भयंकर रक्तवाढ होईल, फक्त ही 2 पाने पुरेशी आहेत… डॉ स्वागत तोडकर..

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय करा. मित्रांनो एकेकाळी गरीब आणि कुपोषित व्यक्तींचा आजार समजला जाणारा हा अनेमिया आजकाल कुणालाही दिसून येत आहे. विशेष करून महिलांना व बालकांना अनेमिया असण्याचे प्रमाण तुलनेत जास्त असते.

याशिवाय मुळव्याध, महिलांमधील पाळीतील अति रक्तस्राव, बालकांमधील पोटातील कुपवर्म नावाचे जंत, थॅलेसेमिया, अचानक होणारा रक्तस्राव या आणि इतर काही कारणांमुळे शरीरात रक्त कमी होते. गंभीर दुखापत किंवा असाध्य आजारांमध्ये हॉस्पिटलायजेशन नक्कीच गरजेचे असते. पण रक्ताच्या कमतरतेची काही लक्षणे दिसताक्षणी असे घरगुती उपाय केले तर आपल्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी याची निश्चितपणे मदत होणार आहे.

थकवा, अशक्तपणा, दम लागणे, बालकांचे वजन न वाढणे, वजन वेगाने कमी होणे, चक्कर येणे, हातापायांच्या नखांवर पांढरे चट्टे दिसून येणे अशी काही रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसताक्षणी आजचा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पाहा. रक्त वाढवणारा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे आवळ्याचा रस.

बाजारातून ताजे आवळे आणून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. आयुर्वेदिक औषधी दुकानात आवळा ज्युस देखील मिळतो. तो देखील तुम्ही वापरू शकता. आवळ्याला आयुर्वेदातील रसायन म्हटले जाते. कारण आवळाच्या सेवनाने शरीरातील सक्त धातूंचे पोषण होते. आपण आपल्या उपायासाठी तीन चमचे आवळ्याचा रस घ्यायचा आहे.

यानंतरचा दुसरा घटक म्हणजे बिट. रक्तवाढीसाठी बिटाचा वापर सर्वपरिचित आहे. बाजारातुन ताजे बिट आणून ते ठेचून त्यामधील रस वेगळा करायचा आहे. या रसामधील तीन चमचे रस घ्यायचा आहे. तिसरा घटक म्हणजे पालकांचा रस. पालकाच्या भाजीमध्ये आयर्न आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण मुभलक असल्याने रक्तवाढीसाठी पालक ही अत्यंत उपयुक्त भाजी आहे. पालकाच्या पानांचा रस देखील तीन चमचे एवढा घ्यायचा आहे.

यानंतर चौथा घटक म्हणजे खडीसाखरेची पावडर. दुकानात मोठ्या किंवा ओबड धोबड आकाराची खडीसाखर मिळते. रक्ताची कमतरता, मागे सांगितलेले घटक पूर्ण करतातच, पण थकवा, अशक्तपणा वेगाने रिकव्हर करण्यासाठी खडीसाखर मदत करते. आपण आपल्या आवडीनुसार खडीसाखरेची पावडर घ्यायची आहे. आता हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत.

मित्रांनो रक्तवाढीचा हा उपाय वापरताना चहा, कॉफी, सिगारेट, तंबाखू, मद्यपान करू नये. आहारात कोबी, फ्लावर, लोणचे किंवा अतिखारट अन्नपदार्थ काही दिवस वर्ज करावेत. सर्व घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार होईल. दिवसातून दोन किंवा तीन वेळा आणि सलग पाच ते सात दिवस हा ज्युस तुम्हाला प्यावा लागेल.

कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *