मुतखडा होण्याची प्रमुख कारणे आजच जाणून घ्या नाहीतर….

सगळ्यात प्रथम तुम्ही हे जाणून घ्या, की मूतखडा म्हणजे काय? मूतखडा ही एक सामान्य समस्या आहे, जी कोणत्याही वयाच्या व्यक्तिला होऊ शकते. लघवीत आढळलेले यूरिक एसिड, फोस्फोरस, कॅल्शियम, ओक्सालिक अॅसिड हे सर्व मिळून मूत्राशयात खडे तयार करतात. मूत्राशयात खडे जमा होणे म्हणजेच किडनी स्टोन, हे कधीतरी मूत्रमार्गात पण होऊ शकतात.

मूतखडा म्हणजे, मूत्राशयात पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा कॅल्शियमची मात्रा वाढल्यामुळे त्याचे हळू हळू खडे बनतात, जेव्हा हे खडे एकत्र येतात तेव्हा मूतखडा तयार होतो, त्यामुळे मूत्रपिंडात मोठा खडा तयार होऊन, त्यामुळे मूत्राशयात यांच्या हालचालीमुळे वेदना होऊ लागतात, सतत उलट्या होणे, पोटात खूप वेदना होणे यासारख्या समस्या सुरू होतात.

एका मुलाखतीत, दिल्ली येथील असोशिएट डायरेक्टर आणि हेड ऑफ एण्ड्रोलोजी आणि रोबोटिक सर्जरी डॉक्टर मानव सूर्यवंशी म्हणतात, जर मूत्राशयत खडे निर्माण होण्याची लक्षणे ताबडतोब लक्षात आली व त्यावर इलाज केला, तर ह्या समस्येपासून लवकर सुटका होऊ शकते व ती समस्या नाहीशी होते.

मूत्रपिंडात खडे होण्याची कारणे: पाणी कमी झाल्यामुळे: पाणी कमी प्यायल्यामुळे मूत्रपिंडात खडे होण्याची शक्यता असते. जे लोक उष्ण प्रदेशात राहातात, जसे की राजस्थानसारखे वाळवंट, त्यांना घाम जास्त येत असल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे त्यांना हा विकार होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते.

चुकीचे खाणे: आताच्या आपल्या आहारात जरुरीपेक्षा जास्त साखर आणि प्रोटेन्स यांचे सेवन केल्यामुळे किडनीस्टोन ही समस्या होऊ शकते. जर तुम्ही फास्ट फूडचे शौकीन असाल, तर ते खाणे कमी करा. कारण फास्ट फूड मध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असते. ज्यामुळे मूत्राशयात कॅल्शियमचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे ही समस्या होऊ शकते.

आजकाल लोक घरातील खाण्याच्या ऐवजी बाहेरचे चटपटीत खाणे पसंत करतात. पण बर्या्च कमी लोकांना माहीत आहे, की टोमॅटो, बीट, भेंडी, चहा, चॉकलेट या सर्व पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. कारण हे सर्व असे पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने, व्यक्तिला मूतखड्याची समस्या होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढू शकते. काही लोकांना कच्चे तांदूळ तोंडात टाकायची सवय असते. हे सवय घातक आहे. यामुळे ही मूतखडयाची समस्या होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *