Sunday, November 27
Shadow

लग्नात मामाने नवरीच्या मागे उभे राहण्यास नकार दिला अन भर लग्नात जे घडले ते पाहून…

“चला मुलीचे मामा मुलीला घेऊन या..” भटजीच्या आवाजाने तिनं दाराकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं, ऐवढावेळ गौरीहार पूजतानाही तिचं लक्ष कशात लागत नव्हतं. माय मरो आणि मावशी जगो या शब्दाला जागत शेजारी थरथरत का होईना पण मावशी गेल्या पाच दिवसापासून राणूच्या मागे उभी होती फक्त जागा रिकामी होती ती मामाची, लग्न ठरलं तसे अभिनंदनाचे सगळे फोन आले होते.

पण मामाने फोन केला नाही आपण केला तर फक्त हम्म म्हणून ऐकून घेतलं होतं. राणूच्या डोळ्याला तेंव्हाच धारा लागल्या होत्या, आई असे पर्यंत फुलासारखा झेलणारा हा मामा एवढा कठोर कसा झाला असेल..? आईच्या शेवटच्या आजारपणात मामाने जे केलं ते कोणीच करू शकलं नसतं. आपले वडील देखिल नाही पण त्यानंतर मामा एवढा बदलला..? आपण लग्नाची पत्रिका द्यायला गेलो तेंव्हा किती कोरडेपणाने वागला, पत्रिका अगदी बाजूला ठेवून दिली आणि एकच वाक्य बोलला, “लग्नासाठी मामाची जागा रिक्त आहे अशी जाहिरात दे..” त्याच्या या वाक्यावर आपण रडतच बाहेर पडलो त्याच्या घरून..

मनात नुसते विचार हा असा का वागत असेल..? जाहिरात द्यायची मामासाठी इतकं सोपं असतं का मावशी म्हणत आपण किती रडलो मावशीच्या गळ्यात पडून, तेंव्हा ती म्हणाली होती. “अग तो नुसता बोलतो ग, तो नक्की येईल बघ, पाठीराखा म्हणून उभा राहायला.” मावशीच्या त्या पाठीराखा शब्दान मामा सोबतचे बंध आठवले, आई कडचंअगदी हक्काच माणूस, आजोळी हट्ट करायला, मस्ती करायला, आजोळी आलं की बसस्टँड पासून आपली दळणवळण व्यवस्था करणारा, अगदी आंनदी असणारा, आपल्याशी खोटंमोठं भांडण करणारा मामा कधी खरखर भांडायला लागला आणि ते ही आई गेल्यावर, सगळं आठवून राणूने मनसोक्त रडून घेतलं.

मावशी तोंडापुरत म्हणून गेली. कोणी मंडपातल उभं करू मामा म्हणून तू नको जीव जळू पण नंतर मावशीने घर गाठलं होतं मामाचं, नेमकं काय झालं तुला पोरीला रडत परत पाठवलस..? तुला यावं लागेल लग्नाला, अरे काही जागा ह्या हक्काच्या ओघानेच मनाशी जोडलेल्या असतात रे, ती वेळ ती जागा कदाचित कोणी भरून नेईल पण तिच्या मनात असलेली मामा नावाची जागा कायम रिती होऊन जाईल रे, आज तिची आई असती तर, एवढ बोलताच मामाच रडायला लागला, “ताई नको ग तिची आठवण काढू, खुप मुश्किलीने मी तिला विसरू पाहातो.

पण हि समोर आली की ताई आठवते, तिचे शेवटचे हाल आठवतात, तिचा आजार आणि त्या आजारात ह्या सगळ्यांनी सोडलेली तिची साथ, ती शेवटी शेवटी खुप दुःखी झाली ज्या संसारासाठी खस्ता खाल्ल्या त्या लोकांनी साथ सोडली, मी दिली साथ तिला पण मृत्यूने मला हरवून तिला नेलं ग, तिचे शेवटचे अश्रू ह्या सगळ्यांच्या वागण्यामुळे आणखी वाढले, मला नको वाटतात हि माणसं, मावशीने त्याच्या पाठीवर हात फिरवला,” दादा अरे ती जाणार काही महिन्यात हे डॉक्टरांनी सांगताच मुळातच ते सैरभैर झाले, कदाचित नव्हती त्यांच्यात ह्या सगळ्या प्रसंगाला तोंड द्यायची हिम्मत, ते कमी पडले हे युद्ध लढण्यात पण लेकरं त्यांना काय दोष रे..?

आपली संपत जाणारी आई बघणं हे किती क्लेशदायक होतं त्यांनां, चुकले असतील रे ते तेंव्हा पण म्हणून आता त्यांच्या आनंदाच्या क्षणात त्यांना एवढी शिक्षा देऊ नकोस, नात्यांच्या काही जागा ह्या रिक्तच असतात. उगाच तोंड देखलं म्हंटल्याने कोणी मामा होत नसतं. ती मामाची जागा मनातली असते प्रसन्न, निरागस आणि आंनदी ती तशीच तिच्या मनात जपलेली ठेव.मला मंडपात तुझी आस राहील आणि आपली अक्का स्वर्गातून नक्कीच पाहिल, तुझं पाठीमाग उभं असणं तिलाही कुठेतरी समाधान देईल, बघ बाकी तू ठरव, निघते मी म्हणत ताई गेली.

ती आता डोळ्यात अश्रू पुसतानाच मामाने बघितली. मामा खोलीत आला, चटकन राणूच्या डोक्यावर हात ठेवत त्याने स्वतःचे अश्रू पुसले, मंडपात तिची पावलं आता, आनंदाने आणि आत्मविश्वासाने पडत होती.स्टेजवर अक्काच्या फोटोकडे मामाच लक्ष गेलं आणि फोटोला घातलेला हार खाली पडला,..त्याक्षणी लेकीमागे उभा मामा हि भरलेली जागा आईला सुखावून गेली असंच डोळ्यातले अश्रू लपवणाऱ्या राणूला वाटलं.

Leave a Reply

Your email address will not be published.