मस्सा, मस, चामखीळ, तीळ एका दिवसात गळून पडेल…

मित्रांनो शरीरावर दर्शनी भागावर असणारी मोस किंवा चामखीळ व्यक्तींच्या सौंदर्यात निश्चितपणे बाधा उत्पन्न करतात. अनुवंशिकतेमुळे किंवा स्तोतपणामुळे अशा प्रकारचे मोस पुन्हा पुन्हा येत राहतात. लेझर, थेरपीचा वापर करून ते काढता येतात पण लेझर किरणांचा आपल्या शरीरावर, त्वचेवर दुष्परिणाम देखील होत असतो.

म्हणून वारंवार लेझर थेरपी करणे धोक्याचे ठरते. असे हे चामखीळ लहान असतानाच घरच्या घरी सहजपणे करता येणारे घरगुती उपाय केले तर कमी तासात आणि कमी वेळात अशा चामखिळीपासून सुटका मिळवता येते. मोस किंवा चामखीळ घालवण्यासाठी बरेच उपाय बघितले आहेत.

यापैकी उपलब्ध होतील आशा साहित्यांचा वापर करून आणि विशेष म्हणजे आपल्या शरीर प्रकृतीला, आपल्या त्वचेला सूट होतील, मानवतील असे उपाय केले तर निश्चितपणे या घरगुती उपायांचा आपल्याला फायदा होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तु आवश्यक आहेत.

त्यापैकी पहिला घटक म्हणजे हळद पावडर. हळद पावडर वापरताना नेहमी घरगुती बनवलेली हळद पावडर वापरायची आहे. कारण बाजारात मिळणाऱ्या हळद पावडरमध्ये पिवळेपणा वाढवण्यासाठी केमिकलचा वापर केलेला असतो. ज्यामुळे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्वचेसंबंधित अनेक तक्रारी व हळद पावडर औषध म्हणून वापरली जाते.

यामधील अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरल गुणधर्म चामखीळ घालवण्यासाठी मदत करतात. यासाठी अर्धा चमचा हळद पावडर घ्यायची आहे. यानंतर दुसरा घटक म्हणजे मध. त्वचेच्या पोषणासाठी मधाचा वापर होतोच. याशिवाय त्वचेवरील चामखीळीचा अनावश्यक पेशींचा नायनाट करण्यासाठी देखील याचा वापर होतो.

आपण यासाठी एक चमचा मध घ्यायचे आहे. मध वापरताना देखील ते शुद्ध मध वापरायचे आहे. यानंतर पुढचा घटक म्हणजे व्हिटॅमिन C टॅब्लेट. आपण एका व्हिटॅमिन C टॅब्लेटची गोळी बारीक करून यामध्ये टाकायची आहे. व्हिटॅमिन C आपल्या त्वचेसाठी फार उपयुक्त असते. चामखीळ घालवण्यासाठी याचा वापर होतो.

मेडिकल मध्ये सहजपणे या गोळ्या उपलब्ध होतात. आता हे सर्व मिक्स करून एकजीव करायचे आहे. जास्त प्रमाणात घाम येणाऱ्या व्यक्तींना आणि लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारच्या चामखीळी मोठ्या प्रमाणात आढळतात. दररोज योगासने आणि यासोबत योग्य आहार वेळात ठेवला तर वाढलेलं वजन नियंत्रणात आणता येते.

ही तयार झालेली पेस्ट चामखीळीवर लावायची आहे. अगदी स्वच्छ बोटांच्या मदतीने किंवा काडीच्या सहाय्याने ही पेस्ट लावायची आहे. ही पेस्ट इतरत्र आपल्या कपड्यांना लागू नये म्हणून त्यावर बँडेज स्टेप चिटकवू शकता. या उपायाच्या पहिल्या वापरानंतर ही पेस्ट तुमच्या, तुमच्या त्वचेला मानवली तर हा उपाय सकाळ संध्याकाळ करायचा आहे. सात ते आठ दिवसातच चामखीळ गळून पडलेली तुम्हाला दिसेल. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *