विंचू चावल्यावर रामबाण घरातले उपाय १ मिनिटात आराम…

नमस्कार मित्रांनो शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.

आपल्या आजूबाजूला कधीही न सांगता येणारा असा हा प्राणी म्हणजे विंचू. हा विंचू चावल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला हा विंचू चावतो ती व्यक्ती एवढे ओरडते, त्या व्यक्तीला एवढा त्रास होतो. असा हा विंचू चावल्यावरती यावर आयुर्वेदिक किंवा कोणत्याही दवाखान्यात उपचार नाही. फक्त एकच उपचार आहे तो म्हणजे जागा इंजेक्शन देऊन बधिर केली जाते. असा हा चावलेला विंचू यावरती कसलाही उपाय नाही. परंतु आयुर्वेदामध्ये अशा चावलेल्या विंचूवरती उपाय आहेत. तोच उपाय आपण पाहुया. असे बरेचशे उपाय आपल्या आजूबाजूला आहेत त्यामध्ये काही उपाय आपण पाहुयात.

प्रत्येकाच्या घरात किंवा घराजवळ चिंचेचे जे चिचुके असतात. ज्या ठिकाणी विंचू चावलेला आहे त्या ठिकाणी या चिचुक्याची साल काढून चिंचोका दगडावर घासायचा. घासल्यानंतर ज्या ठिकाणी विंचू चावला आहे तिथे हा घासलेला चिंचोका ठेवायचा. याने विंचवाचा जो त्रास आहे तो याने लगेच कमी होतो. असा हा चिंचोक्याचा उपाय आहे.

दुसरा उपाय हा एकदम चमत्कारिक आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी असते. ही तुरटी ज्या ठिकाणी विंचू चावला आहे त्याठिकाणी ही तुरटी तुम्ही गॅसवर किंवा मेणबत्तीवर गरम करताना ज्यावेळी ही तुरटी वितळायला लागेल त्यावेळी ही तुरटी विंचू चावल्याच्या ठिकाणी ठेऊन द्यायची. विंचवाचे जोपर्यंत विष आहे तो पर्यंत ही तुरटी खाली पडत नाही. असा हा एकदम चमत्कारिक उपाय आहे.

आंब्याच्या सिजन मध्ये आंब्याच्या देठाचा चीक एका बाटलीत भरून ठेवला, हा चीक जरी विंचू चावला आहे तिथे लावला तरी कसलाही चावलेला विंचू उतरतो म्हणजे त्याचा त्रास कमी होतो. बरेच लोक विंचू उतरवण्यासाठी मंत्रिकाकडे जातात. काहींना फरकही पडत असेल पण हे जर उपाय घरच्या घरी केले तर याने विंचू लगेच उतरतो. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *