शरीरात कोणत्याही प्रकारची गाठ असुदे, लहान किंवा मोठी, बर्फाप्रमाणे वितळून जाईल या औषधी जडीबुटीने

नमस्कार मित्रांनो. मी तुमचा मित्र परत एकदा हजर आहे तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन. मित्रांनो, जेव्हा पावसाळयाचा ऋतु असतो, तेव्हा सगळीकडे आपल्याला हिरवळ दिसून येते. त्याचे कारण आहे सगळीकडे नवीन नवीन झाडांचे उगवणे. त्यामुळे सगळीकडे हिरवे हिरवे गालिचे दिसतात. जेव्हा पावसाळ्याचा ऋतु येतो, तेव्हा आपल्या आसपास कितीतरी प्रकारच्या विभिन्न अशा औषधी वनस्पति आपोआप उगवतात. यापैकी काही वनस्पति औषधी असतात ज्याचा औषधांसाठी उपयोग केला जातो.

तर अशीच एक वनस्पति आहे जी वर्षा ऋतुत संपूर्ण भारत देशात आढळून येते. तुम्ही ही वनस्पति तुमच्या घराच्या जवळपास, मोकळ्या मैदानात किंवा रस्त्याच्या कडेला जरूर बघितले असेल. हो, आम्ही बोलत आहोत “चिरचिटा” या वनस्पतिबद्दल. याला कितीतरी लोक “अपमार्ग” पण म्हणतात. ही एक खूपच गुणधर्म असलेली औषधी वनस्पति आहे ज्याचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषध म्हणून उपयोग केला गेला आहे. या वनस्पतीची काही इतर नावे देखील आहेत. याला गुजरातीत “अख्रोड” तर बंगालीमध्ये चिरचिटी असे म्हणतात.

पंजाबीमध्ये “कुत्री” तर मराठीत “अघाडा” म्हणतात. या वनस्पतीला नेपाळमध्ये दतीवण असे म्हणतात. जर तुम्हाला याचे कोणते अन्य क्षेत्रीय नाव माहीत असेल, म्हणजेच ते तुमच्या क्षेत्रात प्रचलित असेल, तर कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. मित्रांनो, ही वनस्पति खूपच गुणकारी असते. या वनस्पतीच्या साहाय्याने तुम्ही गुडघ्याचे दुखणे असेल, हाडांमध्ये वेदना असतील तर ते ठीक होऊ शकते.

दातांमध्ये कीड असेल, तर दातांमध्ये वेदना असेल तर ठीक होऊ शकते. याच्या मदतीने तुम्ही मूळव्याध ही समस्या ठीक करू शकता. जर कुठे शरीरावर घाव झाला असेल, जखम झाली असेल व घाव लवकर भरून येत नसेल तर घाव ठीक करू शकता. तुम्ही या वनस्पतीच्या मदतीने तोंडात जर छाले पडले असतील, तर ते ठीक करू शकता. त्वचारोग असुदे म्हणजेच खाज, खरूज, नायटा असेल तर ते पण ठीक होते. याची पाने वाटून खाज, खरूज, नायटा यावर लावले असता आराम पडतो.

सगळ्या प्रकारचे त्वचारोग याच्या मदतीने तुम्ही ठीक करू शकता. अघाड्याच्या पानांचा काढा बनवून गुळण्या केल्यामुळे तोंडात आलेले छाले ठीक होतात. अघाड्याचा उपयोग घाव भरून येण्यासाठी व ठीक होण्यासाठी करता येतो. अघाड्याचे मूळ तिळाच्या तेलात शिजवून गाळून घ्या व घाव असेल त्यावर लावा तर घाव किंवा जखम खूप लवकर बरी होते व वेदना कमी होतात. मूळव्याधीचा त्रास असेल, तर अघाडा या व्याधीवर रामबाण उपाय आहे.

अपमार्गची ६ पाने व ५ काळ्या मिरीचे दाणे पाण्याबरोबर वाटून गाळून सकाळ संध्याकाळ सेवन केले तर मूळव्याधीत खूप फायदा होतो. रक्त वाहाणे थांबते. पण हा उपचार करताना जाणकार वैदयाची मदत किंवा सल्ला घ्या. जर तुम्हाला सांधेदुखी असेल, हाडांमध्ये वेदना असतील तर यासाठी पण हा रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्ही याची १० ते १२ पाने वाटून त्याला हलके गरम करा व वेदना असतील त्यावर बांधा त्यामुळे खूपच आराम पडतो. त्याचबरोबर शरीरावर कुठेही गाठ असेल, तर त्या जागी पण अघाड्याची पाने वाटून त्याचा लेप लावल्यामुळे गाठ हळू हळू विरघळते व कमी होते.

त्याचबरोबर, दातांच्या वेदना कमी करण्याचा हा रामबाण उपाय आहे. दातात जर वेदना असतील, तर याची २ ते ३ पाने तोडून वाटून घ्या. नंतर त्याचा रस काढा. तो कापसात बुडवून जिथे दातांमध्ये वेदना आहे त्या जागी लावा. दातांच्या वेदनांपासून आराम मिळेल. अघाड्याच्या ताज्या मुळानी दात घासल्यामुळे दातांच्या वेदना, पायरीया, हिरड्यांमधून रक्त येणे या सगळ्या समस्या दूर होतात. आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर
करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *