वाळलेल्या लिंबूचे हे फायदे जाणल्यावर पायाखालची जमीनच सरकेल तुमच्या…

सध्या लॉकडाऊन असल्याने आपण बाजारातून अनेक अशा वस्तू जास्त प्रमाणात असतो परंतु या वस्तू जास्त प्रमाणात विकत घेतल्यामुळे अनेकदा त्यांचा वापर न केल्यामुळे सुद्धा खराब होऊ लागतात त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबू. लिंबू चा उपयोग आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करत असतो.

अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबूचा रस पिऊन आपली तहान भागवत असतो यामुळे जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात परंतु अनेकदा जास्त प्रमाणामध्ये लिंबू आणले तर ते खराब होण्याची सुद्धा शक्यता असते , अशावेळी आपल्या घरातील गृहिणी वर्ग चिंतेमध्ये येते म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, त्या माहितीच्या आधारे आपली चिंता पूर्णपणे दूर होणार आहे त्याबद्दल…

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या घरातील कोणतीही वस्तू खराब होऊ नये यासाठी आपण विशिष्ट काळजी घेत असतो.अनेक वेळा त्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवले जातात परंतु सगळ्याच गोष्टी काय फ्रिजमध्ये ठेवता येत नाही परंतु अनेक वेळा फ्रिजमधील वस्तू वापरल्या नसल्यामुळे अनेकदा त्या वस्तू वाळण्याची शक्यता असते त्यापैकीच एक वस्तू म्हणजे लिंबू.लिंबू जर आपण जास्त काळ वापरले नाही तर त्यांचा रंग पिवळा होऊ लागतो आणि कालांतराने ते वाळून जातात.

खरं तर अनेकदा घरामध्ये वाळलेली लिंबू खराब झाले म्हणून त्यांना फेकून दिले जाते परंतु एक गोष्ट आपण सर्वजण जाणत नाही की वाळलेले लिंबू हे फक्त आपल्या आरोग्यासाठी नाहीतर आपली त्वचा संपवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतात. वाळलेले लिंबू मध्ये कॅल्शियम, आयरन , मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात. हे सगळे पोषक घटक आपल्या त्वचेसाठी व आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

अशा पद्धतीने करा वाळलेल्या लिंबू चा वापर : अनेकदा आपण आपल्या घरातील टाकाऊ पदार्थ कचरात टाकतो परंतु वारंवार स्वच्छता न केल्यामुळे अनेकदा कचऱ्याचा डब्बा चा उग्र पद्धतीचा वास सुद्धा येऊ लागतो अशा वेळी जर आपण वाळलेल्या लिंबू चा उपयोग कचऱ्याचा डब्बा साफ करण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतो. हा कचरा चा डबा स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबू वर थोडासा बेकिंग सोडा लावून साफ करा असे केल्याने कचऱ्याचा डब्बा पूर्णपणे स्वच्छ होईल.

अनेकदा आपण चेहऱ्यावर वेगवेगळे पदार्थ लावत असतो, चेहऱ्याची याची विशेष काळजी घेत असतो अशावेळी जर आपल्या घरामध्ये वाळलेले लिंबू असतील तर त्यांचा उपयोग आपण चेहऱ्यावरील पावडर बनवण्यासाठी करू शकतो त्यासाठी आपल्याला जे काही लिंबू वाळलेले आहेत त्यांचे बारीक बारीक तुकडे करून उन्हामध्ये वाळू द्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्‍सरच्या साहाय्याने त्यांची पावडर बनवायची आहे. ही पावडर जर आपण आपल्या चेहऱ्यावर लावली तर आपली त्वचा उजळ लागेल व त्याच बरोबर चेहऱ्यावरील काळे डाग सुद्धा निघून जाण्यास मदत होणार आहे.

अनेकदा उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये घामामुळे आपले शरीर चिपचिपीत होते, त्यांचा परिणाम आपल्या शरीरावर अनेकदा होतो. याचा विपरीत परिणाम आपल्या केसांवर सुद्धा होतो. अनेकदा घामामुळे आपले केस सुद्धा वास मारू लागतात अशा वेळी जर आपण वाळलेले लिंबू कापून केसांच्या मुळाशी घासल्यास केसांचा तसेच त्याची दुर्गंधी सुद्धा निघून जाण्यास मदत होते.

वाळलेल्या लिंबूचा फुट स्क्रब म्हणून सुद्धा वापर करण्यात येऊ शकतो. यासाठी आपण वाळलेले लिंबू कापून जर नियमितपणे पायांच्या तळव्यांना घासल्यास पायांच्या तळव्यांची होणारी आग व तळव्यावरील घाण पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते

वाळलेल्या लिंबू चा उपयोग करून आपण आपल्या घशाच्या अनेक समस्या दूर करू शकतो यासाठी आपल्याला वाळलेल्या लिंबूसोबत थोडेसे सैंधव मीठ म्हणजे काळे मीठ वापरून त्याचा रस प्यायचा आहे, असे केल्याने आपल्या घशा च्या संबंधित सर्व समस्या तर दूर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या शरीराची पचनशक्ती सुधारते म्हणूनच जर तुमच्या घरी सुद्धा वाळलेले लिंबू असतील तर ते फेकून न देता त्यांचा या लेखामध्ये सांगितल्या पद्धतीने वापर करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *