वजन कमी करण्यासाठी दिनचर्या, व्यायाम, काय खावे, खाऊ नये…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. सध्या वजन वाढणे ही गंभीर समस्या बनत चालली आहे. आधुनिक जीवनशैली, हॉटेलचे अन्न, चटपटीत पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण, जेवणावर नियंत्रण नसणे यामुळे वजन झपाट्याने वाढत आहे. एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या, वजन वाढवणे सोपं आहे मात्र वजन कमी करणं अत्यंत अवघड गोष्ट आहे.

मग वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी दिनचर्या किंवा दिवसभरात कसं काय वागलं पाहिजे सकाळी काय, संध्याकाळी काय, दिवसभरात काय जेवण केलं पाहिजे हे सकाळ संध्याकाळ शेड्युल आज आपण पाहणार आहे. मित्रांनो वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आपण हॉटेलचे अन्न टाळले पाहिजे.

सुरुवातीला सकाळी उठल्यावर आपण साधारण तीन किलोमीटर पळायला किंवा फिरायला जायला पाहिजे. तीन किलोमीटर नियमित चालायला पाहिजे. तुम्हाला सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी ऍडजस्ट करा म्हणजे संध्याकाळी फिरायला जा. दुसरी गोष्ट आहे तुम्ही जेव्हा फिरून याल त्यावेळी दहा मिनिटे आराम करून एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध व अर्धा लिंबू पिळून ते घ्या.

समजा एखाद्याला डायबेटिस असेल त्यांनी मध घेणे टाळा त्याऐवजी फक्त लिंबू वापरा. एखाद्याला लिंबू आहारामध्ये जमत नसेल तर त्यांनी फक्त मध वापरा. आता एखाद्या व्यक्तीला या दोन्ही गोष्टी जमत नसतील तर त्यांनी बडीशेप एक चमचा एक ग्लास पाण्यात उकळावे आणि ते पाणी पिऊन घ्यावे. या कुठल्याही गोष्टी जमत नसतील तर एक ग्रीन टी घेतली तरी चालेल. ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी चांगली असते. मात्र त्यात साखरेचे प्रमाण कमी ठेवा.

दुसरी गोष्ट आहे सकाळी नाष्टा. सकाळी नाष्टा करूच नका. दिवसभरात तुम्ही फक्त दोनदा जेवायचे आहे. सकाळ ते दुपार एक वेळेस आणि संध्याकाळी एक वेळेस अशा पद्धतीने जेवण करायचे आहे. दोन वेळचे जेवण सोडल्यास तुम्ही दिवसभरात नाष्टा, बाहेर एखादी वस्तू खाणे, चहा पिणे, ज्युस पिणे अशी कुठलीही गोष्ट करायची नाही. तुम्हाला माहिती आहे का? एक कप चहामध्ये साधारणतः दोन चमचे साखर असते आणि दोन चमचे साखर आपल्या शरीराला 100 ते 200 कॅलरीज ऊर्जा देतात. परिणामी आपलं वजन वाढते.

म्हणजे चहा हा आपलं वजन वाढण्यामध्ये अत्यंत घातक किंवा महत्त्वाचा घटक मानला तरी चालेल. तुम्ही सकाळी जेवण करत असाल तर पोठभर करा. त्यानंतर दुसरी गोष्ट येते दुपारी जेवण. शक्यतो तुम्ही सकाळी जेवण करत नसाल, दुपारी जेवण करत असाल तर दुपारी पोटभर जेवा. जेवणामध्ये ताकाचा वापर केला तर चांगलेच आणि संध्याकाळी तुम्ही फक्त एक भाकर आणि भाजी खायची आहे. दिवसभरात इतर कुठेलेही घटक खाऊ नका.

समजा एखाद्याला खूपच वजन कमी करायचे आहे त्यांनी दुपारच्या जेवणात कडधान्यांचा वापर करा आणि संध्याकाळच्या जेवणात पण कडधान्यांचा वापर करा. पण जेवण हे संध्याकाळी सात च्या आत किंवा झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास अगोदर करणे गरजेचे आहे. तुम्ही संध्याकाळी जेवणामध्ये शक्यतो एकच भाकर आणि भाजी ठेवा. भरपूर घटक खाऊ नका आणि संध्याकाळी जर भरपेट खाऊन झोपत असाल तर वजन वाढणार म्हणजे वाढणार.

संध्याकाळच्या जेवणात शक्यतो भात टाळा आणि दिवसभरात पाणी जास्त प्या. एक एक घोट करून पाणी पीत असाल तर वजन कमी होण्यास अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो फक्त पोटाचा घेर वाढला असेल आणि बाकी बॉडी जर सेफ म्हणजे आकारात योग्य असेल तर पश्चिमोस्थाहन करा. नेटवर तुम्हाला सहज उपलब्ध होईल. कसे करावे? काय करावे? त्याचे फायदे काय? या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे आसन, योगासन, प्राणायम या गोष्टी जर केल्या तरी वजन कमी होण्यास मदत होते.

मित्रांनो अशा तऱ्हेने आपण दिनचर्या वापरली आणि फक्त दोनदा जेवण केलं तर तुमचं वजन निश्चित कमी होईल आणि समजा तुम्हाला भूक लागेल तेव्हा असे पदार्थ खा की त्यात कॅलरीज कमी प्रमाणात असतील आणि पोट भरल्यासारखे वाटेल. मात्र शक्यतो दिवसभरात दोन वेळचे जेवण सोडून इतर काहीही खाणे टाळा. तुमचे वजन एका महिन्यात साधारणतः दहा ते वीस किलोपर्यंत सहज कमी होऊ शकते. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *