विड्याच्या पानांमुळे तीळ-चामखीळ एकदाच लावल्यावर असे गायब होतील की, त्या जागी ते होते असे तुम्हाला वाटणारच नाही…

नमस्कार मित्रांनो,

विडयाच्या पानांच्या मदतीने तीळ व चामखीळ एकाच वेळी लावून नाहीसे करण्याचा एक जबरदस्त उपाय तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. जर तुम्ही तीळ किंवा चामखीळ यामुळे त्रासलेले असाल, तर तर ते एकदम ठीक होऊन जाईल या उपायाने. तसे तर आपल्या चेहर्‍यावर एखादा तीळ असेल, तर त्याला आपण “ब्युटि स्पॉट” म्हणतो पण त्यापेक्षा जर जास्त तीळ किंवा चामखीळ जर चेहर्‍यावर असतील, तर ते आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

तुम्हाला काय करायचे आहे, एक विड्याचे पान घ्यायचे आहे. मी हे पान पानाच्या दुकानातून विकत आणले आहे. एक पान आपण घ्यायचे आहे. हे तेच पान आहे जे आपण भोजनांनंतर पचनासाठी सेवन करतो. या पानांमध्ये असे काही रस असतात जे आपल्या तीळ व चामखीळ नाहीसे करायला उपयोगी पडतात. तुम्हाला ही जी पानाची दांडी दिसते आहे म्हणजेच देठ ते उपयोगात आणायचे आहे.

२ ते ३ वेळा वापर केल्यावर तुम्हाला परिणाम दिसून येईल. जर तीळ किंवा चामखीळ खूप जुना असेल, तर २ ते ४ दिवस याचा उपयोग करावा लागेल. जुना चामखीळ असेल तर तो निघून जायला थोडा अधिक कालावधी लागू शकतो. चामखीळ हे साधारण काळे किंवा लालसर रंगाचे असतात. घरगुती उपायाने ते जाऊ शकतात. मी पान याप्रमाणे कापले आहे. दुसरी वस्तु आहे चुना. चुना पण पानाच्या दुकानात मिळतो.

चुन्याची डबी तुम्हाला केवळ १० रुपयात मिळू शकते. चुन्यामध्ये कॅल्शियम असते व चामखीळ सुकवून काढून टाकण्यात चुन्याचा खूप फायदा होतो. चुना एक चिमुट घ्यायचा आहे, मी इथे तुम्हाला दाखवते आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास त्वरित परिणाम दिसून येतो. चुना खाल्यामुळे आपली ऊंची वाढते, कारण यामध्ये कॅल्शियम आहे. तीळ किंवा चामखीळ कोठेही येऊ शकतात. जास्त असतील तर चांगले दिसत नाहीत.

चुना सुकला असेल तर डबीत १ थेंब पाणी घाला. पेस्ट बनवून घ्या. आता जिथे तीळ आहे किंवा चामखीळ आहे तिथे पानाच्या देठाने हा चुना लावायचा आहे, बोटाचा वापर करायचा नाही. पान व चुना मिळून चामखीळ निघून जायला मदत करते. हळू हळू त्या जागी मालीश करायचे आहे, ज्यामुळे पानाचा रस व चुना यांचे मिश्रण तीळ किंवा चामखीळ निघून जायला मदत करेल. २ ते ३ मिनिटे पानाच्या देठाने मालीश करा. ते सुकू द्या. साधारण अर्धा तास हे सुकू द्या.

तुम्हाला २ ते ३ दिवसात याचा परिणाम दिसून येईल. नंतर तो भाग स्वछ धुवून टाका. हळू हळू चामखीळीचा आकार कमी होत जाईल व तो निघून जाईल. याचा डाग पडला तरी तुम्ही त्या जागी नारळ तेल किंवा एलोवीरा रस लावू शकता त्यामुळे डाग निघून जाईल. या उपायाचा कोणताही दुष्परिणाम नाही. अगदी नैसर्गिक असा हा उपाय आहे. एकदा हा उपाय जरूर करून बघा घरगुती व नैसर्गिक उपाय १०० टक्के काम करतो.

तुम्हाला आमची ही माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा. आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. त्यामुळे आमची पुढील नवीन माहिती तुम्हाला नक्की पहाता येतील. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *