भगवान श्रीकृष्ण म्हणतात, घरात जर असतील या पाच गोष्टी तर गरिबी नक्की दूर राहील…

भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्याच्या राज्यात सुख अंनि समृद्धी आणण्यासाठी खूपच महत्वाचे काही वास्तू नियम सांगितले होते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या वास्तूंबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. तुमच्या घरात काही अशा गोष्टी किंवा वस्तू असतात ज्या सकारात्मक उर्जा निर्माण करतात तर काही नकारात्मक, यांचे संतुलन असणे खूप महत्वाचे आहे, आणि ज्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर घरात नकारात्मक उर्जा असेल तर त्याचा वाईट परिणाम घरातल्या माणसांवर होतो याच उलट जर घरात सकारात्मक उर्जा खेळती असे ल तर घरातील व्यक्तींवर त्याचा उत्तम परीणाम होतो. विज्ञानात सुद्धा हेच सांगितले आहे कि प्रत्येक वस्तूमध्ये काही वायब्रेषन तयार होतात आणि या लहरी घरातील व्यक्तींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतात.

वास्तूशास्त्रानुसार जर एखादी वस्तू योग्य ठिकाणी ठेवली गेली नाही तर त्याचा परिणाम घरातल्या माणसांवर होतो, घरात गरिबी येते, क्लेश होतात. म्हणूनच घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे फार महत्वाचे आहे.भगवान श्रीकृष्णांनी अशा पाच गोष्टींबाबत सांगितले आहे ज्या घरात असतील तर घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती सुद्धा येते. अशा घरात लक्ष्मी कायम वास करते. तर आता पाहूया त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते.

भगवान श्रीकृष्ण सांगतात कि ज्या घरात धूप दीप वगैरे लावले जातात ते घर कायम रोगापासून दूर राहाते आणि घरातील व्यक्तींचे मन कायम प्रसन्न राहाते. या घरात वास्तुदोष कधीही नसतात. पाणी- ज्या घरातील पाण्याची व्यवस्था घराच्या उत्तर पूर्व दिशेला केली गेली असेल त्या घरात कायम सुख आणि समृद्धी टिकून राहाते आणि धनधान्याची कमी कधीही जाणवत नाही. या दिशेला ठेवलेल्या पाण्यावर ईश्वरी शक्तीचा प्रभाव असतो.

चंदन – भगवान श्रीकृष्ण सांगतात कि घरात चंदन असणे खूप उत्तम आहे. ज्या घरात रोज चंदन उगाळले जाते त्या घरात नेहमी सुख आणि समृद्धी तसेच शीतलता येते. चंदन खूप पवित्र असते आणि ते घरातून नकारात्मक उर्जा काढून टाकते. शुद्ध तूप – घरात गायीचे शुद्ध तूप हे स्वयंपाकात तसेच देवासाठी वापरणे ही उत्तम गोष्ट आहे. घरातीन तूप कधी संपलेले नसेल याची काळजी नक्की घ्या.

मध – घरात मध असणे चांगले मानले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या अनुसार मध खूप शुद्ध असल्याने तुमच्या शरीराची तसेच मनाची शुद्धी करते. म्हणूनच देवाच्या कार्यात मधाचा वापर केला जातो. सरस्वतीची प्रतिमा- सरस्वतीला वीणावादिनी सुधा म्हणतात. सरस्वतीची पूजा ज्या घरात केली जाते तिथे विद्या आणि धन यांची कमी कधीही जाणवत नाही.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *