‘रात्रीस खेळ चाले’ रणजित जाधव यांचा एक अप्रतिम लेख…

टायटल वाचून भयकथा वगैरे वाचण्याच्या मूडमध्ये असाल तर माफ करा, इथं मी रात्री झोपल्यावर आपल्या शरीरात काय खेळ चालतो ते समजावणार आहे. एका मुलीची फेसबुक पोस्ट वाचली आणि हे लिहिणं गरजेचं वाटलं … पोस्ट अशी होती .. “ यशस्वी होण्यासाठी एकतर पहाटे पाच पर्यंत काम करा नाहीतर पहाटे पाचला काम सुरू करा पहाटेचे पाच वाजलेत मी माझं काम थांबवतेय आणि झोपतेय तुम्ही आता काय करणार आहात ?? ” शॉकिंग … 00 हे काय खूळ आहे यशाचं.

दिवस आणि रात्र हे एक निसर्गाच चक्र आहे आणि शरीराचं 24 तासाच घडयाळसुद्धा. रात्री आपण झोपतो तेंव्हा आपल्या शरीरातील अवयव आराम करतात. यात सर्वात जास्त फायदा हा हृदयाला होत असतो. कसते समजून घ्या … आपण जेव्हा बसलेले किंवा उभे असतो तेंव्हा हृदयाला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करत डोक्याकडे रक्तपुरवठा करावा लागतो.

तसेच चालताना, पळताना, इतर काही कष्टाची कामं करताना हृदयाच्या स्नायूंना अधिक ताकदीनं काम करावं लागतं त्यामुळे दिवसा हृदयाचे स्नायू तणावाखाली काम करत असतात. जेंव्हा आपण झोपतो ( जमिनीशी समांतर होऊन supine position ) तेंव्हा हृदयाच्या स्नायूंना आराम मिळतो, जास्त ताकद लावण्याची गरज पडत नाही.

आपल्या शरीराच 24 तासांच घड्याळ आहे , यात बऱ्याचशा क्रिया या वेळेनुसार होत असतात .. जस की सकाळच मलविसर्जन , भूक लागणे , झोप लागणे , जाग येणे … तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी रात्री 12,1 नंतर इतकी झोप येते की control च होत नाही . 7,8 तास झोप झाल्यावर आपोआपच जाग येते …. हा दिनक्रम तुमच्या सवयीनुसार सुरूच असतो. झोपेची एक सायकल असते. झोपल्यावर सुरुवातीला डोळे आणि आपल्या हालचाली बंद झाल्याने मेंदूला मिळणारे सिग्नल बंद होतात आणि मेंदू हळूहळू शांत होत जातो. ही झोपेची सुरुवात असते.

हृदय हळूहळू शांत होत जातं ( कस ते आधीच सांगितलं मी ). हालचाल कमी झाल्याने सर्व अवयवांची oxygen आणि glucose ची गरज कमी होते , त्यामुळे फुफ्फुस पण शांत होत जातं , श्वासोच्छास शांत होत जातो. किडनी , यकृत आणि इतर सर्वच अवयव शांत होतात. या प्रक्रियेत सुरुवातीचे दोनएक तास जातात. हे होत असताना अजून एक काम चालू असत ते म्हणजे पोटातील अन्न पचवण्याच. हे सर्व घडत असताना कोणी उठवलं किंवा इतर काही कारणांनी disturb झालं तर लगेच जाग येते.

काही काळानंतर अन्न पचनासाहित सर्व काम संपतात. आता रक्ताकडे खूप महत्वाच काम असत ते म्हणजे शरीराची झालेली झीज भरून काढण्याचं ( हे काम फक्त रात्रीच होत असतं , जेंव्हा रक्ताकडे दुसर कसलंही काम नाहीय ) , याच काळात पियुष ग्रंथिकडून growth hormone ( शरीराच्या वाढीस कारणीभूत व उपयुक्त ) हे रक्तात येतं , आणि शरीराच्या ज्या ज्या अवयवांना वाढीची गरज आहे तिथल्या पेशींच्या मदतीने ते सुरू होतं. यावेळची जी झोप असते ती असते ” गाढ झोप “. यावेळी कितीही disturb झालं तरी जाग येत नाही.

रात्रीच्या वेळी शांत जरी असला तरी मेंदू मात्र पूर्णपणे काम थांबवत नाही. काहीतरी बारीकसारीक त्यात शिजतच असत , त्यातल्याच काही गोष्टी ज्या आपल्याला लक्षात राहतील त्यांना आपण ” स्वप्न ” असे म्हणतो . ( बऱ्याचवेळा ही सर्व भेळमिसळ असते , उदाहरणार्थ- तुम्हाला माहीत असलेल्या परंतु एकमेकांशी काहीच संबंध नसलेल्या व्यक्ती एकत्र काम करताहेत अस अनेकदा स्वप्नात दिसतं ) . शेवटी मलमूत्र विसर्जनासाठी किंवा इतर काही कारणांनी जाग येते. या पूर्ण सायकलला 6 ते 8 तासाचा कालावधी लागतो. ही सायकल दररोज व्यवस्थित पार पडली तर शरीर स्वस्थ आणि सुदृढ राहतं.

मानसिक आणि शारीरिक संतुलन राहतं. आणि म्हणूनच ज्यांची झोप चांगली होते त्यांचे चेहरे प्रसन्न आणि टवटवीत दिसतात . competition , motivation आणि success च खूळ डोक्यात घेतलेले लोक स्वतःच्या शरीराची इतकी हेळसांड करतात की शेवटी success सोबत खूप सारे शारीरिक problems ही मिळवतात.

रात्री 10 च्या आसपास झोपून पहाटे 5/6 ला उठणे सर्वोत्तम. परंतु रात्र जागत घालवणे यात तुम्ही काहीच मिळवत नसता उलट तुमच्या शरीराचे नुकसानच जास्त होते . मग आता तुम्हीच ठरवा … रात्री जागून तुमचा व्यवसाय वाढवणं , अभ्यास करणं , चित्रपट बघणं , social media हाताळण जास्त महत्वाच की 8 तासाची झोप.

कधी रात्री जागायची वेळ आलीच ना. तर ठणकावून सांगा ते काही जमणार नाही. मला रात्री खुप महत्वाचं काम असत ®® ( खतःवर प्रेम करा ) धन्यवाद तुमचाच -रणजित जाधव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *