लिंबू पाणी बनवण्याची योग्य पद्धत पहा आणि वजन कमी करा, चरबी कमी करा, पोटाचा घेर कमी करा…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनी वजन कमी करण्यासाठी तसेच पोटाचा घेर कमी करण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी लिंबू हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. मात्र बरेच लोक लिंबू पाणी अनेक वर्षांपासून पित आहेत मात्र तरीसुद्धा चरबी काही कमी होत नाही आणि वजन सुद्धा घटत नाही. नेमकं अस का होतंय? याला कारण म्हणजे 99% लोकांना हेच माहित नाही की लिंबूपाणी नेमकं कस तयार कराव लागत आणि ते कसं प्यावं लागत.

आजच्या या उपायमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत की लिंबूपाणी कसं तयार करावे जेणे करून आपली चरबी कमी होईल आणि आपलं वजन घटेल. मित्रांनो लिंबूपाण्याचा योग्य वापर कसा करायचा, लिंबूपाणी कसं बनवायचं हे सांगण्यापूर्वी ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्या आम्ही सांगतो. पहिली पद्धत म्हणजे लोक नॉर्मल तापमानाचा पाणी घेतात आणि त्या मध्ये लिंबू पिळतात आणि हे पाणी पिल जात. ही मित्रांनो चुकीची पद्धत आहे. याने तुमचं वजन कधीही कमी होणार नाही.

दुसरी पद्धत म्हणजे कोमट पाणी घेतात त्यामध्ये लिंबू पिळला जातो आणि त्या मध्ये थोडासा मध मिक्स केला जातो आणि हे मिश्रण लोक पितात. याने सुद्धा म्हणावा तितका फरक पडत नाही. तिसरी पद्धत म्हणजे लोक पाणी गरम करतात आणि त्यामध्ये लिंबू पिळतात आणि तामध्ये मध सुद्धा मिक्स केला जातो. मित्रांनो आपण जास्त गरम पाण्यामध्ये जेव्हा मध मिसळतो त्यावेळी या मधाचे गुणधर्म आपल्या पर्यंत पोहचत नाहीत. मित्रांनो चौथी पद्धत आहे लोक नॉर्मल पाणी घेतात आणि त्यामध्ये लिंबू व साखर टाकून हे मिश्रण पितात. ही तर अतिशय चुकीची पद्धत आहे.

मित्रांनो या चार चुकीच्या पद्धती लोक जास्त करून वापरतात आणि त्यामुळे त्यांना बरेचशे तोटे होतात. मित्रांनो आता पाहुयात लिंबूपाणी बनवण्याची खरी पद्धत. मित्रांनो लिंबू मध्ये व्हिटामिन C, सायट्रिक ऍसिड, हे घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन घटकांच्या प्रभावामुळेच आपलं वजन कमी होत.

मित्रानो सर्वात पहिले आपण किसनी घेणार आहोत. याने आपल्याला लिबूची साल काढायची आहे. तुम्ही कोणतही साधन वापरा आपल्याला फक्त लिंबूच्या वरची साल काढायची आहे. तो पर्यंत खिसायच आहे जो पर्यंत आपल्याला आतमधील पांढरा भाग दिसत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या पांढरा भाग आपल्याला घ्यायचा नाही. फक्त वरची जी साल आहे ती खिसून घ्यायची आहे.

आता आपल्याला साधारणपणे एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि ते आपल्याला तापवायला ठेवायचे आहे. साधारणपणे पणे ते पाणी आपल्याला कोमट पेक्षा थोडं जास्त तापवायचे आहे. हे पाणी गरम झाल्यानंतर ते आपण एका ग्लास मध्ये घ्यायच आहे आणि त्यामध्ये एक चमचा लिंबूची साल त्यामध्ये टाकायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटे झाकून ठेवायचे आहे.

मित्रांनो लिंबूच्या सालीमध्ये खूप गुणधर्म असतात आणि हेच गुणधर्म आपली चरबी कमी करणार आहेत. मित्रांनो 5 मिनिटानंतर आपल्याला या पाण्यामध्ये अर्धा लिंबू रस पिळायचा आहे. तीन घटक आपण या मध्ये टाकलेले आहेत. आता चौथा घटक यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे मध. साधारणपणे एक चमचा मध या मध्ये टाकायचा आहे.

मित्रांनो हे मिश्रण तयार झालेले आहे. हे मिश्रण तुम्ही सकाळी अनुष्यापोटी प्यायचं आहे. सात ते आठ दिवस तुम्ही हा उपाय करून पहा. तुम्हाला तुमच्या वजनामध्ये घट झालेली दिसून येईल. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *