मनुष्यजातीसाठी वरदान आहेत शिसवीची पाने, या पानांचा वापर केल्याने शरीरातील होतात असंख्‍य समस्‍या दूर !!

नमस्कार मित्रांनो. तुम्ही सगळे कसे आहात. मित्रांनो निसर्ग हा एक खजाना आहे जो अनमोल व असिमित आहे. आपल्या जवळपास अशा अनेक औषधी वनस्पति असतात ज्या चमत्कारी गुणांनी परिपूर्ण असतात. आपल्याला माहिती नसल्यामुळे याच्या गुणांपासून व फायद्यांपासून आपण अनभिज्ञ असतो. तर आजच्या या माहितीद्वारे मी तुम्हाला एका दिव्य व चमत्कारी औषधी वनस्पतीची ओळख करून देणार आहे.

जी तुमच्या घराच्या जवळपास, तलावाकाठी सहज मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला एका झाडाबद्दल माहिती देणार आहोत. ह्या झाडाचे नाव आहे शिसवी. शिसवी कसा वापर करायचा आहे- शिसवीचे लाकूड तुम्हाला माहीतच आहे. हे खूपच मजबूत असते. याचा वापर करून अनेक प्रकारचे लाकडी फर्निचर तयार केले जाते.

आज आम्ही तुम्हाला याची पाने, बिया यापासून होणारे काही फायदे सांगणार आहोत. आमची माहिती आवडत असेल, तर एक लाइक जरूर करा. तुमचा एक लाइक आम्हाला प्रोत्साहन देतो पुढील माहिती देण्यासाठी.

शिसवीची पाने व पानांचा काढा- शिसवीची पाने खाज, खरूज, नायटा यासारख्या त्वचारोगावर वापरू शकता. पाने नाही मिळाली तर याचे तेल वापरू शकता. याच्या बियांपासून तेल काढले जाते. तुमच्या पोटात जर जळजळ होत असेल, तर शिसवी ह्याची प्रकृती थंड असल्यामुळे पोटातील उष्णता कमी करते. शिसवीच्या तेलाचा वापर जखमेवर किंवा मोठ्या घावावर तुम्ही करू शकता. त्यामुळे जखम लवकर भरून येते.

अॅनिमिया झाला असेल, शरीरात रक्ताची कमतरता असेल तर पानाचा रस फायदेशीर आहे. शिसवीच्या पानांचा काढा लघवीसंबंधीच्या सगळ्या समस्यांवर फायदेशीर आहे. शिसवीचे तेल हे सूज, गुडघेदुखी, सांधेदुखी यासाठी फायदेशीर आहे.

वापर कसा करावा?

१. शिसवीची पाने वाटून तुम्ही त्याचा लेप तयार करा, जो त्वचारोगावर उपयोगी आहे.
२. शिसवीची पाने १० ते १५ मिलि. घेवून स्वछ धुवून त्याचा रस काढा जो प्यायल्यावर पोटातील जळजळ कमी होते, अॅनिमिया ठीक होतो.
३. शिसवीचे तेल बाजारात उपलब्ध आहे.
४. १० ते १५ मिलि पानांचा रस अॅनिमियासाठी उपयोगी आहे.
५. २० ते ४०  पाने स्वछ धुवून पाण्यात उकळून त्याचा काढा बनवून घ्या. दिवसातून ३ ते ४ वेळा लघवीची समस्या असलेल्या व्यक्तिला प्यायला द्या. पण हा प्रयोग जाणकार वैदयाच्या देखरेखीखाली केला पाहिजे.
६. शिसवीचे तेल हलके गरम करून ज्या ठिकाणी सूज, गुडघेदुखी या वेदना आहेत तिथे मालीश करा. तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *