मिळली तर भाग्याचं, सतत लघवी येणे, शुगर, प्रतिकारशक्ती वाढवणारी करटोले भाजी…

बघा मित्रांनो आजची वनस्पती आहे “करटोली” म्हणजे त्याला काही भागात “कंटोला” असे ही म्हटले जाते ही भाजी २०० ते ३०० रुपये किलोने मिळते म्हणजे येवडी महाग ही भाजी आहे. बघा ह्या भाजीमध्ये असे काय गुण आहेत ते आपल्यासाठी महत्वपुर्ण आहेत. ही भाजी जी आहे ती जंगलामध्ये भेटते. जंगलामधून आणावी लागते.

करटोलीचे तसे दोन प्रकार आहेत. एका करटोलीला कोणतेच फळ येत नाही व दुसऱ्या करटोलीला फळ येते असे दोन प्रकारचे करटोली असतात. हे करटोली श्रावण महिन्यामध्ये येत असतात. ही जी भाजी आहे ही आपल्याला मुगाच्या डाळी मध्ये करून खायची असते. ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी या भाजीचे जर सेवन केले तर त्यांच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी ही भाजी आहे.

ज्यांना दम्याचा त्रास आहे. त्या व्यक्तींनी ह्या भाचीचे सेवन केले पाहिजे. कारण या भाजीचे जर तुम्ही सेवन केले तर तुमच्या दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. ज्यांना कॅन्सर आहे किंवा ज्यांना कॅन्सर होऊ द्यायचा नसेल तर या भाजीचे सेवन जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या कॅन्सरच्या ज्या वाढणाऱ्या पेशी आहेत त्याला बऱ्याच प्रमाणात कॅट्रोल करण्याचं काम ह्या भाजीचे सेवन केल्यामुळे होते.

मित्रांनो हे बघा ही जी भाजी आहे ह्या भाजीचे सेवन आपण अवश्य केले पाहीजे कारण का तर हा जंगलातला रानमेवा आहे , ही लाख मोलाची भाजी आहे. आपल्या शरीरातील थकवा जर आपल्याला काढून टाकायचा असेल तर ही भाजी खाल्ल्यानंतर हा थकवा नक्कीच निघून जातो. कारण या भाजीमध्ये एंटी ऑक्सीडेंट गुणधर्म आहेत.

ही भाजी खाल्यामुळे आपल्याला बरेचसे आजार जे आहेत ते होण्याची शक्यता दाट कमी असते. म्हणजे आजार होणारच नाहीत. मित्रांनो रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी ही भाजी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला जर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायचे असेल तर सिजनेबल आशा पालेभाज्या आपल्याला खाल्ल्यात पाहिजेत.

त्यासाठी जंगलात अशा काही भाज्या आहेत त्या आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात . त्यामुळे त्या भाज्यांचे सेवन आपण अवश्य केले पाहिजे. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात पण ते आपल्याला माहित नसतात. बघा मित्रांनो माइग्रेन असो किंवा डोकेदुखी असो याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर काय करायचं तर या भाजीचा सेवन करायचं, याने काय होत तुमचे माइग्रेन असो किंवा डोकेदुखी याचा त्रास बऱ्याच पैकी कमी होतो.

बऱ्याच व्यक्तींना घाम येत असतो आणि घाम आल्यामुळे शरीराची दुर्गंधीही वाढते तर अश्या व्यक्तीने काय करायचे तर या भाज्यांचं सेवन करायचं यामुळे तुमच्या शरीरातून जास्त घाम येणार नाही. पोट साफ होण्याकरिता ही भाजी अत्यंत उपयोगी आहे. कारण पोट साफ झाले तर आपले वजन नक्कीच कमी होते. याच्यामध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात आहे.

याच्यात प्रोटीन आहे विटॅमिन आहेच व पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात , याच्यामध्ये अल्फा बीटा कॅरोटीन असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भाजी आपली त्वचा उजळ करण्यासाठी मदत करते. कारण याच्या मध्ये काय असते तर अल्फा आणि बीटा कॅरोटीन असते जेकी त्वच्या उजळ करण्यासाठी मदत करतात. त्याचे सेवन केल्याने आपली दृष्टी सुधारण्यास ही मदत होते.

एवढे भरपूर असे फायदे या भाजीचे आहेत त्याच्यामुळे ही भाजी आपण अवश्य सेवन केली पाहिजे. कारण अशा जंगली भाज्या खाल्ल्या मुळे जे फायदे मिळतात ते फायदे इतर कोणत्याही भाज्या खाऊन मिळत नाहीत. ह्या जंगली भाज्यांचा फायदा काय असतो तर आपण इतर भाज्यांना जी रासायनिक खते वापरतो ते जंगली भाज्यांना आपण वापरत नाही, त्यामुळे अश्या भाज्या नक्कीच खात जा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *