Monday, September 26
Shadow

मुकेश अंबानी यांच्या ५ सर्वात महागड्या मालमत्ता, ६५० कोटीची खेळण्यांची कंपनी आणि १०० कोटीचे घर आहे त्यामध्ये समाविष्ट…

इथे आम्ही तुम्हाला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ५ सर्वात महागड्या मालमत्तेविषयी सांगणार आहोत, ज्यांची किंमत जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ति मुकेश अंबानी यांनी जगात नाव कमावले आहे. ते “रिलायन्स इंडस्ट्रीज” चे मालक आहेत, जे जगभरात पोहोचले आहे. ते एक अब्जाधीश आहेत, जे आपले आयुष्य राजेशाही पद्धतीने जगत आहेत. त्यांच्या जीवनशैलीबद्दल प्रत्येक व्यक्तिला माहिती आहे. आलिशान वाहनांपासून ते महागड्या मालमत्तांपर्यंत सर्व काही त्यांच्याकडे आहे, ज्याची कल्पना एक सर्वसामान्य माणूस स्वप्नातही करू शकत नाही. इथे आम्ही तुम्हाला मुकेश अंबानी यांच्या ५ सर्वात महागड्या मालमत्तेविषयी सांगणार आहोत, ज्याची किंमत १०० कोटींपेक्षा जास्त आहे.

स्टॉक पार्क- मुकेश अंबानी यांनी काही काळापूर्वी ब्रिटनचा प्रसिद्ध कंट्री क्लब आणि लक्झरी गोल्फ रिसॉर्ट “स्टॉक पार्क” खरेदी केले होते. ९०० वर्षे जुने हे स्टॉक पार्क ३०० एकर मध्ये पसरलेले आहे. मुकेश अंबानी यांनी ही मालमत्ता स्वत:ची करण्यासाठी ५७ पौंड म्हणजेच ५९२ कोटी रुपये खर्च केले आहेत. जेम्स बॉन्डच्या २ फिल्म्स “गोल्डफिंगर” (१९६४) आणि “टोमोर्रो नेव्हर डाइस” (१९९७) यांचे चित्रीकरण इथेच झाले आहे.

हैम्लेज टॉप कंपनी- सन २०१९ मध्ये मुकेश अंबानी यांनी खेळणी बनविणारी ब्रिटिश कंपनी “हैल्मेज” खरेदी केली होती. हैम्लेज ही जगातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी खेळणी बनविणारी कंपनी आहे. मिळालेल्या रीपोर्टनुसार मुकेश अंबानी यांनी ही कंपनी साधारण ६५० कोटी रुपयांना खरेदी केली होती. १७६० मध्ये स्थापन झालेल्या या हैम्लेज कंपनीची जगभरात १६० स्टोअर्स आहेत.

एंटीलिया- जगभरातील दुसरी सगळ्यात महागडी मालमत्ता म्हणजे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा शानदार बंगला “एंटीलिया” आहे. “जीक्यु इंडिया” च्यानुसार, २७ मजले असलेल्या या इमारतीची किंमत १ बिलियन म्हणजेच १०० कोटी रुपये आहे. दक्षिण मुंबई येथील अल्टामाऊंट रोड येथे असलेल्या अंबानी परिवाराच्या घरात ९ लिफ्ट्स, मोठी बॉलरूम, थिएटर, स्पा, मंदिर आणि बर्याअच टेरेस गार्डन आहेत. ६व्या मजल्यावर पार्किंगची व्यवस्था आहे. ६०० कामगार येथे काम करतात, ज्यांचे पगार लाखों रुपये आहेत.

आयपीएलटीम मुंबई इंडियन्स – जसे की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, की आयपीएलची विख्यात टीम मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आहेत. अंबानी परिवाराने २००८ मध्ये ही टीम खरेदी केली होती. ही आयपीएलची सगळ्यात महागडी टीम आहे. ही टीम अंबानी यांनी ७४८ कोटी रुपयांना खरेदी केली होती. या टीमने ५ आयपीएल मॅच जिंकल्या आहेत.

मैडरीन ओरिएंटल हॉटेल (न्यूयॉर्क)- मुकेश अंबानी यांनी २०२२च्या सुरूवातीला न्यूयॉर्क मधील प्रसिद्ध हॉटेल “मैडरीन ओरिएंटल हॉटेल” खरेदी केले. ईटी च्या रीपोर्टनुसार “रिलायन्स इंडस्ट्रियल ईन्वेस्ट्मेंट्स अँड होल्डिंग्स” हॉटेलचा ७३.३७ टक्के भाग घेण्यासाठी ९८ मिलियन डॉलर भरावे लागतील ज्याची किंमत भारतीय चलनात बदलण्यासाठी अंदाजे ७२९ कोटी रुपये होतील. या हॉटेलमध्ये हॉलीवूड सितार्यां बरोबर अनेक सेलेब्रिटी येत असतात. तर, मुकेश अंबानी यांच्याकडे कितीतरी महाग मालमत्ता आहे हे स्पष्ट झाले आहे. आमची माहिती कशी वाटली ते कमेन्ट बॉक्स मध्ये लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published.