वास्तुशास्त्रानुसार अशा तव्यावर कधीही चपाती बनवू नका – पूर्ण घर होईल बरबाद…

तवा हा आपल्या स्वयंपाकघरातील सगळ्यात जरूरी गोष्ट आहे. जर तवा नसता तर आपण रोटी बनवू शकलो नसतो. आज आम्ही तुम्हाला तव्याबद्दल अशी माहिती देणार आहोत, जी तुम्हाला कधीही कोणी सांगितली नसेल. तुम्हाला सांगतो, वास्तुशास्त्रानुसार, तव्याचे काय महत्व आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी कितीतरी लोकांना माहीत नसेल, की तवा व कढई हे राहुचे प्रतिनिधित्व करतात. जे तुमचे नशीब सुधारू पण शकतात  किंवा तुम्हाला बरबाद करू शकतात. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की घरात चुकूनही असा तवा वापरू नका किंवा ठेवू नका.

तव्याला कधीही उलटे ठेवू नका. हिंदूधर्मानुसार, तव्याला कधीही उलटे ठेवू नये. उलटा तवा तेव्हाच ठेवला जातो, जेव्हा घरात कोणाचाही मृत्यू झालेला असतो. अर्थात, त्याचा अर्थ असा आहे, की तेव्हा घरात तव्याचा उपयोग करणे वर्ज्य मानले गेले आहे. म्हणजेच, घरात मृत्यू झाला असेल, तर घरात भोजन बनवू नका. म्हणून तवा उलटा ठेवला जातो. अशावेळी, कोणी व्यक्ति जर तवा उलटा ठेवत असेल, तर ते अशुभ असते. म्हणून कधीही तवा उलटा ठेवू नका. नेहमी सरळ ठेवा.

मित्रांनो, दुसरे म्हणजे दोष. जास्त काळासाठी एकाच तव्याचा उपयोग करू नका. जुना तवा गंज पकडतो. त्याचे अवशेष खाण्यात जाऊन खाणे दूषित होऊ शकते. तुमची किंवा तुमच्या मुलांची तब्येत बिघडू शकते. तसेच कोणताही मोठा आजार होऊ शकतो. खूप वर्षे एकाच तवा वापरल्यामुळे तो खराब होतो. त्यात दोष उत्पन्न होतात, तुम्हाला गरीबी येऊ शकते.

तवा किंवा कढई कधीही उष्टी करू नये. त्याच्यावर उष्ट्या वस्तु ठेवू नयेत. त्याच्या पवित्रतेचे पालन केले पाहिजे. तवा किंवा कढई कायम स्वछ ठेवली पाहिजे. ती जेवढी स्वछ ठेवाल, तेवढे धन येण्याचे मार्ग मोकळे होतील. सगळ्या भांड्यांमधून ह्या दोन गोष्टी खूपच सन्माननिय मानल्या गेल्या आहेत.

मित्रांनो, हे काम माझ्याघरी नेहमीच होते, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. ईश्वराची कृपा होण्यासाठी माता अन्नपुर्णेचा वास असणे जरूरी आहे, त्यासाठी पहिली भाकरी जी व्यक्ति गाईला खाऊ घालते तर माता अन्नपूर्णा त्याच्या घरी निवास करते. कारण गाईत सर्व देव-देवता वास करतात. सर्व पापांपासून मुक्ति मिळते.

जो व्यक्ति गरम तव्यावर पाणी घालतो, त्यांच्या घरात वाद विवाद, आजार येत राहातात. म्हणून, तवा थंड झाल्यावर पाणी टाका. तवा कढई नेहमी चकचकीत ठेवा. मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोकांना वाटते, की माता अन्नपुर्णेचे तुमच्या घरात वास्तव्य असावे. कमेन्ट बॉक्स मध्ये “जय माता अन्नपूर्णा” लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *