Thursday, November 24
Shadow

भारतीय कसोटी संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव आले समोर, BCCI लवकरच करणार अधिकृत घोषणा…

उजव्या हाताचे सलामीवीर रोहित शर्मा याची पुढील कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) लवकरच याची अधिकृत पुष्टी करेल, असा दावा अहवालामध्ये केला जात आहे.

इनसाइड स्पोर्टशी बोलताना BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “रोहित शर्माच पुढील कसोटी संघाचा कर्णधार असेल यात कोणतीही शंका नाही.” दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला रेड-बॉल फॉरमॅटचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, मात्र आता तो नियमित कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

विराट कोहलीने शनिवारी अचानकपणे कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 33 वर्षीय विराटच्या नेतृत्वाखाली भारताला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

उजव्या हाताच्या दिग्गज फलंदाजाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आत्तापर्यंत 68 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 40 जिंकले असून 17 सामन्यांमध्ये पराभव मिळाला आहे. यामध्ये 11 कसोटी सामने अनिर्णयी राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘विराट सेना’ ने अनेक मोठ्या ऐतिहासिक द्विपक्षीय मालिका जिंकल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.