रोज ४ भिजलेले बदाम रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे जाणून तुम्ही दंग होऊन जाल…

नमस्कार मित्रांनो,

आज मी तुम्हाला सांगणार आहे बदामाचे सेवन आपल्याला कशा प्रकारे केले पाहिजे. केव्हा खाल्ले पाहिजेत, किती खाल्ले पाहिजेत, सुखे खाल्ले पाहिजेत की भिजवून खाल्ले पाहिजेत? बदामाची साले काढून खाल्ले पाहिजे की सालासकट खाल्ले पाहिजेत ते बघूया.

चला तर मग बघूया बदामाचे सेवन कसे केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा मिळू शकेल. बदाम हे एक सुपरफूड म्हणून ओळखले जाते. दररोज बदाम खाल्यामुळे खूप आजार दूर होतात. आजच्या या माहितीमध्ये तुम्हाला बदाम कशा प्रकारे सेवन करता येतील ते सांगणार आहे.

४ ते ५ बदामापेक्षा जास्त बदाम खाऊ नयेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने बदाम खाल्ले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की मिळेल. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहे. तुम्हाला ४ ते ५ बदाम घ्यायचे आहेत, रात्रभर ते पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी उठल्यावर त्याची साले काढून रिकाम्या पोटी खायचे आहेत.

बदामाच्या सालीत टैनिन नावाचे तत्व असते, ते आपल्या पचनासाठी चांगले नाही, आपल्या पचनास ते विरोध करू शकते. म्हणून साले काढून टाकायची आहेत. चावून चावून खायचे आहे. त्यामुळे शरीराला त्याचे सगळे फायदे मिळतील. इथे बघा पाण्यात भिजलेल्या बदामाची साले चटकन निघून येतात. बदामात असे काय आहे जे इतके ताकदवान मानले गेले आहे.

भरपूर प्रमाणात अॅंटी-ओकसिडेंट्स, फायबर, कार्बोहायड्रेटस, प्रोटेन्स असतात तसेच कॉपर, झिंक, विटामीन ई, आयोडीन व मैग्ंनेशियम असते. ४ ते ५ बदाम खायला तुम्ही सुरुवात करा. पाण्यात भिजवलेले बदाम खाणे जास्त योग्य. बदाम खाल्यामुळे आपण बर्याेच आजारांना दूर ठेवू शकतो. सगळ्यात प्रथम बदाम जेव्हा आपण खातो, तेव्हा शरीराला तो डीटोक्सिफाईड करतो.

शरीरातून विषारी तत्वे बाहेर टाकतो. ज्यांना उच्च रक्तदाब आहे, तो नियंत्रणात राहातो. हाडांचे दुखणे, कंबरदुखी, खांद्याचे दुखणे असेल तरी आराम पडतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहाते. हे हृदयाचे रोगी आहेत, त्यांनी ३ ते ४ बदामाचे सेवन नियमित केले पाहिजे. मधुमेही लोक आहेत, त्यांनी बदाम जरूर खाल्ले पाहिजे.

बदाम खाल्यामुळे त्वचा चांगली राहाते, केसांची गळती थांबते, केस मूळापासून मजबूत होतात. कॅन्सर सारख्या आजारापासून वाचवतो बदाम. बदाम खाऊन एक ग्लास दूध प्यायले तर अधिक उत्तम. वजन कमी करण्यासाठी दूध मलाई नसलेले प्या. सकाळी नाश्ता करण्याच्या आधी बदाम चावून चावून खा.

दूध चालत नसेल, तर पाणी पिऊ शकता बदाम खाल्ल्यावर. बदाम खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे राहाते त्यामुळे जास्तीच्या खाण्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकतो. वजन नियंत्रणात राहाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *