शरीरावरचे अनावश्यक केस फक्त 1 मिनटात काढून टाकण्याचा घरगुती उपाय…

मित्रांनो आपल्या शरीरावर अनावश्यक केस असतील तर आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि महिलांच्या मध्ये हे कारण आहे की, एस्ट्रोजन हार्मोन असंतोलीत झाल्यामुळे ही गोष्ट घडत असते. आपण भरपूर केमिकल्स वापरून शरीराला इजा करतो. त्या पेक्षा मी आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही पहा आणि तो उपाय एकदा करून पहा तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्कीच दिसतील.

मित्रानो आपल्याला ह्या उपायांसाठी लागणार आहे साधे खोबरेल तेल, त्याच प्रमाणाने खाण्याचा सोडा व लिंबूचा रस. ह्या तिन्ही घटकांचे आपल्याला सम प्रमाण घ्यायचे आहे. एका वाटीमध्ये आपल्याला एक चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे, त्यात एक चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणामध्ये एक चमचा साधे खोबरेल तेल घालायचे आहे.

हे चांगले मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहे आणि हे चांगले मिक्स झाल्यावर ज्या ठिकाणी अनावश्यक केस आहेत त्या भागावर लावायचं आहे. साधारणता वीस मिनिटे तसेच राहू द्या ते सुकू द्या, सुकल्याच्या नंतर कपड्याच्या साह्याने पुसून घ्या. त्यासाठी कोमट पाणी वापरले तर बेस्ट राहील. हे मिश्रण लावण्यासाठी तुम्ही कापूस किंवा कॉटन चे कापड वापरू शकता, हा झाला पहिला उपाय. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीन दिवस करायचा आहे.

ह्या नंतर दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे, त्यासाठी आपल्याला लागणार आहे. एक चमचा तुरटी पावडर, त्यामध्ये एक चमचा गुलाब जेल मिक्स करा व त्याची पेस्ट बनवा व ज्याठिकाणी अनावश्यक केस आहेत. त्या भागावर लावा व वीस मिनिट ते सोकू द्या. हा उपाय आपल्याला तीन दिवस करायचा आहे, त्या नंतर ते केस निघून जातील.

त्या नंतर चा उपाय हा अत्यंत गुणकारी उपाय आहे, ह्या उपायांसाठी आपल्याला तीन गोष्टी लागणार आहेत पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे “हळद ” दुसरी गोष्ट ” बेसन पीट” आणि तिसरी गोष्ट” दही” आपल्याला ह्या तीन घटकांचे सम प्रमाण घ्यायचे आहे. जर का एखादा घटक एक चमचा घेतला तर सगळे घटक आपल्याला एक चमचा घ्यायचे आहेत, हे चांगले एकजीव करून घ्या , बेसन पीट आणि हळद याचा वापर अनावश्यक केस काढण्यासाठी पूर्वी पासून करत आहेत.

ही तयार झालेली पेस्ट कापसाच्या साह्याने जिथे अनावश्यक केस आहेत त्या भागावरती लावायची आहे आणि ते वाळल्या नंतर धुवून टाकायची आहे. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याची त्वच्या खूप सेन्सिटिव्ह आहे अश्या लोकांनी वैद्यकिय डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *