लग्नानंतरचं प्रेम… पती-पत्नींनी अवश्य वाचा….

रात्री जेवण झाल्यावर सगळे गप्पा करत बसले आणि नीतूच्या लग्नाचा विषय निघाला … नीतू ला अनेक स्थळ सांगून येत होती पण तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचे होते . तिला उच्च शिक्षण घ्यायचे होते . सध्यातरी तिने लग्नाचा विचार केला नव्हता , तशी ती घरच्यांशी बोलणार होती .. नीतू आपले मत सांगून निघुन जाणार तेवढ्यात बाबांनी तिला थांबवत म्हणाले, ” अग , पण तुझ्यामागे तुझी बहिण पण आहे तिचा ही विचार कर , तुझं लग्न झाल्याशिवाय तिचे लग्न करता येणार नाही.

तुझ्यामुळे तिच्या लग्नाला उशीर का ?? ” ” हो ना ! ” ‘ थोड़तरी समजून घेत जा .. मोठी झालीस ना आता .. लोकं काय म्हणतील ?? ” नीतू ची आई तिला बोलु लागली. ” अगं आई , मी लग्न करत नाही अस थोडीच म्हणते आहे , मी फक्त 2 वर्ष वेळ मागत आहे आणि ते ही शिक्षणासाठी ! ” नीतू चिडून म्हणाली. पण नंतर शांततेत विचार केल्यावर तिला थोड़ पटलं. आणि लग्नासाठी तयारी दाखवली पण डोक्यात अनेक प्रश्न उठत होते की ज्याला आपण ओळखत नाही त्याच्याकडे अक्ख आयुष्य कसं काढायचं ? आपण एकट कस राहणार ? आणि विचार करता करता च झोपली ….

काही दिवसांत च नीतू चे लग्न ठरले. अर्थात च तिच्या पसंतीने. आणि धूम – धड़ाक्यात पार पडले .. ‘ माधव ला नीतू अगदी बघितल्या बघितल्या च आवडली . त्याच्या मनात जे बायकोबद्दल चित्र होते त्यात नीतू अगदी परफेक्ट बसली होती . पण नीतू कधी माधव शी मोकळी बोलली नव्हती , म्हणून माधव ने मनाशी ठरवले की नीतू न उमललेली कळी आहे , तिला फुलायला शिकवायला हवे . माधव- नितु मंदिरात गेले , देवदर्शन झाले.

येताना माधव नीतू ला म्हणाला , नीतू , एक विचारु का ? ” ” विचारान ! काय झाले ? माझे काही चुकले का ? ” – नीतू ” नाही ग , पण तू अशी शांत शांत असते ना म्हणून एक प्रश्न विचारतो , तू लग्नाला तयार तर होतीस ना की कोणी .. ? -माधव बोलता बोलता थांबला … ” नाही हो , तुम्हीं जो विचार करत आहात तो चुकीचा आहे. मी अगदी माझ्या पसंतीने लग्न केले आहे. मलाही तुम्ही आवडला होतात ..- नीतू ” पण मग तू खुश का नाही वाटत ? तुला कोणा चा काही त्रास होत आहे का ? ” – माधव ” नाही नाही , असे काहीच नाही . तुम्ही कुठलाही गैरसमज करून घेऊ नका . फक्त थोड़ एड्जस्ट व्हायला मला वेळ द्या . ” – नीतू ” आपण थोड़ बोलुया का ? मला बोलायचे आहे जर तुम्हाला वेळ असेल तर . ” – नितुने माधव ला विचारले ..

दोघेही चौपाटी वर गेले. थोड़े फिरले मग माधव म्हणाला , ह बोल तुला काहीतरी बोलायचे होते ना , नीतू म्हणाली , ” हो , म्हणजे मी थोड़ी शांत शांत असते खरं तर मला माझी डिग्री कम्पलीट करून जॉब करायचा होता आणि मग लग्न असा मी विचार केला होता . मला अरेंज पेक्षा लव मैरिज करायला आवडल असत . कारण अनोळखी व्यक्ति सोबत … ” नीतू बोलता बोलता थाम्बली . आणि तिला भरून आले . माधव ला खरा प्रॉब्लेम काय हे कळले . त्यानी ठरवले नितुच्या मनातली सगळी भीती दूर करायची तीला खरं प्रेम म्हणजे काय याचा अनुभव द्यायचा . ” नीतू माझ्याशी मैत्री करशील ? ” माधव ने अचानक नीतू ला हात पुढे करून विचारले . नीतू थोड़ी दादरली पण लाजत हो म्हणाली.

तिला आज एक वेगळा अनुभव आला . माधव ने नीतू ला कॉलेज मधे एडमिशन घ्यायला लावली आणि शिक्षण पूर्ण करण्यास मदत ही केली . तो रोज नीतू ला बाहेर भेटायचा एक मित्र म्हणून . दोघे फिरायचे , गप्पा करायचे , एकमेकांचे सुख दुख समजून घेऊ लागले . हळूहळू नीतू खुलायला लागली . हे बघुन माधब ही खुश होत होता . कधी कधी तर ते चोरुन पण भेटायचे , नीतू लेक्चर ला बंक मारून माधव सोबत सिनेमा बघायची. नीतू च डिग्री च शेवटचे सेमिस्टर होते . तिला प्रोजेक्ट कम्पलीट करण्यासाठी काही महिन्यांसाठी बाहेर गावी जावे लागणार होते. माधव ने सगळी मदत केली आणि तिला सोडून दिले.

नीतू आणि माधव आता फोनवर बोलायचे. त्यांची रोज़ भेट होणे आता शक्य नव्हते . माधव चे आपल्यावरचे प्रेम नितुला कळू लागले . नितु च मात्र मन लागेना. आता तिला माधव ची सवय झाली होती, नीतू ला कळले प्रेम म्हणतात ते हेच . हयात एकमेकांना भेटण्याची ओढ असते . जे खुप भावना प्रधान असते . मन अगदी अधीर होतं . ओठांवर फक्त एक नाव असतं . त्याच आणि आपल एक स्वप्नांच गांव असतं . प्रोजेक्ट सबमिट करून नीतू पटापट आवरून घेऊ लागली . ती आज खऱ्या अर्थाने माधव ला भेटणार होती दोघेही एकमेकांना भेटायला अधीर होते.

शेवटी तो क्षण आला … माधव समोर दिसताच नीतू धावत जाऊन त्याला बिलगली ..आणि म्हणाली मला खरच तुम्ही खुप आवडता .. माझे तुमच्यावर खुप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करु शकणार नाही . मी खुप नाशिबवान आहे की तू मला भेटलास . ही उमललेली कळी बघुन माधव आश्चर्याने बघत राहिला ….

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. फोटो प्रतिकात्मक आहे आणि तुम्हाला लेख कसा वाटला ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. लेखन : दिप्ती अजमीरे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *