माता लक्ष्मी सांगते – घरात एक नियम बनवून घ्या धनाची कमतरता कधीच पडणार नाही.

चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते.आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाणक्यांची काही नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील.

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो,आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की असे कोणते सोपे उपाय आहेत, जे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात वापरू शकता व समृद्धि मिळवू शकता. मित्रांनो, असे कोण आहे, ज्याला माता लक्ष्मीची कृपा नको आहे? तुम्ही पण जर माता राणीचा आशीर्वाद मिळवू इछिता, तर कमेन्ट मध्ये “जय मा लक्ष्मी” “जय माता दी” लिहायला विसरू नका. एक लाइक तर माता लक्ष्मीसाठी जरूर करा.

प्रत्येक माणूस आपल्या जीवनात खूप पैसा कमवायला बघत असतो. कारण पैशाशिवाय जीवन संभव नाही. धनाशिवाय तुम्ही सुख सुविधांच्या वस्तु खरेदी करू शकत नाही. खरे तर, बरेचसे लोक असे पण असतात, जे पैसा तर भरपूर मिळवतात., पण त्यांच्याजवळ काही कारणाने धन टिकत नाही. त्यामुळे ते खूप हैराण असतात. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला २ असे उपाय सांगणार आहोत, जे रविवारच्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत. कारण रविवारचा दिवस हा सूर्यदेवाचा दिवस आहे.

सूर्यदेवाला सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख-समृद्धि हवी असेल, तर रविवारी रात्री झोपताना आपल्या उशाशी एक ग्लास पाण्यात थोडेसे दूध घालून झोपा. परंतु, या गोष्टींकडे लक्ष द्या, की ते अशा जागी ठेवा की रात्री तुमचाच हात लागून ते पडता कामा नये. सकाळी उठल्यावर स्नान करून हे पाणी बाभुळीच्या झाडाखाली टाका. असे केल्यामुळे तुमच्या घरात धन टिकून राहील व तुमच्या मनाला शांतता लाभेल. जर तुमचे कोणते काम होत नसेल, किंवा कामात अडचण येत असेल, तर रविवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला चपाती खायला घाला किंवा काळ्या चिमणीला दाणे टाका. असे केल्यामुळे तुमच्या जीवनात येणार्याक सर्व अडचणी दूर होतील.

असे मानले जाते, की रविवारच्या दिवशी काळे तिळ किंवा काळी उडीद डाळ यांचे दान केल्यामुळे जीवनात येणारी संकटे दूर होतात. तसेच तुमच्यावर शनिदेवाची कृपा होते. रविवारी सकाळी लवकर उठा, सूर्यदेवाला जल अर्पण करा, जल देतेवेळी जलाच्या धारेतून सूर्यदेवाचे दर्शन घ्या. असे केल्यामुळे डोळ्याची क्षमता वाढते. आजारांपासून तुमचा बचाव होतो. जल देताना तुम्ही “ओम सूर्यदेवाय नम:” असा जप करा. तर रविवारी सूर्यदेवाच्या कृपेबरोबर माता लक्ष्मीचा आशिर्वाद प्राप्त होतो.

रविवारी पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दीप प्रज्वलित करा. चौमुखी म्हणजे जो तुम्ही चारही बाजूंनी प्रज्वलित करू शकता. त्यामुळे व्यापारात वृद्धी होते व घरात धन येण्याचे मार्ग तयार होतात. समस्या दूर होतात. मित्रांनो, तुम्ही पैसे खूप कमावता, पण तो टिकत नाही, वायफळ कामात खर्च होतो. हा उपाय जरूर करा. तो म्हणजे कोणत्याही शुभ दिवशी लवकर उठून, एक लाल रेशमी कपडा घ्या. त्यात अखंडित २१ तांदळाचे दाणे बांधा. त्यानंतर लक्ष्मीची पुजा करा. पूजेत कापडामध्ये बांधलेले दाणे ठेवा. पूजेनंतर माता लक्ष्मीकडे आपल्या मनातील इछा बोला व तांदूळाची ती पुरचुंडी आपली पर्स मध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होईल.

तुम्ही सकाळी लवकर उठा व आपल्या दोन्ही हाताचे तळवे बघून देवी लक्ष्मीच स्मरण करा, यामुळे माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णु व माता सरस्वती तुमच्यावर प्रसन्न होईल. सकाळी लवकर उठून घरातील गृहिणी जर एक तांब्या पाणी घरच्या मुख्य दरवाजावर टाकते, तर घरात माता लक्ष्मीचे याचे मार्ग मोकळे होतात. घरात ज्या कपाटात पैसे ठेवतो त्याचे मुख उत्तर दिशेकडे ठेवा. असे केल्यामुळे घरात लक्ष्मी वाढते. घरातील गृहिणी घराची लक्ष्मी असते. तिचा कधीही अपमान करू नका. तिला सन्मान द्या.

आपल्या आई-वडिलांना आपल्या कमाईतील एक ठराविक रक्कम जरूर द्या. रात्री झोपताना आपल्याजवळ असेलेल्या नोटांची मोजदाद करा व विनंती करा की हे धन माझ्याजवळ राहू दे. हे धना, तू तीनपट होऊन माझ्याकडे ये. कोणाचेही नुकसान न करता तू माझ्याकडे ये. मी तुला स्वीकार करायला तयार आहे. नोटा मोजताना कधीही थुंकी लावू नका. सूर्यास्तानंतर कधीही केर काढू नका. दूध दही कोणाला देऊ नका. त्यामुळे घरात समृद्धि येत नाही. घरात झाडू स्वछ जागी ठेवा. झाडू आडवी ठेवा. ते माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. घर व परिसर स्वछ ठेवा. घरात नको असलेल्या वस्तु ठेवू नका बाहेर टाकून द्या.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *