मोठे मोठे डॉक्टर जिथे थकतात, हार मानतात, तिथे ही औषधी वनस्पती उपयोगी पडते, खूपच गुणकारी औषधी वनस्पती…

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा औषधी झाडाची किंवा रोपाची माहिती देणार आहे ज्याबद्दल बर्‍याच लोकांना माहिती नाही. आपण याला निरोपयोगी पालापाचोळा म्हणून फेकून देतो. पण या रोपांचे खूप जास्त प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असतात, औषधी उपयोग असतात व कितीतरी आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात. मित्रांनो, आपला देश हा वनस्पतींचा देश आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पति आढळून येतात.

औषधी वनस्पतींचा खजाना आहे आपला देश. ज्या आपल्या आसपास असतात परंतु आपल्याला यांची योग्य माहिती नसते, त्यामुळे आपण त्यांचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही. मित्रांनो, ही जी तुम्हाला दिसते आहे ती चमत्कारी वनस्पति आहे, औषधी वनस्पति आहे, ज्याला खूप सुंदर फुले आलेली दिसत आहेत, हिरवीगार पाने आहेत हे सगळे खूपच उपयोगी आहे. कदाचित, आतापर्यंत तुम्ही ही वनस्पति बघून, त्याची फुले व पाने बघून ती वनस्पति ओळखली असेल की आज मी कोणत्या वनस्पतिविषयी तुम्हाला माहिती देणार आहे.

ही चमत्कारी व औषधी गुणधर्म असलेली वनस्पति आहे “घाणेरी”. ज्याला खूप ठिकाणी “राईमुनिया” असे म्हणतात, काही ठिकाणी “तडतडी” म्हटले जाते, तर संस्कृतमध्ये “अग्निमंत” म्हटले जाते. तर हे जे घाणेरीचे झाड आहे त्याला तुमच्या शहरात किंवा गावात कोणत्या नावाने ओळखतात ते कमेन्ट बॉक्स मध्ये लिहून जरूर कळवा. हे पावसाळ्याच्या ऋतुत रस्त्याच्या कडेला, नदी, तलाव यांच्या किनारी किंवा कुठेही जवळपास तुमच्या घराजवळ पण दिसू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात.

हे झाड, याची फुले, याची पाने सगळे खूप उपयोगी आहे. झुडुपासारखे दिसणारे हे जे झाड आहे, त्याची सुंदर फुले असतात परंतु हे झाड थोडे विषारी असते त्यामुळे प्राणी हे खात नाहीत. परंतु औषधी तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याची पाने तुम्ही बघा, फूल बघा व याच्या हिरव्या रंगाच्या बिया छोट्या छोट्या दाण्यांप्रमाणे तुम्हाला इथे दिसत आहेत. ह्या हिरव्या बिया जेव्हा पिकतात, तेव्हा त्या काळ्या रंगाच्या होतात. ह्या बिया पण खूप गुणकारी असतात.

जेव्हा खूप जास्त प्रमाणात गावामध्ये डास होतात, उन्हाळ्याच्या दिवसात डास खूप होतात, तेव्हा याची पाने सुकवून त्याची
पाऊडर तयार करतात व ती जाळतात. त्यामुळे डास घरात येत नाहीत. तुम्ही सुकी पाने जाळली तरी डास पळून जातील. मलेरियाचे डास पळवून लावतात हे घाणेरीची पाने. काही लोक याची पाऊडर बनवून औषधांमध्ये याचा उपयोग करतात. अॅंटी-ओकसिडेंटने परिपूर्ण असते हे झाड, पाने. याची पाने वाटून त्याची पेस्ट जर घाव किंवा जखम झाली असेल, तर त्यावर लावल्यामुळे घाव भरून येतो.

दातांमध्ये वेदना असतील, तर याची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्या, तर दातांमधील वेदना क्षमते. पानांची पेस्ट जर कपाळावर लावली, तर मैग्रेनची समस्या नाहीशी होते. त्वचेसंबंधी आजार दूर करतात ही पाने याची पेस्ट फोड, पुरळ यावर लावल्यामुळे आजार नाहीसा होतो. सुंदर फुले म्हणजेच गुलाबी, पिवळी फुले असलेले हे झाड मनमोहक दिसते.

पावसाळ्याच्या ऋतुत जी वनस्पति जागोजागी बघावयास मिळते. याची पाने व बिया वाटून त्यात थोडे नारळ तेल मिसळून जर सफेद डागांवर रात्रभर लावून ठेवले तर १५ दिवसात फायदा दिसून येईल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *