शुगर 400 असो की 500, होईल नॉर्मल, फक्त हा उपाय करावा लागेल; डॉ स्वागत तोडकर…

रक्तातील वाढलेली शुगर कमी करण्यासाठी करा हा घरगुती उपाय. मित्रांनो अनेकजण या रक्तशर्करेमुळे त्रस्त आहेत. बदलते खानपान, इनऍक्टिव्ह जीवनशैली, लठ्ठपणा, ताणतणाव युक्त जीवन किंवा अनुवंशिकता या कारणामुळे अनेकांना मधुमेहाचा त्रास सुरू होतो. वास्तविक मधुमेह हा काही आजार नसतो.

आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारपद्धतीमुळे ही व्याधी आपल्या मागे लागते. म्हणूनच जीवनशैलीत आवश्यक ते बदल करून आणि आजचा हा उपाय करून रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात आणता येते. शुगर कंट्रोल करणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला एकूण दोन वस्तु आवश्यक आहेत.

त्यातील पहिला घटक म्हणजे कोरफड. कोरफडमध्ये अँटीइंफ्लेमेंटरी आणि अँटी हायपरग्लायसोमिक गुणधर्म असतात. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते. याशिवाय कोरफडीच्या सेवनाने जखमा देखील त्वरित भरतात. आपण एक वेळच्या वापरासाठी मध्यम आकाराच्या पानाचा साधारण दोन इंच तुकडा घ्यायचा आहे.

पानाच्या सपाट बाजूचे आवरण देखील कापून बाजूला करायचे आहे. यानंतर याचे छोटे छोटे काप करून हे कोरफडीचे जेल एका वाटीत घ्यायचे आहे. ग्रामीण भागात कोरफड सहजपणे उपलब्ध होते. त्या कोरफडीचे ताजे पान तोडून ते किमान पाच ते सहा तास टांगते ठेवावे. जेणेकरून त्यामधील पिवळा आणि अतिकडवट द्रव पुर्णपणे पानामधून निथळून जाईल. शहरी भागामध्ये अनेकांच्या कुंडीमध्ये कोरफड उपलब्ध असते आणि ते ही नसल्यास आयुर्वेदिक मेडिकल मध्ये रेडिमेड कोरफडीचा रस उपलब्ध असतो.

पण त्यामध्ये टिकाऊपणा वाढवण्यासाठी प्रिझरव्हेटिव्ह मिसळवलेले असतात. त्यांचा शरीरावर दुष्परिणाम टाळण्यासाठी शक्यतो फ्रेश ऍलोव्हेरा मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या उपायासाठी लागणारा दुसरा घटक म्हणजे एक कप ताक. ताक घेताना बाजारात रेडिमेड मिळते ते न वापरता घरगुती आणि देशी गाईच्या दुधापासून बनवलेले असल्यास आपल्याला उत्तम रिजल्ट मिळतील.

या ताकामध्ये आपण काढलेला जेल ऍड करायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे. ताक वापरताना ते अति थंड नसावे. असा हा आपला उपाय तयार होईल. याचे सेवन सकाळच्या नाष्टाच्या अगोदर किंवा दुपारच्या जेवणा अगोदर करावे.

रात्री हा उपाय करू नये. हा उपाय तुम्ही सलग सात दिवस करून नंतर तुमची शुगर चेक करून बघा तुम्हाला नक्कीच कमी झालेली आढळेल. जेव्हा केव्हा तुमची शुगर वाढेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला महागड्या गोळ्या खाण्याची वेळच येणार नाही. पण याचा प्रयोग एखाद्या जाणकार वैद्याच्या देखरेखीखाली केला पाहिजे. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *