लिंबू तर सगळेच खातात पण लिंबाच्या पानांचे फायदे १०० टक्के लोकांना माहीत नाहीत, अमृतापेक्षा कमी नाहीत हे फायदे…

नमस्कार मित्रांनो जसे की तुम्ही आमच्या या स्क्रीनवर बघत आहात की हे झाड लहान, मोठे सगळ्यांनाच खूपच प्रचलित व परिचयाचे आहे. हे पूर्ण भारतात सहजपणे उपलब्ध असते. जगभरात लोक या झाडाला ओळखतात. तुम्ही व्यवस्थित बघून ओळखले असेल हे झाड ज्याच्या देठाला काटे असतात, याच्या फळांचा वापर केला जातो, पाने या प्रकारची असतात या झाडाचे नाव आहे लिंबाचे झाड. लिंबे तर वर्षभर मिळतात. मार्केटमध्ये नेहमीच मिळतात. लिंबू आपण खातो त्याचे फायदे देखील आपल्याला माहीत आहेत. विटमिन्स कोणती असतात, चवीला आंबट असते ते पण आपल्याला माहीत आहे. लिंबाबद्दल तुम्हाला माहीत आहे पण याच्या पानांचे फायदे आपल्याला माहीत नाहीत.

लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो. आजच्या आमच्या या माहितीद्वारे आम्ही तुम्हाला या पानांचे खास फायदे सांगणार आहोत जे खूपच औषधी आहेत. हजारोवर्षांपासून याचा प्रयोग केला जात आहे. अनेक आजारांना याच्या मदतीने आपण दूर ठेवू शकतो. आयुर्वेदात याचे खूपच महत्व आहे. आज आपण लिंबाच्या पानांचे फायदे बघूया. तुमच्या जवळपास ही पाने, बागेत, मैदानात कुठेही मिळू शकतात. तुम्ही याचा प्रयोग करू शकतात. शेवटपर्यंत ही माहिती पूर्ण
पाहा. त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आयुर्वेदात माहिती महत्वाची आहे, योग्य प्रमाण खूप महत्वाचे आहे. तरच त्याचा फायदा मिळतो. याच्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखीमध्ये आराम पडतो. कोणाला डोकेदुखी, अर्धशिशी, मायग्रेन असेल तर लिंबाच्या पानाचा प्रयोग करून तुम्ही ठीक होऊ शकता. याची पाने हातात रगडून ५ मिनिटे श्वास घ्या, तुम्हाला आराम मिळेल. ही पाने तुमच्या चेहर्‍यावरील डाग, खड्डे, मुरूमे दूर करण्यासाठी फायदेमंद आहेत. ही खूपच दिव्य अशी औषधी आहे. याची पाने घ्या, छोटी ५ ते ६ पाने घ्या, ती वाटून घ्या व त्यात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. दिवसातून एकदा हा प्रयोग करून बघा, चेहर्‍यावरील सुरकुत्या, डाग, मुरूमे दूर होतील व चेहरा चमकदार होईल. लिंबाच्या पानांचे खूप फायदे आहेत.

कोणाला त्वचारोग असेल, खाज, खरूज, नायटा, फोड असेल, तर ते दूर करण्यासाठी लिंबाची पाने खूपच उत्तम असे औषध आहे. त्या साठी एक साधा प्रयोग करून बघा. पाने वाटून त्याची पेस्ट बनवा, त्यात थोडा कापुर व कडुनिंबाचे तेल मिसळा. एक चिमुट हळद घाला. सगळे व्यवस्थित मिसळा व जिथे तुम्हाला खाज, खरूज, नायटा असेल त्याजागी ही पेस्ट लावा. कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगात ह्याचा लेप खूपच फायदेशीर आहे. त्वचारोग नाहीसा होतो, खूपच दिव्य औषध आहे हे. केसांमधील कोंडा नाहीसा करण्यासाठी पण याचा उपयोग होतो. पाने वाटून पेस्ट बनवून केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालीश करा. १ ते २ वेळा लावल्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो.

पोटात जंत झाले असतील, साधारण लहान मुलांच्या बाबतीत जर पोटात जंत झाले, तर लिंबाच्या पानांचा ५ मिली रस घेऊन त्यात हलका मध घालून मुलाला पाजा, त्याच्या पोटातील जंत मरतील या रसाने. मोठ्या माणसासाठी १० मिली रस जरूरी आहे. कावीळ झाली असेल, तर त्यासाठी पानांचा १० मिली रस काढून तो ताकात मिसळून त्याचे सेवन करा. १० ते १२ दिवस हे घेतले तर कावीळ ठीक होते. हा काविळीसाठी रामबाण उपाय आहे. पोटातील कोणत्याही समस्येवर म्हणजेच गॅस, पोटदुखी, बद्धकोष्टता यावर हा उपाय प्रभावी आहे.

तुम्हाला माहीत आहे लिंबू खाण्याचे किती फायदे आहेत त्याचप्रमाणे याची पाने खूपच फायदेशीर आहेत. याच्या पानांचा काढा रक्त शुद्ध करतो. पाने घालून चहा बनवून घेऊ शकता. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर जरूर करा. तुमच्या एका लाइकने आम्हाला पुढील माहितीसाठी प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *