई असते, त्याचबरोबर विटामीन बी ६, आर्यन, झिंक असते. शेंगदाणे खाल्यामुळे आपल्या शरीरात ताकद तर येतेच त्याचबरोबर पोटासंबंधी असलेले सगळे आजार दूर होतात. जर तुम्ही एक मूठ शेंगदाणे नियमित खाल्लेत, तर तुम्हाला बद्धकोष्टता होणार नाही, पचन चांगले राहील. जेव्हा आपले पचन चांगले असते, चयापचय क्रिया उत्तम असते, तेव्हा कोणतेही आजार आपल्या शरीराच्या जवळपास फिरकत नाहीत.

गर्भवती महिलांनी पाण्यात भिजवलेले शेंगदाणे एक मूठ जरूर खाल्ले पाहिजेत. त्यामुळे गर्भवती महिलेचे व शिशुचे पोषण होते, वाढ होते. एक सर्वसामान्य परिवारातील व्यक्ति बदाम महाग असल्यामुळे सेवन करू शकत नाही, तर आपण रोजच्या जेवणात शेंगदाण्याचे सेवन जरूर केले पाहिजे.  हाडांचे दुखणे, कंबरदुखी, गुडघेदुखी त्यांनी शेंगदाणे जरूर खाल्ले पाहिजेत. त्यांनी शेंगदाणे गुळाबरोबर खाल्ले तर उत्तम. गुळात आर्यन असते, जे आपली हाडे मजबूत करते व ज्यांची हिमोग्लोबिन पातळी कमी आहे, त्यांनी गुळाचे सेवन जरूर केले पाहिजे. मधुमेही रुग्णानि गूळ खाऊ नये.

ज्यांना मधुमेह नाही त्यांनी मात्र १ मूठ शेंगदाणे आणि गुळाचा एक मध्यम तूकडा याचे सेवन जरूर करावे. मी दाखवला एवढाच तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. आपल्या पूर्ण परिवाराला भिजलेले शेंगदाणे सेवन करायला देऊ शकता. घरातील सर्व सदस्यांना एक मूठ भिजलेले शेंगदाणे व गूळ खायला द्या.

गोड आवडत नसेल तर तुम्ही या शेंगदाण्यात बारीक चिरून टोमॅटो, कांदा, काकडी घालून खाऊ शकता. कोणत्याही प्रकारे भिजलेल्या शेंगदाण्याचे सेवन करू शकता. जसे आपण पीनट चाट बनवतो तसे बनवू शकता. ज्यामध्ये तुम्ही टोमॅटो, काकडी, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू व शेव घालून सेवन करू शकता. त्यामुळे सगळ्या प्रकारची प्रोटेन्स तुमच्या शरीरास मिळतील.

तब्येतीसाठी खजाना आहेत हे शेंगदाणे. ज्यांना दूध आवडत नसेल किंवा पचत नसेल, त्यांनी १ मूठ भिजलेले शेंगदाणे जरूर खाल्ले पाहिजेत, ज्यामुळे दुधाची कमी भरून निघेल. शेंगदाण्यात अॅंटी-एजिग तत्व असतात, त्यामुळे त्वचेवर तजेलदारपणा येतो, व सुरकुत्या येत नाहीत. शेंगदाणे आपल्या त्वचेची मुलायमता टिकवून ठेवतात. त्यामुळे चेहर्‍यावर वयाच्या खुणा दिसत नाहीत. शरीरात स्फूर्ति राहाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *