लठ्ठपणा, केसतुड, लघवीची आग, दातांच्या वेदना या सगळ्यांवर मात करेल ही वनस्पती कुठे दिसली तर नक्की उपयोग करा…

नमस्कार मित्रांनो. आपल्या जवळपास बरीच फळे आपल्याला
आढळतात. मग ते आंबा असो, लीची असो, बोर असुदे. यांची फळे आपल्याला फक्त विशिष्ट ऋतुत मिळतात पण त्याची पाने आपल्याला नेहमीच मिळत असतात. मित्रांनो, आमच्यावर विश्वास ठेवा, की यांची पाने यांच्या फळांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात. हो, मित्रांनो, बोराचे झाड तुम्हाला पूर्ण भारतात सगळीकडे दिसते.

तुम्ही बघत असाल, की याची फळे तुम्हाला कायम दिसत नाहीत.
पण याची पाने तुम्हाला नेहमीच दिसतात व त्यांच्या पानांमध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक तत्वे आहेत. बोराच्या पानांमध्ये कितीतरी प्रकारची विटामीन, पोषक तत्वे व कितीतरी प्रकारचे औषधी गुणधर्म आढळले आहेत. त्यांच्या उपयोगाने तुम्ही तुमच्या खूप जास्त समस्या किंवा आजार नाहीसे करू शकता. तर आजच्या माहितीमध्ये आपण बोलणार आहोत केवळ बोराच्या पानांच्या फायद्यांविषयी. चला तर मग सुरू करूया.

सगळ्यात प्रथम आपण बोलूया घसा बसणे. जर घसा बसला असेल, बोलायला त्रास होत असेल, तर अशावेळी बोराची पाने हलकी गरम करा व ती सैंधव मिठाबरोबर खाल्ल्यामुळे घशाचा त्रास ठीक होतो. यानंतर जाणून घेऊया, जर हातापायांची आग होत असेल, तर त्याला कसे ठीक करू शकतो. जर हात व पाय या दोघांची आग होत असेल, तर बोराची पाने वाटून त्यावर लावली पाहिजेत. त्यामुळे हातापायाची जळजळ किंवा आग ठीक होते. यानंतर जाणून घेऊया तुम्हाला तुमच्या शरीरावर कुठेही केसतुड झाले असेल, म्हणजेच केस खेचला जाऊन तिथे जखम झाली असेल. साधारण ही समस्या आपल्या पायांवर होते.

केस कुठे जर खेचला जाऊन तुटला, तर तिथे जखम होते. तर याची पाने वाटून त्याची पेस्ट तयार करा व ज्याठिकणी केसतुड झाले आहे त्या जागी ही पेस्ट लावा तुम्हाला खात्रीने आराम पडेल. त्यानंतर जर तुम्हाला लघवी करताना त्रास होत असेल, लघवी करताना आग होत असेल, तर काय केले पाहिजे. याची कोवळी पाने तोडून घ्या व ती पाने जिर्‍याबरोबर वाटून घ्या व त्याचे सेवन करा. असे केल्यामुळे लघवी साफ होऊ लागते व वेदना, आग यापासून आराम मिळतो.

आता जाणून घेऊया तोंडाची समस्या, म्हणजेच तोंडात छाले झाले असतील, दातांमध्ये वेदना असेल, तोंडाला खूप जास्त प्रमाणात दुर्गंधी येत असेल तर काय केले पाहिजे. तर याची पाने पाण्यात उकळून नंतर ते पाणी थोडे थंड करून त्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे दातांमधील वेदना, तोंडाचा दुर्गंध व छाले ह्यावर आराम पडतो. त्यानंतर बघूया लठ्ठपणा दूर करण्यासाठी याचा कसा उपयोग
होतो. लठ्ठपणा आपण कशाप्रकारे कमी करू शकतो. एक मूठ कोवळी बोराची पाने घ्या. ती स्वछ धुवून मग रात्रभर ती पाण्यात भिजवून ठेवा. भिजवलेली पाने सकाळी पाण्यातून बाहेर काढून घ्या. ते पाणी प्या. एक महिना हा उपाय करून बघा.

तुम्ही बघाल एक महिन्यांनंतर तुमचे शरीर बारीक झाले आहे, वजन कमी झाले आहे. तुमचे शरीर सुंदर दिसेल जे लठ्ठपणामुळे बेढब दिसत होते. पण याचा प्रयोग एखाद्या जाणकार वैद्याच्या देखरेखीखाली केला पाहिजे. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *