रोज सकाळी उठल्याबरोबर हा 1 मंत्र बोलल्याने गरिबीचा नाश होतो….

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर ह्या एका मंत्राचा जप अवश्य करा. हा मंत्र कोणत्याही प्रकारची गरिबी, कंगाली, दारिद्रता अवश्य दूर करतो. मित्रांनो जीवनामध्ये सुख व दुःख हे येतच असते. ही जीवनाची रीत आहे. मात्र जीवनातील दुःख कमी करण्यासाठी दारिद्रता म्हणजे गरिबी दूर करण्यासाठी हिंदू धर्मशास्त्रात काही पुरातन उपाय सांगितले आहेत.

हे उपाय जर विधिपूर्वक केले तर घरातील दुःख, दारिद्रता, गरिबी या समस्या दूर करता येतात आणि घरात सुखसमृद्धीचा, ऐश्वर्य, वैभवाचा वास निर्माण करता येतो. हजारो वर्षापूर्वी सांगितलेले मंत्र आणि श्लोक हे आजच्या आधुनिक युगातसुद्धा तितकेच प्रभावशाली मानण्यात आले आहेत. या मंत्रांचा जप योग्य वेळी केला विधिपूर्वक म्हणजे नियमानुसार केला योग्य दिशेला मुख म्हणजे तोंड करून जर मंत्रांचा जप आपल्याकडून होत असेल तर या मंत्रांचा प्रभाव तात्काळ दिसून येतो.

मंत्र म्हणजे काही शब्दांचा काही अक्षरांचा समूह असतो. मात्र या मंत्रांचा जप केल्याने वातावरणामध्ये असे काही तरंग पसरतात की आपल्या सभोवती एक सकारात्मक वातावरण निर्माण होत आणि असे काही योग निर्माण होतात जेणेकरून आपल्या जीवनात सुख, ऐश्वर्य, वैभव, पैसा, धन आपोआप निर्माण होऊ लागतो. मित्रांनो हे मंत्र अत्यंत रहस्यमय आहेत आणि योग्य दिशेला तोंड करून बसून आपण या मंत्रांचा जप केला तर त्या मंत्राच्या संबंधित देवता ही अवश्य प्रसन्न होते.

आज आपण जो मंत्र पाहणार आहोत तो देवादीदेव महादेवांचा मंत्र आहे. आपली कुलदेवता कोणतेही असुद्या मात्र आपण महादेवांच्या नावाचा जप केला तर महादेव आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. त्यांना भोलेनाथ असे म्हणतात. ज्याप्रमाणे हनुमान लगोलग प्रसन्न होतात त्याप्रमाणे भोलेनाथ महादेवसुद्धा लगोलग प्रसन्न होणारे देवता आहेत. केवळ महादेवांच्या मंत्रांचा जप केल्याने महादेवांची कृपा बरसते. जीवनातील मोठ्यात मोठे कष्ट मोठ्यात मोठ्या समस्या केवळ महादेवांच्या स्मरणाने दूर करता येतात.

मित्रांनो असे म्हटले आहे या कणा कणात महादेव सामावलेले आहेत आणि म्हणून महादेवांच्या मंत्रांचा जप हे महादेवांना प्रसन्न करणार ठरते. या मंत्राचा जप सकाळी उठल्यावर जर दररोज आपण करू लागला तर आपला दिवस तर शुभ जाईलच मात्र जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल. अगदी कोणत्याही प्रकारची अडलेली कामे दूर होतील. कोणत्याही कामामध्ये किंवा क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल. दुःख, दारिद्रता, गरिबी या नकारात्मक गोष्टी दूर होऊन जीवनात चैतन्याची निर्मिती होईल.

ज्या मंत्राबद्दल बोलत आहे तो आहे ‘ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. पुरुषांनी ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा आणि महिलांनी नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महिलासुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. मात्र वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील किंवा संतानसुखाची प्राप्ती होत नसेल तर आपण ओम वगळून फक्त नमः शिवाय इतक्याच मंत्राचा जप केलेला उत्तम राहील.

मित्रांनो जो ओम शब्द आहे याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले असते. खरतर ओम हा अ, उ आणि म या अक्षरापासून बनलेला शब्द आहे. अ म्हणजे ब्रम्हा, उ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महेश. ब्रह्मदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली. भगवान श्री हरी विष्णू सृष्टीचे पालनकर्ता आहेत. तर या सृष्टीच्या रक्षणाची जबाबदारी ही महेश म्हणजे देवादीदेव महादेवांवर आहे. ओम हा शब्द परिपूर्ण मनाला जातो. केवळ ओमच उच्चारण केल्याने आपण त्रिदेवांना म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना प्रणाम करत असतो. यांचे आशीर्वाद प्राप्त करत असतो.

ओमच्या उच्चाराने वातावरण सकारात्मक बनत असते. वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ओम नमः शिवाय असे आपण जेव्हा उच्चारण करतो ओम ला आपण जेव्हा भगवान विष्णूंसोबत जोडतो तेव्हा या मंत्राचा जप केल्याने संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याकडे खेचली जाते. या मंत्राचा जप करताना शक्य असेल त्यांनी पद्मासनात बसावे. शक्य नसेल तर साधी मांडी घालून बसला तरी चालेल. मात्र आपले तोंड हे उत्तर दिशेला करा. उत्तर दिशा ही अत्यंत महत्त्वाची दिशा आहे.

भगवान शंकर कैलास पर्वतावर विराजमान असतात आणि हा कैलासपर्वत भारताच्या उत्तर दिशेला आहे आणि उत्तर दिशेकडे तोंड करून वज्रासनात किंवा पद्मासनात बसून ओम नमः शिवाय हा मंत्र रुद्राक्षाच्या माळेवर किंवा इतर कोणत्याही माळेवर एकशे आठ वेळा मंत्र म्हणा. दररोज सकाळी या मंत्राचा जप केल्याने तणावमुक्ती होते. जर तुमच्या मनावरती मोठ्या प्रमाणात ताणतणाव असेल तर हा ताणतणाव दूर होतो.

प्रसन्नमुद्रेने आपला दिवस व्यतिथ होतो. प्रत्येक कामामध्ये यश मिळते. जर तुम्ही या मंत्राचा दररोज जप करू लागला तर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यापासून कुणीही रोकू शकणार नाही. समाजामध्ये मान, प्रतिष्टी अवश्य वाढेल. मित्रांनो दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करत चला. हा जप करण्यापूर्वी स्नान करणे अनिवार्य आहे. स्नान करून या मंत्राचा जप करावा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *