Thursday, September 29
Shadow

रजनीकांतची मुलगी आणि जावई धंनुष आणि ऐश्वर्या झाले वेगळे! लग्नाच्या १८ वर्षांनंतर जोडीने घेतला निर्णय…

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोडी धंनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी लग्नाला १८ वर्षे झाल्यानंतर आपल्या वेगळे होण्याच्या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. चला तुम्हाला याविषयी सांगतो. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता धंनुष याने सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या हिच्याशी १८ नोव्हेंबर २००४ मध्ये धुमधडाक्यात लग्न केले होते. तेव्हापासून ही जोडी लोकांची आवडती जोडी बनली होती. पण खूप लोक निराश झाले, जेव्हा धंनुष आणि ऐश्वर्याने आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. हो, आता हो जोडी कायमकरिता वेगळी झाली आहे. चला तुम्हाला याबद्दल विस्ताराने सांगतो.

प्रथम हे जाणून घ्या, की ऐश्वर्या एक फिल्म निर्देशक आणि प्लेबॅक सिंगर आहे. धंनुषची ऐश्वर्‍याशी पहिली भेट त्यांचे वडील व सुपेरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर एका समारंभात झाली होती. ऐश्वर्या ही धंनुषच्या बहिणीची चांगली मैत्रीण पण होती. त्यानंतर धंनुष आणि ऐश्वर्या यांच्या भेटी वारंवार होऊ लागल्या आणि दोघांची चांगली मैत्री झाली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री होती पण मीडियामध्ये बातमी येऊ लागली होती की दोघांमध्ये प्रेमसंबंध चालू आहेत. या अफवेमुळे दोघांचे परिवार हैराण झाले व त्यानंतर धंनुष आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी धंनुषचे वय फक्त २१ वर्षे व ऐश्वर्याचे वय २३ वर्षे होते.

धंनुष आणि ऐश्वर्याच्या परिवाराच्या सम्मतीने दोघांचे लग्न ठरविले गेले आणि रजनीकांत यांच्या घरी धुमधडाक्यात १८ नोव्हेंबर २००४ मध्ये लग्न झाले. लग्न तामिळी पद्धतीने झाले व दोघेही पारंपरिक पोषाखात छान दिसत होते. या जोडीला २ मुलगे आहेत, यात्रा राजा आणि लिंगा राजा., ज्यांचा जन्म २००६ आणि २०१० मध्ये झाला होता. पण आता लग्नाला १८ वर्षे झाल्यानंतर दोघांनी आपले मार्ग वेगळे केले आहेत.

तसे तर १८ जानेवरी २०२२ला ऐश्वर्या आणि धंनुष यांनी सोशल मीडियावर आपल्या वेगळे होण्याची घोषणा केली होती. ट्विटरवर एका पोस्टमध्ये धंनुषने लिहिले आहे” आम्ही १८ वर्षांपर्यंत मैत्री, जोडी, पालक, आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून प्रगति, समजदारी, आणि एकत्रपणे खूप लांबचा पल्ला गाठला. आज आम्ही ज्या वळणावर उभे आहोत, तिथून आमचे दोघांचे रस्ते वेगळे होत आहेत. आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ला समजून घेण्यासाठी आम्ही वेळ घेत आहोत.

आमच्या निर्णयाचा सन्मान करा आणि आमच्या वैयक्तिकतेकडे लक्ष ठेवा.”. ओम नम: शिवाय. ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर याच नोटला शेअर करताना लिहिले आहे” कोणत्याही कॅप्शनची जरूर नाही. तुमच्या समजूतदारपणा व प्रेमाची गरज आहे.” धंनुषला शेवटी फिल्म “अतरंगि रे” मध्ये सारा अली खान आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर बघितले गेले होते. ही गोष्ट नक्की आहे, की त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. तुमचे यावर काय मत आहे? कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.