वास्तुशास्त्रा नुसार घराजवळ पिंपळाचे झाड असणे शुभ की अशुभ?

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरासमोर घराच्या अवतीभवती पिंपळाचे झाड असणे शुभ असते की अशुभ असते. मित्रांनो हिंदुधर्म शास्त्रानुसार हा एक देवी वृक्ष आहे. या पिंपळाच्या झाडाच्या कणाकणात ईश्वराचा वास मानण्यात आले आहे. असे ही म्हणतात की पिंपळाच्या वृक्षाची जी व्यक्ती नियमित पूजा करते, जल अर्पित करते त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ होतात.

पण तरी सुद्धा हिंदुधर्म शास्त्राने या झाडाला घराजवळ लावण्यास मात्र मनाई केली आहे. या पाठीमागचे कारण काय असावे? हिंदुधर्मशास्त्र अस मानत की हे झाड जर आपल्या घराजवळ असेल किंव्हा आपल्या घरापासून लांब आहे मात्र त्याची जर सावली आपल्या घरावर पडत असेल तर घरावर मोठे दुष्परिणाम होतात. पहिली गोष्ट घराची बरकत थांबते, घराची प्रगती होत नाही, त्या घरावर वारंवार संकटे येतात, घरातील लोक वारंवार आजारी पडतात आणि सर्वात मोठा जो दूषपरिणाम आहे तो म्हणजे वंश भेद होतो. वंश वाढत नाही.

जर तुमच्या घराच्या पूर्वेला हे झाड असेल तर घरात सातत्याने भीतीचे वातावरण निर्माण होते. गरिबी तर येतेच, पैसे टिकत नाहीत, या गोष्टी खऱ्या आहेतच पण त्यापेक्षा मोठी गोष्ट घरातील लोक सातत्याने एका भीतीच्या वातावरणाखाली वागताना दिसून येतात. मित्रांनो हे सगळे वाचल्यानंतर काही लोक ताबडतोब हे पिंपळाचे झाड उपडतील किंव्हा तोडून टाकतील.

मित्रांनो अर्धवट माहितीवर कधीही उपाय करत जाऊ नका. माहिती पूर्ण वाचत चला. कारण जेव्हा जेव्हा आपण अर्धवट माहितीवर काहीतरी करायला जातो तेव्हा मित्रांनो लाभ होण्याऐवजी आपल्याला नुकसानच होते. मित्रांनो हिंदुधर्म शास्त्राने पिंपळाचे झाड तोडण्यास, कापण्यास मनाई केली आहे. मग या वरती उपाय काय? तर हिंदुधर्म शास्त्रामध्ये याच वर्णन आढळते. 45 दिवस कायम न चुकता आपण या वृक्षाची पूजा करावी.

पूजा करणे म्हणजे तुम्हाला माहीतच असेल हळदी कुंकू वाहायच आहे. जल अर्पण करायचं आहे. फक्त रविवारी जल अर्पण करू नका.बाकी सर्व दिवशी जल अर्पण करायचे आहे. साखर गूळाचा नेवेद्य ठेवायचा आहे. आणि मनोभावी हात जोडायचे आहेत. 45 दिवस असे केल्यानंतर येणाऱ्या रविवारी आपण या झाडाला तोडू शकता. जर रोपटे असेल तर ते तुम्ही मंदिराजवळ किंव्हा तुमच्या शेताच्या बांधावर लावू शकता.

जर तुम्ही पूजा न करता ये झाड तोडले तर काय घडू शकत. तर या मुळे पितृलोकांना त्रास होतो. पितृलोक म्हणजे कोण तर आपल्या घरातील ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर या पितृलोकांचा वास सुद्धा विशेष तितीला या पिंपळाच्या झाडावर मानण्यात आला आहे.त्या पितरांना या मुळे त्रास होतो आणि आपल्या जीवनात पितृदोष निर्माण होतो.
पिंपळाच्या झाडाचा अजून एक तोटा असा आहे की हा वृक्ष आपल्या बाजूला एकांत निर्माण करतो, निर्जनता पैदा करतो. म्हणजे काय तर ज्या घराशेजारी हे झाड असेल त्या घरातील लोकांवर संकटे तर येतातच मात्र या लोकांचं आयुष्य सुद्धा सीमित बनत. त्यांना दिर्घआयुष्याची प्राप्ती होत नाही. मुलांवर ही संकटे येतात.

मुलांच्या जीवनात अनेक समस्या येतात आणि वंशवृद्धी हळूहळू संपत जाते. मित्रांनो जसजसा हे झाड वाढत जात तसंतसं याचा भार वाढत जातो. आणि आपलं जर याच्या खाली असेल तर दुर्घटना होण्याची शक्यता असते. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा हे झाड अशुभ गोष्टी घेऊन येत. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *