रात्री झोपण्याआधी शरीराच्या या २ अंगांवर लावा याचे तेल, मिळतील कमालीचे फायदे.

महिला दिवसभर कामात व्यस्त असतात. अशा वेळी त्या स्वत:कडे जास्त लक्ष देत नाहीत. त्यामुळे कितीतरी महिलांना पूर्ण दिवस थकवा व आळस जाणवतो. आज आम्ही तुम्हाला त्यापासून आराम मिळण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त झोपायच्या आधी स्वत:साठी फक्त ५ मिनिटे वेळ काढायचाआहे.

चला तर मग जाणून घेऊया या संबंधी विस्ताराने- हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जरूर पडणार आहे मोहरीच्या तेलाची. हे तेलविटामीन, कॅल्शियम, आर्यन इत्यादि पोषक तत्वाने, अॅंटी-ओकसिडेंट्स आणिऔषधी गुणांनी परिपूर्ण असते.

कितीतरी प्रकारच्या औषधांमध्ये या तेलाचावापर केला जातो. ते तेल खूपच पौष्टिक मानले जाते. त्यामुळे याचा उपयोग स्वयंपाकात केला जातो. हे प्रकृतीने गरम असल्यामुळे याचा उपयोग थंडीच्यादिवसात जास्त प्रमाणात करावा.

शरीरात हे उष्णता निर्माण करते. दातांच्यातक्रारीवर त्यामध्ये मीठ मिसळून जर दातांवर घासले, तर दाताच्या वेदना कमीहोतात. दातांना मजबूती येते. त्वचेवरील कोणताही जंतुसंसर्ग असेल, तर मोहरीच्या तेलाच्या उपयोगाने तो दूर करता येतो. मोहरीचे तेल केसांच्या मुळांना मजबूती देऊन, रक्ताभिसरण वाढवते. यामध्ये लिनोलिक अॅसिड व ओलिक अॅसिड असल्यामुळे ते केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयोगी आहे.

याचा एकटॉनिक म्हणून पण उपयोग केला जातो. या तेलाने शरीराची मालीश केल्यामुळेक्ताभिसरण उत्तम प्रकारे होते. मांसपेशी व हाडे यामध्ये बळकटी येते.खास करून झोपायच्या आधी पायाचे तळवे, बेंबी यांवर मोहरीच्या तेलाने मालीश केले तर खूपच फायदेशीर मानले गेले आहे.

पायाच्या तळव्याला मालीश केल्याचे फायदे- झोपण्याच्या आधी थंड किंवा कोमट मोहरीच्यातेलाने ५ मिनिटे पायाच्या तळव्यांना मालीश करा. त्यामुळे रक्ताभिसरण उत्तम होते. डोळ्याची दृष्टी चांगली होण्यास मदत होते. दिवसभराचा थकवा, वेदना, तणाव दूर होऊन चांगली झोप लागते. मांसपेशी व हाडांना मजबूती येते. अशा वेळी सांधे व शरीरातील अन्य भागांमधील वेदनांपासून सुटका मिळते.

झोपण्याच्याआधी पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालीश केल्यामुळे शरीरात जमा झालेली जास्तीची चरबी कमी व्हायला मदत होते. बेंबीच्या भोवती मालीश केल्याचे फायदे- झोपण्याच्याआधी ५ मिनिटे बेंबीचे मोहरीच्या तेलाने मालीश करा. त्यामुळे ओठ फाटणे, ओठांना भेगा पडणे, ही समस्या दूर होते व ओठ मुलायमव गुलाबी रंगाचे होतात. या मालीशमुळे पचन सुधारते व पोटाच्या वेदना व त्यासंबंधी जोडल्यागेलेल्या सगळ्या समस्यांपासून सुटका होते.

बेंबीमध्ये मोहरीच्या तेलाने मालीश केल्यामुळे डोळ्याची जळजळ, खाज व डोळे कोरडे पडणे ह्या सर्व गोष्टी ठीक होण्यास मदत मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *