शपथेवर सांगते एक वेळा लावून बघा, केसांची लांबी इतकी वाढेल की केस कापत राहावे लागतील…

नमस्कार मित्रांनो फक्त 5 रुपयात तुम्ही आपल्या केस काळे ,मजबूत , दाट आणि लांबसडक बनवू शकता. जर केस रुक्ष आणि कोरडे असतील तर हे टॉनिक जर केसाला लावले तर केस छान दिसतील त्यावर चमक येईल. तर आता आपण पाहूया कि 5 रुपयेची अशी कोणती गोष्ट आहे की ज्याने आपले केस सुंदर होतील. इथे मी घेतले आहे चहा पावडर जी की आपण चहा बनवायला वापरतो,पण तुम्हाला हे माहीत नसेल की चहाची पाने ही सौन्दर्य उत्पादने बनवायला खूप उपयोगी पडतात. आपल्या त्वचेसाठी , केसांसाठी चहा पावडर खूप उपयोगी आहे. याचा किती आणि कसा उपयोग करायचा याची माहिती मी आता देणार आहे. ही जर माहिती आवडली असेल तर नक्की सांगा आणि लाइक करा.

चहा पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता ,जी तुमच्या घरी आहे ती वापरली तरी चालेल. ही चहा पावडर तुमचे केस काळे करायला मदत करते ,याचा उपयोग अगदी नैसर्गिकरित्या होतो. चहामध्ये जे कॅफेन असते ते केसांसाठी खूप उपयोगी असते आणि केस काळे करायला मदत करते. चहा पावडर सोबत तमालपत्र घ्यायचे आहे , हे अगदी स्वस्त असते. अगदी 5 रुपयात खूप सारं तमालपत्र येतात, ज्याचा उपयोग खाण्यात होतो आणि सोबतच ते आपल्या केसाला चमक आणण्यासाठी उपयुक्त असतात. तमालपत्रच्या वापराने कोंडा कमी होतो , तसेच उवा लिक असेल तर तेही कमी होतात. केसवाढीला तमालपत्रचा उपयोग होतो आणि ते नैसर्गिक कंडिशनर आहे. आता एक लसूण पाकळी घ्यायची आहे , कारण ते अँटीऑक्सिडन्ट आहे , काही जिवाणू ते असतील तर कमी करण्याचे काम करते. केसांच्या मुळाशी काही जिवाणू असतील तर तेही कमी होतात. डोक्यावर असणारी खाज देखील लसणीच्या वापराने कमी होते.

2 चमचे चहा पावडर, 3 तमालपत्र, 1 लसूण पाकळी घ्यायची आहे. साधारणपणे 1 ग्लास पाणी घालून त्याला उकळायचे आहे .. चांगले उकळून घ्यायचे आहे, जेणेकरून सगळे पोषक तत्व या पाण्यामध्ये उतरतील. कमी आचेवर पाण्याला उकळत ठेवण्याचे आहे. चहा पावडर मुळे केसांना चमक येते, वाढ चांगली होते आणि हे नैसर्गिक कंडिशन करायचे काम करते. स्त्री पुरुष कुणीही हे वापरू शकते, कारण प्रत्येकाला वाटत असते की आपले केस चांगले असावेत , काळे, मोठे लांबसडक ,दाट असावेत त्यावर चमक हवी .जर केस दाट नसतील तर टक्कल पडू शकते म्हणून केसांची निगा राखणे गरजेचे आहे. या चहाच्या पाण्याचा उपयोग खूप आधीपासूनच होतो, कमीत कमी 10 मिनिटे बारीक गॅसवर याला उकळलेले आहे, तमालपत्रचा रंग बदलला आहे आणि यात आता लसूणचा स्वाद उतरला आहे. लसूण केसातील कोंडा कमी करतो , आपल्या केसाखालच्या त्वचेला स्वच्छ करण्याचे काम करतो.

हे केसांसाठी तयार केलेले औषध उवा लिक, कोंडा या सगळ्याला दूर करेल तसेच केस गळणेही कमी होईल. जितके तुम्ही तुमच्या केसांना पोषण द्याल ते तितकेच मजबूत होतील. अशारितीने आपले हे टॉनिक तयार झाले आहे , याला नेहमी फ्रिजमध्ये ठेवण्याचे आहे ,नाहीतर वास येऊ शकतो हे एका आठवड्याचे तयार करून ठेवू शकतो ,आपल्याला ते आठवड्यातून 3 वेळा वापरायचं आहे.
आता आपण घेणार आहोत कॉफी ती सुद्धा आपक्या केसांना उपयोगी आहे, केस सरळ होतात त्यांना पोषण मिळते. केस तुटण्याचे कमी होते ,कॅफेन केसांसाठी उपयोगी असते. केसांसाठी कॉफीचे पाणी गुणकारी असते केस काळे करण्यास मदत करते.आता आपण जे टॉनिक तयार केले आहे त्यात एक मोठा चमचा कॉफीचे पाणी मिक्स केलं आहे.

ज्या लोकांचे केस पांढरे आहेत त्यांनी हे पाणी आपक्या केसांवर जरूर लावावे आणि फरक बघावा. यामुळे केसाला डाय करावा लागणार नाही, अगदी कमी प्रमाणात केस पांढरे असतील तर तुम्ही अगदी आरामात हा प्रयोग करून केस काळे करू शकता. जर आपण बाजारात मिळणारा डाय केसांना लावला तर सगळे केस काळे होतात पण त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. आता केस पांढरे व्हायला सुरुवात असेल तर हे कॉफीमिश्रित टॉनिक केसाला जरूर लावा आणि बाकी टॉनिक फ्रिजमध्ये साठवून ठेवा.जेव्हा आपल्याला हे टॉनिक केसाला लावायचे असते तेव्हा ऐनवेळी कॉफी त्याला घालायची आहे हे लक्षात ठेवा.

जर केस अगदीच रुक्ष, कोरडे आणि निस्तेज वाटत असतील तर त्यासाठी आपल्याला आत त्यात नारळाचे तेल घालायचे आहे. जेव्हा आपले केस कोरडे असतील तेव्हा ते जास्त गळू शकतात, केसात स्निग्धता असणे खूप महत्त्वाचे आहे . त्यासाठी कोणत्याही तेलाचा उपयोग करणे गरजेचे आहे, यात तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता किंवा ऑलिव्ह तेलाचा सुद्धा नाहीतर व्हिटामिन इ ची एखादी गोळी घातली तरी चालेल.हे दोन्ही प्रकार आता कसे वापरायचे हे मी सांगणार आहे जे टॉनिक आपण तेल घालूम मिक्स केले आहे ते आपण थेट आपल्या केसांवर स्प्रे करायचे आहे आणि कॉफीमिश्रित टॉनिक हे पांढऱ्या केसांवर लावायचे आहे. कमी केस पांढरे असतील तर तुम्ही अगदी आरामात याचा वापर करून पांढरे केस लपवू शकता ,अगदी हा सोपा उपाय आहे आठवड्यातुन 3 वेळा हे लावायला हवं म्हणजे केसांना छान पोषण मिळेल , कारण यात सगळे चांगले आणि उपयोगी असेच घटक आपण उपयोगी केले आहेत.

हे पाणी तुम्ही कापूस किंवा ब्रशचा वापर करून लावू शकता. आता हे मी कॉफीचे पाणी कसे लावायचे ते संगीतले आता चहा पाणी कसे लावयचे ते पाहू. जर तुमच्याकडे एखादी स्प्रे करण्याची बाटली असेल तर ती वापरू शकता ,नसेल तर एखादी बाटली बाजारातून आणून देखील लावू शकता कारण हे स्प्रे केल्यामुळे नीट लागते. जर बाटली नसेलच तर हळू हळू केसांवर टॉनिक घेऊन मसाज करायचा आहे. जितका जास्त मसाज कराल तितके ते पाणी आतपर्यंत जाईल , छान मुरेल. याने तुमचे केस गळण्याचे कमी होतील, केसाला चमक येईल . केस मऊ होतील केस काळे होतील. आजकाल तर खूप कमी वयात केस पांढरे होतात, केसांचा भांग पडून मध्ये मध्ये लावत जायचे आणि मसाज करायचा आहे. कमीतकमी याला 2 तास लावून ठेवायचे आहे, केस धुवायचे असतील तर एक दिवस आधी सुद्धा लावून ठेवू शकता, केस नाही धुतले तरी चालतील . पण जर केस धुवायचे असतील तर शांपू लावू नका. दुसऱ्या दिवशी शाम्पू लावला तर चालेल. कारण कोणतही उपाय लागू पडायला थोडा वेळ द्यावा लागतो.. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आणि शेतात करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *