नमस्कार मित्रांनो अशाच एका औषधी वनस्पतिबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे जे अनेक रोगांवर उपयोगी पडते. खूपच उत्तम असे आयुर्वेदिक औषधांचे भांडार आहे ही वनस्पति. या वनस्पतीच्या पानांचा, डहाळीचा, बिया बघून तुम्ही समजले असाल की आज मी आघाडा ज्याला हिन्दीमध्ये चिरचिटा, लटजीरा, अप्पामार्ग या वनस्पतिबद्दल माहिती देणार आहे. तुमच्या शहरात याला काय म्हणतात ते जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये लिहा. त्यामुळे आम्हाला पण त्याची नवीन माहिती कळेल.
आज मी आघाड्याचे काही असे औषधी गुणधर्म सांगणार आहे जे तुम्हाला माहीत नसतील. मी याची काही पाने, बिया, डहाळी तोडल्या आहेत. पावसाळ्यात हे झाड आपोआप उगवते व उन्हाळा सुरू झाला की ते सुकायला लागते. याचा मुळांचा उपयोग पण मी या माहितीत तुम्हाला सांगणार आहे. आघाड्याचे हे झाड त्याच्या पंचांगासकट फायदेशीर आहे. पंचांग म्हणजे ५ भाग म्हणजेच, पाने, मूळ, बिया, डहाळी, फळ सगळे उपयोगी आहेत. आघाड्यामध्ये अॅंटी-फंगल, अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म आहेत.
आघाड्याची पाने- वापर कसा कराल- आघाड्याची पाने धुवून तोंडात तशीच चावून खाल्ली तर दाताचे दुखणे कमी होते. हिरड्यातून रक्त येत असेल, हिरड्यांना सूज असेल, वेदना असतील, तर याची काही पाने चावून खा. जेव्हा याचा रस तुमच्या दातांवर लागेल, तेव्हा तुमच्या वेदना गायब होतील. पाने वाटून दातांवर घासा दात पांढरे होतील. कापसात याचा रस लावून तो दातांवर लावा वेदना नाहीशा होतील.
आघाड्याची डहाळी – या सालीने दात घासल्यामुळे दातांमधील कीड निघून जाईल. दातांच्या वेदनांपासून सुटका होईल. पायरीयासारखा आजार ठीक होईल. आघाड्याच्या बिया – तांदूळाच्या दाण्याप्रमाणे असतात.
वापर कसा कराल- पाने व बिया चावून खायच्या नसतील, तर कुटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर लावा. शरीरावरील कोणत्याही गाठीला जर ही पेस्ट लावली तर ती गाठ विरघळून जाते. त्वचारोग असेल, खाज, खरूज असेल तर तो ठीक होईल. बिया व पाने पाण्यात उकळून त्याचा चहा प्यायल्यामुळे भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी, खोकला झाला असेल तर याच्या पानांचा रस किंवा पाने व बिया उकळून याचा काढा घ्या. याच्या रसामुळे पोटातील जंत मरतात व निघून जातात.
आघाड्याची मुळे- वापर कसा कराल- याची मुळे सुकवून त्याची पाऊडर करून ते चूर्ण घेतल्यामुळे मिर्गीसारखा आजार ठीक होतो. मूळव्याधीचा त्रास कमी होतो. आमची माहिती आवडली तर गरजवंतांना नक्की शेअर करा व लाइक करायला विसरू नका. धन्यवाद.