या दोन शेतकऱ्यांनी मुंबई मध्ये केलेली कमाल पाहून थक्क व्हाल!

मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो जुन्या काळातील एक किस्सा, त्यावेळी नवीन ट्रॅक्टर फक्त मुंबईतच मिळत असे आणि मुंबई ला जाण्यासाठी रेल्वे शिवाय पर्याय नव्हता. अश्या काळात दोन ‘शेतकरी’ नगदी रक्कम घेऊन ट्रॅक्टर आणण्यासाठी मुंबईला निघाले. रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट काढून ते रेल्वेत बसले, आणि रात्री आठच्या सुमारास मुंबईत पोहचले. स्टेशनवर उतरले…. काय करावं काय समजेना? जवळ नगदी पैसे कावरेबावरे होऊन इकडे तिकडे बघत होते.

दुकाने सकाळी दहा वाजता उघडणार. रात्री पैसे घेऊन कुठे झोपायचे.. आता काय करावं.. हा विचार मनात करत होते. असा विचार करता करता ते बाहेर पडण्यासाठी गेट जवळ आल्यावर त्यांनी झोडीदाराला सांगितले! की तू गप्प बस..! काही बोलू नकोस आणि गेट जवळच्या TC जवळ जाऊन घाबरून इकडे तिकडे बघू लागला.

TC ने त्याला विचारले..! ये तिकीट दिखाओ. त्याचा तो करारी आवाज ऐकून दोघेही गप्प झाले आणि म्हणाले… नाही साहब तिकीट पड्या हैं! झूट बोलता तिकीट नाही निकाला तिकीट के बिना आया. चल अंदर चल जेल मै चल… अभी रात के 12 बजे हैं सुबहा केस दर्ज होगा.. जोडीदार घाबरला. पहिलं त्याला म्हणाला गप्प गुमान बस काहीच बोलू नको.

TC ने त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यानं कोठडीत बसवलं. खायला नियमाप्रमाणे भात आणून दिला. भात खाऊन ते दोघे झोपले. सकाळी उठून तोंड धुऊन चहा पिला. 10 वाजता बरोबर TC आला कानी म्हणाला, चलो..! शेतकरी म्हणाला कूट नेता आम्हाला..

TC म्हणाला तिकीट के बिना सफर करणा गुन्हा हैं! अब तुम्हारे उपर केस दर्ज होगा! TC पुढे आणि हे दोघे मागे.. गेट जवळ आले. आहो साहेब थांबा की, तशी हळूच दोन तिकिटे काढून त्याला शेतकऱ्यांने दाखवली. तिकीट निरखून TC पाहू लागला आणि म्हणाला रात को क्यू नाही दिखाया! शेतकरी म्हणाला साब हमारे पास इतने सारे रुपये हैं, हम यहा नये आऐ हैं! कूच भी मालूम नाही! रात को कहा जायेंगे, चोरोंका डर इसलीये सोचा यही सोयेंगे! ऐसे तुम सोने नही देते! इसलीये ये दिमाग चलाया!

TC कपाळाला हात मारून घेतला. बाबारे तुम हमारे गुरू बन जावो! हम कुछ तुमसे सिखेंगे! शेतकरी म्हणाला..! धन्यवाद साहेब.. रातभर हमारे लिये पहारा दिया ओर खाणे को भी दिया! इतना तो लॉजवाले भी नही करते! TC म्हणाला जा बाबा जा अब ओर दिमाग मत खा! हसत शेतकरी स्टेशन बाहेर पडले. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना अडानी आणि कमी समजू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *