बेलाची पाने खाल्ल्याने जे होते ते ऐकून पायाखालची जमीन सरकून जाईल…

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे.

३ दिवस रोज रिकाम्या पोटी बेलाची पाने खाल्यामुळे त्याचे होणारे फायदे जाणून घेऊन तुम्ही चकित व्हाल. मूळापासून समाप्त होतील खूप भयंकर असे आजार. मित्रांनो, आज मी तुम्हाला बेलाच्या पानांची माहिती देणार आहे. बेलपत्राचा उपयोग आपण पूजेत करतो. भगवान शिव यांची पुजा बेलाच्या पानाने केली जाते. ही जी बेलाची आहेत त्याचे आयुर्वेदात खूप जास्त महत्व आहे व याचे भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.

तर बेलाच्या पानांचे काय फायदे आहेत त्याबद्दल बोलूया. बेलपत्राचे सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ति वाढते. जर तुम्ही नाजुक बेलाची पाने घेतली, मी इथे लहान आकाराची बेलाची पाने घेतली आहेत तर अशा एका बेलाच्या पानांचे सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही जर चावून चावून सेवन केले तर तोंडातील छाले बरे होतात, अल्सर असेल तर आराम पडतो. त्याचबरोबर हे घेतल्यामुळे बरेच आजार समाप्त होतात.

पाने खाल्यावर तुम्ही थोडे पाणी पिऊ शकता. हिंदू धर्मामध्ये असे काही सण उत्सव असतात, ज्यामध्ये बिल्वपत्र देवांना वाहिले जाते व काही वेळेस ते खाल्ले जाते. ह्याचे कारण हे आहे, की आपण बर्‍याच आजारांपासून वाचू शकतो फक्त आठवड्यातून दोनदा याचे सेवन करायचे आहे. सर्दी, खोकला यापासून आराम मिळतो.

तसेच मधुमेहासाठी फायदेशीर आहे फक्त १ बेलाचे पान. आठवड्यातून २ वेळा सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर फायदा होतो. तुम्ही याचा रस काळ्या मिरीच्या पाऊडर बरोबर सेवन करू शकता. त्याचबरोबर जर मधमाशी चावली, किंवा कोणताही विषारी कीटक चावला, त्यामुळे येणारी सूज, होणारी आग यावर बेलाच्या पानांचा वाटून रस त्या जागी लावला तर त्याच्या वेदना व सूज कमी होते. सूज उतरून जाईल.

हृदयाच्या आजारांमध्ये बेलाची पाने उपयोगी आहेत पण आठवड्यातून २ वेळा फक्त याचे सेवन करायचे आहे. प्रथम बेलाची पाने स्वछ धुवून घ्या. त्याच्यावर माती असते, ती कुटून रस काढून घेऊ शकता. खूप लोक ती पाने पाण्यात उकळून त्याचा काढा बनवून पितात. सकाळी, दुपारी कधीही करू शकता. भोजनांनंतर कधीही ही पाने खाऊ नका.

बेलाची पाने प्रकृतीने थंड असतात, त्यामुळे आपले पचन व्यवस्थित करण्यास ही मदत करतात. जर तुम्ही बेलाच्या पानांचा उकळून काढा करून प्यायला तर मूळव्याधीत खूप आराम पडतो. १ बेलाचे पान चावून खाल्ले तरी चालेल. पोटाची सफाई करतो व मधुमेही लोकांसाठी हा रामबाण उपाय आहे.

मुलांमध्ये पण हल्ली मधुमेह आढळतो. त्यांच्यासाठी पण हा रामबाण उपाय आहे. तोंडाचा अल्सर बरा होतो. छोटे छोटे आजार होत नाही शरीर स्वस्थ राहाते, सुदृढ राहाते. माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *