मानवजातीसाठी वरदान आहेत जांभूळाची पाने, कुठे दिसली तर गुपचुप तोडून घ्या, उपयोग करा…

नमस्कार मित्रांनो. आपला भारत देश हा विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा देश आहे. इथल्या प्रत्येक जिल्हा,गाव,शहर यामध्ये तुम्हाला औषधी वनस्पति म्हणजेच जडीबुटी आढळते. तर आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ही महिरी शेवटपर्यंत जरूर वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला एका अतिशय उत्तम अशा औषधी वनस्पतिबद्दल सांगणार आहोत. मित्रांनो याचे नाव आहे “जांभूळ”. जांभूळ हे फळ तर तुम्हाला सर्वांनाच परिचित आहे व ते तुम्ही अवश्य खाल्ले असेल.

काळी काळी जांभळे खायला खूपच स्वादिष्ट व गोड लागतात. जांभूळ खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे आजार दूर होतात. पण तुम्हाला माहीत आहे का जांभळाची फळेच नाही तर जांभळाच्या पानांनी पण तुम्ही अनेक समस्या दूर करू शकता. जांभूळाच्या पानांमध्ये “कसाय” नावाचे तत्व आढळते. जे अनेक आजारांवर औषध म्हणून काम करते. चला तर मग जाणून घेऊया जांभळाच्या पानांच्या फायद्यांसंबंधी.

सगळ्यात पहिला फायदा हा आहे की डोळ्यात वेदना होणे, डोळ्यात कोणताही जंतुसंसर्ग, इन्फेकशन होणे. लहान मूल असो, किंवा मोठी व्यक्ति असो, सगळ्यांना डोळ्यांशीसंबंधीत काही त्रास संभवतात. आजकालच्या प्रदूषित वातावरणामुळे, संगणकाच्या अतिरिक्त वापरामुळे, सतत मोबाइल डोळ्यासमोर असल्यामुळे अनेक आजार होतात जसे की डोळे दुखणे,लाल होणे. त्यासाठी तुम्ही १५ ते २० जांभूळाची कोवळी पाने घ्या व ४०० मिलिलिटर पाण्यात शिजवून घ्या.

जेव्हा हा काढा १/४ राहील त्यांनी डोळे धुवा. तसेच कानांमध्ये कोणत्याही कारणामुळे कधीतरी वेदना होतात, कांनातून पू येतो त्यासाठी जांभूळाच्या बी मधामध्ये उगाळून घ्या व त्याचे १ ते २ थेंब कानात घातल्यामुळे कानाचे वाहाणे तसेच वेदना कमी होतात. त्याचबरोबर जर तोंडात छाले झाले असतील- मित्रांनो, नेहमीच खाण्यापिण्यात जर बदल झाला तर तोंडात छाले होतात. त्यासाठी जांभूळाच्या पानांचा रस काढा व त्या रसाने गुळण्या केल्यामुळे तोंडातील छाले बरे होतात.

जर तुम्हाला वारंवार उलटी येत असेल,तर त्यासाठी आंब्याची व जांभळाची पाने समान प्रमाणात म्हणजेच २० ग्राम घ्या व ४०० मिलिलिटर पाण्यात ती शिजवा किंवा उकळा. जेव्हा पाणी १/४श राहील, तेव्हा थंड करून त्या पाण्याचे सेवन करा त्यामुळे उलटी, मळमळ यासारख्या समस्यांमध्ये लाभ होतो.

त्याचबरोबर कुठे जर खाज, खरूज, नायटा झाला असेल, तर जांभूळाची पाने वाटून त्याचा रस त्या भागावर दिवसातून १ ते २ वेळा लावल्यामुळे २ ते ३ दिवसात खाज, खरूज, नायटा यापासून सुटका मिळते. मूतखडा ही समस्या असेल, तर जांभूळाच्या १० ते १५ ग्राम कोवळी पाने घ्या व त्याची पेस्ट बनवा. त्यामध्ये २ ते ३ काळी मिरी घालून सकाळी व रात्री सेवन केल्यामुळे मूतखडा
लघवीच्या वाटे निघून जातो.

२ ते ३ काळी मिरी वाटून घालायची आहेत. आजची आमची माहिती जर आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *