वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या मुख्य दारात लावा या तीन गोष्टी, पैशाची आवक वाढेल, कुटुंबात येईल सुख आणि समाधान…

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते. त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते. घर एक असे ठिकाण असते जिथे व्यक्तीला शांती तसेच प्रसन्नता मिळते.

कामावरून घरी आले की घरात प्रसन्न वाटले पाहिजे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातही काही बदल कऱण्याची गरज असते. घराचा मुख्य भाग असतो ते म्हणजे प्रवेशद्वार. घराच्या दरवाजावर अशा काही वस्तू ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे सकारात्मक बदल होईल. तुमच्या घरातील मुख्य द्वार हे खूप महत्वाचे असते. ते बनवताना खूप विचारपूर्वक केले पाहिजे.

तुमच्या घराचे मुख्य द्वार बनवताना त्याच्या खाली चांदीची तर ठेवावी. असे करणे वास्तूच्या दृष्टीने शुभ मानले जाते. चांदीमुळे घरात लक्ष्मीचा वास असतो. असे मानले जाते कि मुख्य द्वाराच्या खाली जर चांदीची तार ठेवली तर घरात पैशांची आवक वाढते. आपल्या जीवनात कधीही पैशांची कमी जाणवत नाही.  तसे तर चांदीला शीतलतेचे प्रतीकसुद्धा मानले जाते. याच्या वापराने घरात शांत आणि पॉजिटिव वातावरण राहाते. अशाने कुटुंबात भांडणे होत नाहीत. एकमेकांमधील प्रेम कधीही कमी होत नाही.

घराचे मुख्य द्वार बनवताना त्याची चौकट लाकडी असेल याची खात्री करून घ्या. असे मानतात कि लाकूड हे घरात येणाऱ्या नेगेटिव वाइब्सना थांबवते तसेच घरात पॉजिटिव एनर्जीचा प्रवेश होतो. वास्तूप्रमाणे लाकडाला चौकटीच्या रुपात लावणे खूप शुभ असते. घरात लाकडाचा वापर जास्तीत जास्त केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.

घराच्या मुख्य द्वाराला सजवण्यासाठी ओम स्वस्तिक यांसारख्या धार्मिक चिन्हांचा वापर करायला हवा. अशा गोष्टी लावल्याने घरात पॉजिटिव एनर्जी येते. अशा गोष्टी जर मुख्य द्वारावर लावल्या तर घरात सुख,समृद्धी आणि शांतीचा वास असेल. अशा गोष्टी खूप सहजरीत्या मिळू शकतात किंवा तुम्ही हि चिन्हे हाताने काढून शकता.

घराचे मुख्य द्वार बनवताना चुकूनही त्याला काळा रंग लावू नका. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होईल. घराच्या मुख्य द्वारावर नेहमी हलका रंग लावायला पाहिजे. असे केल्याने घरातील मुख्य माणूस टेंशन फ्री राहातो त्याशिवाय घरात प्रेम आणि शांती राहाते.  घराचे प्रवेशद्वार व्यवस्थित बनवले गेले तर तुमच्या घरात सुख शांती नांदेल आणि तुम्ही सुखी आणि आनंदी राहाल.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *