या चार गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल…

चाणक्यनीती हा चाणक्य लिखित एक उपदेशपर ग्रंथ आहे ज्यात आयुष्य सुखी करण्यासाठी काही सोपे उपाय आणि सूचना दिल्या गेल्या आहेत ज्यांचे पालन केले तर आयुष्य खरंच सुखकर आणि यशस्वी होईल. या ग्रंथाचा मुख्य हेतू हा मानव जातीला जीवनाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहार्य शिक्षण देणे हा आहे.

चाणक्य हे एक खूप मोठे ज्ञानी होते ज्यांनी त्यांच्या या नितीशास्त्राच्या आधारावर चंद्रगुप्त मौर्याला राजगादीवर बसवले होते. ही चाणक्य नीती खूप उपयुक्त आहे. तर चला जाणून घेऊया चाणक्य यांच्या काही महत्वाच्या नीती ज्या तुम्हाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर कामाला येतील यात काही शंकाच नाही. चाणक्यांनी अशा काही गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत, कोणाच्या समोर बोलू नयेत.

अपमान : आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा कोणी आपली मस्करी करते किंवा आपला अपमान होतो. आपला झालेला अपमान कधीही चारचौघात सांगू नये. याने लोक तुमचा आणखी उपहास करू शकतात. नेहमी सगळ्या लोकांच्यात चांगल्या गोष्टी शेयर करा. मानाचे किंवा कौतुकाचे प्रसंग जरूर चारचौघात सांगा.

कुटुंबातील खाजगी गोष्टी : आपल्या कुटुंबातील खाजगी आणि अंतर्गत गोपनीय गोष्टी कोणाला सांगू नयेत. आपल्या पत्नीचा स्वभाव, तसेच तिच्या चारित्र्याबाबत गोष्टी कधीही चारचौघात सांगू नये. घरातील मतभेद हेच प्रत्येक वेळी घरातील भांडणांचे कारण नसते तर बाहेरच्या लोकांच्या चुगलीमुळेसुद्धा घरात भांडणे होतात आणि म्हणून बाहेरच्या लोकांना ह्या गोष्टी कधीही सांगू नयेत. बाहेरची लोक आपल्या घरात फुट पडू शकतात म्हणून अशा गोष्टी कधीही शेयर करू नका.

वैयक्तिक सल दुःख : तुमच्या वैयक्तिक दुःख किंवा सल असेल तर त्याबाबत चर्चा बाहेर करू नये. कारण लोक तुमची खिल्ली उडवू शकतात. तुमच्या समस्या कोणाला सांगू नये कारण कदाचित लोक तोंडावर तुम्हाला सहानुभूती दाखवतील पण तुमच्यामागे ते तुमची खिल्ली उडवतील. आपल्या खाजगी गोष्टी या केवळ जवळच्या आणि खात्रीशीर लोकांकडेच सांगा.

धनाच्या नुकसानाबाबत : बरेचदा असे होते कि आपल्याला आर्थिक नुकसान होते किंवा काही आर्थिक समस्या येतात पण याबाबत कोणाला सांगू नका. असे केल्याने तुमची मस्करी केली जाऊ शकते किंवा पैशाच्या समस्यांमुळे लोक तुमच्यापासून दूर होऊ शकतात. म्हणून या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका.

चाणक्यांनी सांगितलेल्या या महत्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *