म्हातारा झाला म्हणून शेठने या कामगाराला हा’कलून दिले पूढे जे घडले ते पाहून…

ऐ sss शि’व्या ! हे दोन कट्टे ठेव…… साहेबांच्या गाडीत ! शेठजींनी मारलेली हाक ऐकून…..दुकानाबाहेर बसून असलेला…. आपल्या वयाची साठी गाठलेला…. शिवा ! ” ” व्हय जी आलो” म्हणत… जागेवरचा ऊठला ! दुकानातील पंचवीस किलो कोलम तांदळाचा कट्टा उचलु लागताच ,अंधारी आल्यासारखे वाटुन त्याचा एकदम तोल गेला! अन्…. ..तांदळाचा कट्टा खाली पडला ….. तो ही पडता पडता वाचला !

” ईतक्या वर्षापासुन हमाली करता करता आयुष्य चाललय् आपलं… पण, कधी तोल गेला नाही ? आज..आज असं कसं झालं ? शिवाने स्व:तालाच कोसलं! काय रे ! एवढेही काम होत नाही का तुझ्याने ? किती वर्षापासून काम करतोस? शेठजी ओरडले …….

शेठजींना शिवावर ओरडतांना बघून… तांदळाचे कट्टा खरेदी केलेले ….. बाजूलाच उभे असलेले….. सत्तरीचे ऐक सद्गृहस्थ लगबगीने पुढे झाले…आणि शिवाला म्हणाले …… थांबा दादा ! मी मदत करतो तुम्हाला कट्टा उचललायला! त्यांनी शिवाला कट्टा उचलायला हातभार लावला ! म्हणाले , “या दादा इकडे ! माझ्या गाडीच्या डिकीत कट्टा ठेऊ !”

ते बघताच शेठजी जागेवरून उठत म्हणाले…… ” अरे साहेब! तुम्ही कशाला त्रास घेतला .? त्याचे कामच आहे ते! आता थोडं वय झालं त्याचं .. झेपत नाही त्याला काम !” “हो ना! कधी कधी शरीर निरोगी असतं , मात्र मन थकले तरी कामाच ओझं अवजड वाटतं ! ” शिवाकडे बघत “ते” बोलले!

” बाकी काय म्हणता साहेब” ? शेठजीनी त्यांची ख्याली खुशाली विचारली ! ” महाराज्यांच्या क्रुपेने सर्व उत्तम चाललयं! ” त्यांचा उत्सव जवळ आला आहे ना ! त्याचीच तयारी सुरू आहे ! बरं… येतो शेठजी ! गडबडीत आहे जरा ! या तुम्ही परवा महाराजांच्या दर्शनाला आणि महाप्रसादाचाही लाभ घ्या”…. शिवा कडे वळून ते म्हणाले, दादा, तुम्ही पण या ! आणि ते सद्गृहस्थ गाडीत बसून निघून गेले….

शिवा त्यांच्या कडे बघत राहीला ! ” किती भारदस्त व्यक्तिमत्व आहे यांचे ! माझ्यापेक्षा वयानं मोठे असुनही किती आदराने माझ्याशी वागले… ” अशा व्यक्ती फार कमी अनुभवास येतात ! त्याला “त्या” व्यक्तिबद्दल खूप आदर वाटला ! . तो पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला ! आजच्या घटनेने त्याच्या मनांत भविष्या बद्दल चिंता निर्माण झाली! काम तर करावंच लागणार आपल्याला ! पण आताशी ओझे उचलले जात नाही ! दिवसेंदिवस शरीर तर थकत तर चाललचं , पण मनावरही मरगळ यायला लागली आहे …. मात्र आयतं बसुन खाणं काही आपल्या नशीबात नाही…. कट्टे ऊचलण्या ऐवजी ,आपल्या वयाकडे बघून ऐखादं हलक फुलकं काम शेठजींनी आपल्याला दिलं तर ….. “

“आपल्या आयुष्याचे सरते दिवस आले तरी काबाडकष्ट काही संपले नाही…. लहानपणापासून पोती उचलत आहे…आणि अजूनही तेच काम करत आहे ! त्याला त्या सदग्रुहस्थांचं बोलणं आठवलं ….. त्यांच्यासारखीच आपल्यावरही कोणाचीतरी क्रुपा व्हायला पाहिजे होती ! आयतं बसून खाता आलं असतं !” आणि त्याच्या मनांत “त्या” महाराजांच्या दर्शनाची आस निर्माण झाली ! त्याने शेठजीनां विचारले….. “कुठं हायजी थे महाराजांचे मंदिर ?” शेठजींनी त्याला मंदिराचा पत्ता सांगितला…. “जाशील परवा तिथे महाप्रसादाला” !

शिवाने “हो” म्हणून मान डोलावली ! दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला पण थकल्यासारखे वाटत होते …. त्याच्याने त्या दिवशी काम झाले नाही ! “शेठ म्हणाले…….. शिवा उद्यापासून तु कामावर नको येत जाऊ ! आता तुझ्याच्याने काम झेपत नाही ……… मी दुसरा तरुण व्यक्ती ठेवलाय कामासाठी ! उद्दा त्या मंदिरात जा….. तिकडे काम न करताही कोणी दोन पैसे ठेवेल तुझ्या हातावर!”

अचानकपणे शेठजी बोलले आणि शिवावर जणू डोंगरच कोसळला ! कामच नाही तर………. असे एकदम कामावरून काढू नका न शेठजी ….. एवढ्या वर्षापासून मी तुमच्याकडे काम करत आहे ! छोटे-मोठे कुठलेही काम करेन मी ! दोन पैसे कमी दिले तरी चालेल… पण मला कामावर ठेवा… नाहीतर मी माझ्या बायकोचं पोट कसे भरु ? आता या वयांत मी कुठं काम शोधु ? शेठजीनां वारंवार विणवणी करत हात जोडून तो म्हणु लागला ! शेठजींनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं!

गण्या ! हे पोतं उचल .. म्हणून शेठजींनी एका तरुण व्यक्तीला आवाज दिला! संध्याकाळ पर्यंत दूकानाबाहेर रिकामा बसुन राहून शिवा घरी निघाला ! चालतांना त्याचे डोळे भरुन येउ लागले…. आता बायकोला काय सांगणार ! तीही दोन वर्षांपूर्वी धुणं-भांडी करायला बाहेर जायची…. परंतु कोणीतरी तिला गाडीने ठोस मारली आणि अपंगत्व आले ! घरातले सर्व काम ती घुसत घुसतच करायची……. पोरांची लग्न लावून त्यांचा वेगळा संसार थाटून दिल्याने आता ती दोघंच एकमेकांना सोबती होती!

दुसर्‍या दिवशी सकाळी उठुन आंघोळ वगैरे करून शिवा महाराजांच्या मंदिरात पोहचला ! दुरूनच त्याने पाहिले…. मंदिराबाहेर…. सभामंडपात…. सगळीकडे भक्तांची गर्दीच गर्दी दिसत होती ! गर्दी कमी झाली की आपण आत जाऊन दर्शन घेऊ.. म्हणुन तो मंदिराच्याबाहेर झाडाखाली बसला ! मंदिराबाहेर भीक मागणाऱ्यांची रांग लागलेली होती ! आपल्या अवतारावरून कुणीही आपल्याला याचकच समजेल असे त्याला वाटुन गेले …….पण….. असे काम न करता पैसे घेणं… त्याच्या मनांला पटणार नव्हतं…..! त्याचे लक्ष सभा मंडपाच्या बाहेर ठेवलेल्या भक्तांच्या पादत्राणाच्या ढिगाऱ्याकडेे गेले ! एवढ्या मोठ्या ढिगार्‍यात नेमक्या आपल्या पादत्राणाचा जोड शोधणं भक्तांना कठीण जात होतं !

काय करावे ! त्याला सुचत नव्हते ! पोटापुरते कमावण्याच्या नादात ….आजचं तर झालं….. उद्दाची चिंता करण्यात… कधी मंदिराकडे पाय वळलेच नाही …आणि आपलं ओझं दुसऱ्यावर लादनं कधी जमलंच नाही आपल्याला ….. पण आता ! उद्या महाराजांच्या मंदिरात महाप्रसाद आहे , तिथे जायला हवं ! येतांना बायकोसाठी पण प्रसाद घेऊन येऊ…. चला ! उद्याच्या जेवणाची तर चिंता मिटली ! महाराजांचे दर्शन घेऊन …. हात जोडून त्यांच्या समोर गार्हाणे मांडु आपलं ! काहीतरी मार्ग निघेल…… या विचारांनीं त्याच्या मनावरचं ओझं थोडं कमी झालं ! तो घरी पोहचला आणि जेवण करून शांत् मनानं झोपी गेला….!

ईतक्यात….. कोणीतरी त्याच्या पुढ्यात नाणं टाकलं ! शिवाने त्या व्यक्तीकडे बघितलं ! “दादा !” म्हणून आवाज देऊन थांबविलं….. आणि खाली वाकून पटकन आपल्या उपरण्याने त्या व्यक्तीचे बुट साफ करु लागला ! ” अरे ! हे काय करतोस ? ” म्हणून त्या व्यक्तीने त्याला हात धरून उठवले आणि म्हणाले,…… अरे वेड्या ! सेवा करायची तर महाराजांची कर …माझी नको !

“पण साहेब मला अस फुकटं पैसे घेणं आवडत नाही… काम करून पैसे कमावणारा मी ! ” अरे ठेव ते पैसे…… तुझ्या हाताने तू अजून कोणा गरजुला दे तेेे !” असे म्हणून ती व्यक्ती पुढे निघून गेली …………….

त्या व्यक्तीचे बोलणे शिवाला अस्वस्थ करू लागले ……काय सेवा करू मी महाराजांची ? माझ्या अवतारावरून मला कोणी मंदिरातही जायला मज्जाव करेल ! नको ,नको …..अपमान होण्यापेक्षा आपण बाहेरच थांबावं…….. गर्दी कमी झाल्यावरच आत जाऊ ! पण मंदिरात येणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी बघून तो अचंबीत झाला होता ……अबब ! किती हे भक्तगण ! नक्कीच महाराजांच्या सेवेने काहीतरी कृपा होत असेल……. म्हणून तर एवढे सगळे येतात ईथे दर्शनाला……. पुन्हा त्याचे लक्ष पादंत्राणाच्या ढिगाऱ्याकडे गेले…….. एक आजोबा केव्हापासून आपले एक पादंत्राण हातात धरून दुसरं शोधत असल्याचे त्याच्या लक्षात आले ……तो पटकन उठला आणि त्या आजोबांच्या जवळ जाऊन म्हणाला….

“दादा मी शोधून देऊ का तुमच्या पादंत्राणाची जोडी ? सांगा बरं कशी होती ? ” आणि आजोबांनी वर्णन केल्याप्रमाणे 2 – 3 पादंत्राणे त्याने आजोबांना दाखवले ! आजोबांनी त्यांना हव्या असलेला त्यांचा जोड घेऊन पायात सरकवला …. हात वर करून त्यांनी शिवाला आशीर्वाद दिला ! शिवाला मनोमन खूप छान वाटलं…… आपण कुणाची तरी मदत शकलो याचे त्याला समाधान वाटले…… लहानपणापासून आपल्याला कामासाठी बोलणंच ऐकावं लागतं होतं…….पण आज निस्वार्थ भावाने आपण कुणाची तरी मदत केली आणि त्यांनी आपल्याला आशीर्वादासाठी हात वर केला…… ही गोष्ट शिवाला सुखावुन गेली !

शिवाचे…. तो करत असलेले काम बघून बाकी भक्तांना वाटले , हा इथला सेवेकरीच असणार……. ते हीे मग त्याला आपल्या पादंत्राणाची जोडी शोधून देण्यास सांगू लागले…..आणि तोही निस्वार्थ भावाने प्रत्येकाला मदत करू लागला ! म’ध्यान्ह झाली ! महाप्रसादाला गर्दी होऊ झाली… त्यानेही महाप्रसाद घेतला …. आणि पुन्हा तो आपल्या कामाकडे वळला ! घरी जाण्याचेही त्याला भान राहीले नाही! सायंकाळ झाली….रात्रीचे नऊ वाजले ! गर्दी ओसरत आली…. दिवसभराच्या दगदगीने तो थकला आणि तिथेच मंदिराच्या पायरीवर बसला ! त्याची नजर समोर गेली….. कुणीतरी त्याला त्याच्याकडे येतांना दिसले!रात्रीच्या वळेस त्याला चेहरा ओळखता आला नाही. जवळ येतांच त्या व्यक्तीनी शिवाला विचारले….

“काय रे शिवा ! थकलास “? “न्हाई जी” ! म्हणत तो ऊठला ! “त्यांनी” आपुलकीनं केलेल्या विचारपुशीने तो सुखावला…. तुम्ही कसं ओळखता जी मले ? अरे ,आपण परवा भेटलो नव्हतो कां शेठजीच्या दुकानात ? तुझा कट्टा उचलायचा भार कोणी हलका केला होता ? विसरलासं ? न्हाई जी ! पण तुम्ही माझी आठवण ठेवली? शिवाच्या शब्दांत आश्चर्य होते….. आणि आपोआपच शिवाचे हात “त्या” व्यक्ती समोर जोडल्या गेले !

ते शिवाला म्हणाले….. थकला तर असशीलच ! सकाळपासून भक्तांना सेवा देतांना पाहिले आहे मी तुला ! निस्वार्थ मनाने तू सेवा देत होतास ! त्यांची होणारी गैरसोय नकळतपणे लक्षात आणुन दिली तु माझ्या ! येतोस का इथे उद्यापासून सेवा द्यायला ? पांदत्राणे ठेवायला लोखंडी स्टँड आणुन ठेऊ ! म्हणजे व्यवस्थित काम होईल ! महिन्याचा पगार मिळेल आणि जेवणाची व्यवस्था पण होईल ! येतोस ?

शिवा क्षणभर त्या व्यक्तीकडे बघतच राहिला ! “त्यांच्या” त्या दोन डोळ्यातून असिम क्रुपेचा वर्षाव होत असल्याचा त्याला भास होऊ लागला…. आणि तो स्तब्ध झाला ! ” दर्शन घेतले की नाही अजून ? ” प्रश्न ऐकून शिवा भानावर आला !

“आता मंदिरात जाउन दर्शन घ्यायची गरज वाटत नाही जी!” म्हणत शिवाने पुन्हा ऐकदा समोरच्या प्रतीभेला नतमस्तक होउन दोन्ही हात जोडले !!!!!! ■■■”आज तरी तु माझ्याकडे ” याचक” म्हणून येशीलच… या अपेक्षेने ” मी ” आशीर्वादासाठी हात वर करून ठेवला ! पण…… तु कष्टालाच देव मानंलस् ! आणि माझा हात तुझ्यासाठी वरच्या वरच राहिला ■■■

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *