शरीरातील बंद नसा चुटकीत मोकळ्या करणारे पदार्थ, पाठदुखी कंबरदुखी साधे दुखी आयुष्यात कधीच पुन्हा होणार नाही…

मित्रांनो, तुम्ही नेहमीच बघितले असेल की कधी पायाच्या त्वचेवर कोळ्याच्या आकाराच्या निळ्या रंगाच्या नस दिसतात त्याला व्हेरीकोज व्हेन्स असे म्हणतात. कधी या पायावर, कधी जांघांवर दिसतात. काही वेळेस ह्या व्हेन्स खूप मोठ्या आकाराच्या दिसतात. ह्याचे कारण काय आहे, त्यावर काय उपाय आहे आज या माहितीच्याद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. माहिती आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

सगळ्यात प्रथम आपण व्हेरीकोज व्हेन्सचे कारण जाणून घेऊया. तसे तर असे होण्याचे कारण म्हणजे खराब खाणेपिणे, व्यायामाचा अभाव व शारीरिक हालचालीपासून स्वत:ला वाचविणे यामुळे शरीराच्या नसांमध्ये वाहणारे रक्त दाट होते. या कारणामुळे नसांमध्ये ब्लोकेज होते व सूज येते. त्यामुळे नसांवर जोर येतो व पायाच्या नस निळ्या व फुगिर दिसतात. हातामध्ये व पायामध्ये रक्ताचा प्रवाह जास्त प्रमाणात असतो.

ज्यामुळे या शरीराच्या दोन अंगावर हे दिसून येते. यामध्ये बर्‍याच नसा एकाच जागी गुछाप्रमाणे जमा झालेल्या दिसतात. याचे दुसरे कारण म्हणजे घरात, ऑफिसमध्ये एका जागी संगणकावर बसून तासनतास काम करणे. जास्त लठ्ठपणा, व्यायाम न करणे हे पण कारण आहे. सार्‍या शरीराचा भार खालच्या पायावर असल्याने मांड्यांमध्ये नसांचे गुछ होतात. सतत उभे राहणार्‍या लोकांना हा त्रास होतो कारण रक्त एकाच जागी जमा होते. फॅक्टरीत काम करणारे कर्मचारी व मीठ जास्त खाणारे लोक यांच्यात हा त्रास दिसून येतो.

धूम्रपान हे पण एक कारण आहे. महिलांमध्ये हा त्रास जास्त असतो कारण गर्भावस्था, ग*र्भनि*रोधक गोळ्यांचे सेवन, मासिक पाळीच्या वेळी होणारे हार्मोनल बदल. त्याच्या उपचारासाठी आपल्याला कोणते घरगुती उपाय करता येतील ते जाणून घेऊया.

उपायासाठी लागणार्‍या वस्तु- ऑलिव्ह ऑइल, लिंबू, सायप्रेस ऑइल किंवा थुजा ऑइल (आयुर्वेदिक दुकानात मिळते). लिंबाच्या सालीमध्ये तेल असते ते आपल्या नसांमधील कमजोरी दूर करते. त्याच्या वापराने शरीरातील रक्तप्रवाह जोरात सुरू होतो.

कृती- १. ३ ते ४ चमचे लिंबाची साल किसून घेणे.
२. १०० मिलि ऑलिव्ह ऑइल मध्ये लिंबाची साल मिसळून घेणे.
३. हे तेल १० ते १५ दिवस उन्हात ठेवायचे आहे. हे उन्हात ठेवल्यामुळे लिंबाच्या सालीमधील सगळी तत्वे त्या तेलात उतरतील.
४. १० ते १५ दिवस झाल्यावर या तयार तेलात ३० मिलि सायप्रेस ऑइल मिसळायचे आहे. त्यामुळे हे तेल तयार होईल.

वापर कसा कराल– रोज रात्री झोपताना नसांना किंवा जिथे सूज आहे १० ते १५ मिनिटे या तेलाने हळू मालीश करणे व सूती कपड्याने गुंडाळून ठेवणे, नसांची सूज कमी होईल.

त्याचबरोबर आपण आहार योग्य घेतला पाहिजे. आपल्या आहारात ३ पदार्थांचा समावेश जरूर केला पाहिजे. त्या म्हणजे काळ्या मनुका, अळशी बिया, सब्जा. काळ्या मनुका पाण्यात भिजवून रिकाम्या पोटी खा. अळशीमध्ये ओमेगा३, फायबरची मात्र अधिक असते. आपल्या शरीराला ती ऊर्जा देते. सब्जामध्ये प्रोटेन्सची मात्रा जास्त प्रमाणात असते. जास्त गोडाचे सेवन करू नका, तेलकट, जंक फूड टाळा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *